Last Update:
 
मुख्य पान

कुर्पेतील खाण बंद करण्याचा आदेश
प्रतिनिधी
Thursday, May 17, 2012 AT 01:45 AM (IST)
Tags: goa
पणजी, ता. 16 ः कुर्पे येथील खाण गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवान्यातील अटींचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून बंद करण्याचा आदेश दिला आहे. तत्पूर्वी त्या खाणीच्या चालकांना मंडळाने नोटीस बजावली होती.

याविषयी मंडळातून मिळालेल्या माहितीनुसार, ही खाण बंद करण्याच्या आदेशावर काल सायंकाळी उशिरा मंडळाचे अध्यक्ष डॉ. सायमन डिसोझा यांनी स्वाक्षरी केली. आज हा आदेश खाणीच्या व्यवस्थापनावर बजावण्यात आला.

सांगे तालुक्‍यातील या खाणीत मनुष्यबळाचा वापर करून मॅंगनीज काढावे असा परवाना केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने दिला होता. मंडळाने अचानकपणे केलेल्या पाहणीत खाणकामासाठी यंत्रसामग्री वापरण्याचे आणि मॅंगनीजऐवजी लोहखनिज काढण्यात येत असल्याचे निदर्शनास आले होते. मंडळाने खाणकामाला संमती देताना काही अटी घातल्या होत्या. त्यात परवान्यात नमूद केलेल्या खनिजाचे व नमूद केलेल्या पद्धतीनेच खाणकाम करावे असे स्पष्टपणे म्हटले होते. या खाणीच्या व्यवस्थापनाने त्याचा भंग केल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली. त्याला समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संमती मागे घेण्याचे ठरविले. तसे पत्रही आज रवाना करण्यात आले.



 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2012 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: