Last Update:
 
देश-विदेश

नवी दिल्ली, 11 - टूजी स्पेक्‍ट्रम प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या 122 कंपन्यांचे परवाने रद्द करण्याच्या आदेशाचा दूरसंचार क्षेत्रावर होणार परिणाम आणि पुढील धोरण निश्‍चित करण्यासंदर्भात पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आज (शनिवार) मंत्रिमंडळाची बैठक बोलविली होती. केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी, गृहमंत्री पी. चिदंबरम, दूरसंचारमंत्री कपिल सिब्बल, कायदामंत्री सलमान खुर्शिद, महाधिवक्ता जी. ई. वहाणवटी आणि दूरसंचार सचिव आर.

Saturday, February 11, 2012 AT 07:34 PM (IST)

माले (मालदीव), 11 - लोकशाही पद्धतीने निवडून आलेले मालदीवचे पहिले अध्यक्ष महंमद नाशिद यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना अटक करण्याचा न्यायालयाने आदेश दिला होता. तेव्हापासून ठिकठिकाणी प्रचंड निदर्शने सुरू आहेत. पोलिसांनी 200 आंदोलकांना अटक केली असल्याचे वृत्त आहे. मालदीवमध्ये अद्यापही राजकीय अस्थिरता कायम आहे. राजकीय बंडामुळे महंमद नाशिद यांना राजीनामा द्यावा लागला होता.

Saturday, February 11, 2012 AT 07:33 PM (IST)

नवी दिल्ली, 11 - भारतीय संघातील दिल्लीचा युवा क्रिकेटपटू विराट कोहली सध्या खूपच चर्चेत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शानदार कामगिरी करत असताना त्याच्या पोशाखामुळे (ड्रेसिंग) तो आणखीच लोकांच्या नजरेत आला आहे. "बेस्ट ड्रेस्ड इंटरनॅशनल मॅन'च्या यादीत पहिल्या दहांमध्ये विराटची वर्णी लागली आहे. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचाही समावेश आहे. विराटने ओबामा यांच्यावर बाजी मारत तिसरे स्थान पटकाविले आहे, तर ओबामा दहाव्या स्थानावर आहेत.

Saturday, February 11, 2012 AT 07:32 PM (IST)

नवी दिल्ली, 7 - रेल्वे सेवेत अधिकाधिक तत्परता आणण्यासाठी रेल्वे खात्याने जणू कंबरच कसली आहे. पहिल्या श्रेणीतील वातानुकुलित डब्यातून प्रवास करताना ओळखपत्र बाळगणे प्रवाशांवर बंधनकारक केल्यानंतर 'एसएमएस'द्वारे तिकीट आरक्षणाची नवी सेवा रेल्वे खात्याने नुकतीच सुरू केली.   त्यापाठोपाठच रेल्वेच्या तिकीट आरक्षणात वाढ करण्यासाठी रेल्वेने आता नवीन उपक्रम सुरू केला आहे. या सेवेअंतर्गत तिकीट आरक्षणाच्या कालावधी 90 ते 120 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

Tuesday, February 07, 2012 AT 09:47 PM (IST)

होम्स (सीरिया), 7- सीरियात सुरू असलेल्या हिंसाचारात तब्बल 60 नागरिक मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आहे. काल (सोमवार) रात्रीच्या सुमारास होम्स या शहरात झालेल्या गोळीबारात 60 नागरिक ठार झाले. बाहेरच्या देशातील सैनिकी मदतीशिवाय सीरियातील हिंसाचार रोखण्याचे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केले आहे. अमेरिकेने डमासकस येथील दूतावास बंद केले असून तेथील सर्व कर्मचाऱ्यांना सीरिया सोडण्याचा आदेश दिला आहे.

Tuesday, February 07, 2012 AT 09:51 PM (IST)

मेलबर्न,7- मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर गेल्या एप्रिलपासून शंभराव्या शतकापासून जरी दूर असला तरी तो आजही ग्रेटच आहे, असे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टीव्ह वॉने आज (मंगळवार) म्हटले आहे. वॉ म्हणाला, 'सचिनच्या शंभराव्या शतकाकडे संपूर्ण जगातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. शतकांचा हा आकडा खूपच मोठा आहे. माझ्या मते, सचिनवर थोडेफार दडपण असल्यामुळेच शतक होण्यास वेळ लागत असावा. सचिन हा खरोखरच ग्रेट खेळाडू आहे, लवकरच त्याचे शंभरावे शतक पाहायला मिळेल.

Tuesday, February 07, 2012 AT 09:50 PM (IST)

लंडन, 7 - गर्भवती महिलेला मधुमेह असल्यास, मुलांमध्ये जन्मतः व्यंग निर्माण होऊ शकतो, असा निष्कर्ष एका संशोधनाअंती काढण्यात आला आहे. येथील न्यू कॅसल विद्यापीठाने हे संशोधन केले असून, "डायबेटॉलॉजीया' या वैद्यकीय विज्ञानविषयक नियतकालिकामध्ये हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या संशोधनासाठी ईशान्य लंडनमधील चार लाख गर्भवती महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

Tuesday, February 07, 2012 AT 09:49 PM (IST)

नवी दिल्ली, 7 - बेबी फलक प्रकरण केंद्र सरकारने गांभीर्याने घेतले असून त्यांनी या प्रकरणाला मानवी तस्करीचा प्रकार म्हटले आहे. या प्रकरणाचा अहवालही केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्ली पोलिसांकडे मागितला आहे. हा प्रकार मानवी तस्करीचा असून आम्ही पोलिसांच्या अहवालाची प्रतिक्षा करत आहोत, असे गृहमंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव बी. भामथी यांनी आज (मंगळवार) येथे सांगितले. बेबी फलकच्या सध्याच्या अवस्थेला जबाबदार असणाऱ्यांच्या शोधात दिल्ली पोलिस आहे.

Tuesday, February 07, 2012 AT 09:44 PM (IST)

मुंबई, 7 - मुंबईत १३ जुलै २०११ मध्ये झालेल्या साखळी स्फोटातील आरोपी आणि इंडियन मुजाहिद्दीन दहशतवादी संघटनेचा सदस्य हरूण नाईक यांने अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याची ऑगस्ट २००१ मध्ये पाकिस्तानमधील भवालपूर येथे भेट घेतल्याची माहिती, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकातील (एटीएस) सूत्रांनी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओसामा बिन लादेनकडून भवालपूर येथे चालविण्यात येणाऱ्या दहशतवादी गटातील नाईक हा एक सदस्य होता.

Tuesday, February 07, 2012 AT 09:44 PM (IST)

लंडन, ता. ६- मंगळ ग्रहावर तीव्र दुष्काळ असून त्यामुळे तेथे कोणत्याही प्रकारची सजीव सृष्टी नसल्याचा निष्कर्ष ब्रिटिश शास्त्रज्ञांनी काढला आहे. नासाने 2008 मध्ये केलेल्या फिनिक्‍स मोहिमेंतर्गत मंगळावरील मातीचे नमुने घेतले होते. त्याचा लंडन येथील इम्पिरियल महाविद्यालयाने अभ्यास केला. त्यातूनच मंगळावर साठ कोटी वर्षांपासून तीव्र दुष्काळ असल्याचे आढळून आले.

Monday, February 06, 2012 AT 04:44 PM (IST)

वाराणसी (उत्तर प्रदेश), ता. ६ - पंतप्रधानपद भूषविणे हे माझे ध्येय नसून उत्तर प्रदेशचा विकास हेच माझे ध्येय आहे, असे स्पष्ट मत कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी आज (सोमवार) व्यक्त केले. विरोधकांमुळेच लोकपाल विधेयक लटकले, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रचाराच्या पार्श्‍वभूमीवर घेतलेल्या आक्रमक पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले,""विरोधी पक्षांच्या आडमुठी भूमिकेमुळे लोकपाल विधेयक संसदेत खोळंबले आहे.

Monday, February 06, 2012 AT 04:40 PM (IST)

अलाहाबाद, ता. ६ - भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज युवराज सिंह याचा कॅन्सरवर उपचार करण्याची इच्छा योगगुरू बाबा रामदेव यांनी व्यक्त केली आहे. योग आणि आयुर्वेदाच्या साहाय्याने त्यांनी युवराजच्या कॅन्सरवर उपचार करणार असल्याचे सांगितले. युवराज सिंहला कॅन्सर असल्याचे रविवारी स्पष्ट झाले असून, त्याच्यावर अमेरिकेत उपचार सुरु आहेत. बाबा रामदेव म्हणाले, ''युवराजवर उपचार करण्याची संधी मिळाल्यास आनंद होईल.

Monday, February 06, 2012 AT 04:30 PM (IST)

अयोध्या, ता. 5- भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी राम मंदिराचा मुद्दा घेऊन प्रचाराला सुरवात केली आहे. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये भाजपने राम मंदिराच्या मुद्याला हवा दिली आहे. याच मुद्यावर यंदाही मते मिळतील, असा अडवानींना विश्‍वास वाटतो आहे. "माझे उद्दिष्टे तेव्हाच पूर्ण होईल, जेव्हा अयोध्येत राम मंदिर उभे राहील,' असे विधान अडवानी यांनी येथे जाहीर सभेत केले आहे.

Sunday, February 05, 2012 AT 08:40 PM (IST)

नवी दिल्ली, ता. 5 - रेल्वे प्रवासासाठी इंटरनेटद्वारे केलेल्या आरक्षणाचा "एसएमएस' इलेक्‍ट्रॉनिक तिकीट (ई-तिकीट) म्हणून ग्राह्य धरण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी एक फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. आरक्षणानंतर "प्रिंटआउट' बाळगण्याच्या कटकटीपासून प्रवाशांची मुक्तता होणार आहे. "आयआरसीटीसी'कडून आलेला "एसएमएस' हेच नवे तिकीट असेल. या "एसएमएस'मध्ये बदल केला जात आहे.

Sunday, February 05, 2012 AT 08:39 PM (IST)

लखनौ, ता. 5 ः उत्तर प्रदेशातील निवडणूक साऱ्याच पक्षांनी प्रतिष्ठेची केली असल्याने एरवी क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या सट्टेबाजांनीही जोरदार तयारी केली आहे पण निकाल काय लागणार? याबाबत तेही संभ्रमातच आहेत. त्यामुळे अद्याप सट्टेबाजारात तेजी दिसून येत नाही. या वेळी निकालांवर दहा कोटींचा सट्टा लागण्याची शक्‍यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. निकालाचा अंदाज येत नसल्याने सट्टेबाजारात फार तेजी असणार नाही, अशी माहिती एका बुकीने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

Sunday, February 05, 2012 AT 08:37 PM (IST)

हैदराबाद, ता. 5 : आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या (टीटीडी) अंतर्गत कारभारात श्री त्रिदंडी चिनाजिअर स्वामी यांनी हस्तक्षेप करू नये, असे स्पष्ट मत राज्याचे देणगीमंत्री सी. रामचंद्रय्या यांनी आज व्यक्त केले. "सकाळ न्यूज नेटवर्क'शी बोलताना रामचंद्रय्या यांनी सांगितले, की भाविकांनी मांडलेल्या सूचनांचे स्वागतच केले जाईल. प्रत्येक भाविकाने आपल्या सूचना मांडाव्यात, अशी आमची अपेक्षा आहे.

Sunday, February 05, 2012 AT 08:36 PM (IST)

पाटणा, ता. ५- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गेल्या वर्षी पुकारलेल्या देशव्यापी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता. त्याची हजारे कबुली का देत नाहीत? असा सवाल संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज (रविवार) केला. यासंदर्भात भागवत म्हणाले,""भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनात संघाचे कार्यकर्ते वैयक्तिक पातळीवर सक्रिय सहभागी झाले होते.

Sunday, February 05, 2012 AT 06:56 PM (IST)

अलाहाबाद, ता. ५ - समाजवादी पक्षातून निलंबित करण्यात आलेले खासदार अमरसिंह यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे मी कॉंग्रेस पक्षात आहे, असे मत बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने आज (रविवार) व्यक्त केले. कॉंग्रेसचा प्रचार करण्यासाठी अलाहाबादला आलेला संजय दत्त म्हणाला,""मी कॉंग्रेसमध्ये पुनरागमन करावे असा सल्ला अमरसिंह यांनी मला दिला होता. त्यांच्यामुळे मी कॉंग्रेसमध्ये आहे. फार पूर्वीपासून माझ्या कुटुंबाचा कॉंग्रेसशी संबंध आहे.

Sunday, February 05, 2012 AT 06:52 PM (IST)

नवी दिल्ली, ता. ५ - भारतीय संघातील फलंदाज युवराज सिंग याला कॅन्सर झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. युवराजचे फिजिओ जतिन चौधरी यांनी त्याला कॅन्सर झाल्याचे स्पष्ट केले आहे.   एका वृत्तवाहिनीशी बोलताना चौधरी यांनी त्याचा कॅन्सर गंभीर नसल्याचे म्हटले आहे. सध्या त्याच्यावर अमेरिकेत उपचार सुरु असून, किमोथेरेपी करण्यात आली आहे. त्याच्यावर मार्चपर्यंत किमोथेरेपी करण्यात येणार आहे. तसेच त्याच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया करण्यात येणार नाही.

Sunday, February 05, 2012 AT 04:27 PM (IST)

वॉशिंग्टन, ता. ५ - सोशल नेटवर्किंगमध्ये आघाडीवर असलेल्या फेसबुकला शनिवारी आठ वर्षे पूर्ण झाली. फेसबुकचे सध्या ८० कोटी ४५ लाख युजर्स जगभरात आहेत. येत्या ऑगस्ट महिन्यात १०० कोटींचा आकडा पार करण्याची कंपनीची योजना आहे. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी ४ फेबुवारी २००४ मध्ये फेसबुकला सुरुवात केली होती. झुकेरबर्ग यांच्यासह एड्युर्डो सेवरीन, डस्टीन मोस्कोविट्झ आणि ख्रिस ह्युज या तिघांचा समावेश होता.

Sunday, February 05, 2012 AT 04:26 PM (IST)

पतियाळा, ता. ५ - काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे सहकारी असलेले अभिनेते ओम पुरी यांनी अण्णा हजारे यांना अशिक्षित आणि दिशाहीन असल्याचे म्हटले आहे. ओम पुरी यांनी अण्णांच्या मोहिमेला योग्य म्हटले असले तरी, अण्णांना चार जणांकडून खेळविले जात असल्याचे सांगितले. येथील राजपुरामध्ये कार्यक्रमात बोलताना ओम पुरी म्हणाले, ''अण्णा हजारे प्रामाणिक असून, एक चांगले व्यक्ती आहेत. मात्र, त्यांचे शिक्षण कमी झाले आहे.

Sunday, February 05, 2012 AT 04:25 PM (IST)

(पीटीआय)   नवी दिल्ली - "केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना टू जी स्पेक्‍ट्रम गैरव्यवहारात सहआरोपी करून घ्यावे,' अशी मागणी करणाऱ्या सुब्रह्मण्यम स्वामी यांचा अर्ज फेटाळला. न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे गृहमंत्र्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. तत्कालीन दूरसंचारमंत्री ए.

Saturday, February 04, 2012 AT 08:11 PM (IST)

मुंबई, ता. ४ - बॉलिवुडमध्ये सध्या दबक्या आवाजात चर्चा चालू आहे, ती करीना कपूरची. अलिकडेच एका प्रसिद्ध दैनिकाने करीना एका विमानतळावर आलेली असताना, एका दैनिकाच्या छायाचित्रकाराने तिचे छायाचित्र टिपले. आपली छाबी कोणी टिपत असल्याची तिला कल्पनाच नव्हती. मात्र ते प्रसिद्ध झाल्यापासूनच दबक्या चर्चेला उधाण आले आहे. ही चर्चा आहे ती गर्भवती असल्याची. खरेच गर्भवती आहे काय? विमानतळावर आलेल्या करीनाने हिरव्या रंगाचा लांब टीशर्ट घातला होता.

Saturday, February 04, 2012 AT 08:09 PM (IST)

वॉशिंग्टन, ता. ४ - कोणत्याही पदार्थाचे अतिरेकी सेवन, मानवी शरीराला घातक ठरू शकते. शास्त्रज्ञांच्या मते साखरेचाही त्यात समावेश आहे. मानवी शरीरासाठी साखर विषारी असून, सरकारने मद्याप्रमाणेच साखरेच्या सेवनावरही नियंत्रण आणले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. निसर्ग रक्षणाला वाहिलेल्या नेचर या नियतकालिकाच्या ताज्या अंकात, कॅलिफोर्निया विद्यापीठातील रॉबर्ट लुस्टिंग यांच्या नेतृत्त्वाखालील शास्त्रज्ञांच्या एका पथकाने हा शोध लावला आहे.

Saturday, February 04, 2012 AT 08:08 PM (IST)

इंफाळ, ता. ४ - मणिपूरमध्ये आज 11 विधानसभा मतदारसंघांतील 34 मतदान केंद्रांवर फेरमतदान झाले. मतदानावेळी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी सात ते दुपारी 3 या वेळेत मतदानप्रक्रिया पार पडली. राज्यात विधानसभेच्या 60 जागांसाठी 28 जानेवारीला मतदान झाले होते. मात्र, 34 मतदान केंद्रांवर झालेल्या हिंसाचाराच्या विविध घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू झाला. हिंसाचार झालेल्या केंद्रांवर आज पुन्हा मतदान घेण्यात आले.

Saturday, February 04, 2012 AT 08:07 PM (IST)

 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: