Last Update:
 
गोवा

पणजी, ता. 21 - कॉंग्रेसने जाहीरनाम्यातूनही पुन्हा जनतेची फसवणूक केली आहे. 2007 मधील जाहीरनाम्यातील 70 टक्के आश्वासने आताही देण्यात आली आहेत. गेल्या सात वर्षांत कॉंग्रेसच्या सरकारने काहीही केले नसल्याचीच ही कबुली असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रचार प्रमुख श्रीपाद नाईक यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. विल्फ्रेड मिस्कीता होते.

Tuesday, February 21, 2012 AT 11:04 PM (IST)

पणजी, ता. 21 - प्रादेशिक आराखडा 2021 पूर्णपणे रद्द करून तज्ज्ञांच्या नव्या समितीद्वारे जुन्या आराखड्याचा आढावा घेऊन नवीन आराखड्याची बांधणी करण्यास तृणमूल कॉंग्रेस कटिबद्ध असल्याचे ठाम निवेदन आज तृणमूल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ.विल्फ्रेड डिसोझा यांनी येथे केले. "गोमन्तक'तर्फे आयोजित केलेल्या "निवडणूकनामा' कार्यक्रमात डॉ. डिसोझा सहभागी झाले होते.

Tuesday, February 21, 2012 AT 11:03 PM (IST)

म्हापसा, ता. 21 : कालवी-कारोणा पुलाच्या बांधकामासाठी आवश्‍यक असलेली जमीन वापरण्यासाठी हळदोणे पंचायतीने विनंती केल्यानंतर दहा दिवसांच्या आत हळदोणे कोमुनिदादीने ना हरकत दाखला दिल्याचे स्पष्ट करून, कालवी बस दुर्घटनेला आमदार ऍड. दयानंद नार्वेकरच जबाबदार असल्याचा आरोप हळदोणे कोमुनिदादीचे खास ऍटर्नी मेल्विन फर्नांडिस यांनी आज येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला. ऍड. नार्वेकर यांनी काल (ता. 20) केलेल्या आरोपांचे त्यांनी खंडन केले.

Tuesday, February 21, 2012 AT 11:01 PM (IST)

पणजी, ता. 21ः कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याने सरकार स्थापन करण्यासाठी छोट्या पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार असून, गोवा विकास पार्टीच्या पाठिंब्याशिवाय आगामी सरकार सत्तेवर येणे कठीण असेल, असा विश्‍वास गोवा विकास पार्टीच्या (गोविपा) अध्यक्ष व्हियोला पाशेको व पक्षाचे सरचिटणीस लिंडन मोंतेरो यांनी "गोमन्तक निवडणूकनामा' कार्यक्रमात व्यक्त केला.

Tuesday, February 21, 2012 AT 11:01 PM (IST)

पणजी, ता.20 - गोवा सरकारच्या मेडिक्‍लेम योजनेची रक्कम 7 लाख रुपयांवर नेणार, स्वर्णजयंती सामाजिक सुरक्षा योजना कुटुंब निधीत 1 लाख रुपयांपर्यंत वाढ, अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय तसेच व वार्षिक 1 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्या कमकुवतांना 150 युनिटस्‌पर्यंत मोफत वीज, पाणी इत्यादी घोषणांचा समावेश असलेला कॉंग्रेस पक्षाचा जाहीरनामा आज कॉंग्रेस निवडणूक अधिकारिणी प्रमुख ऑस्कर फर्नांडिस यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.

Tuesday, February 21, 2012 AT 04:45 AM (IST)

भारतीय जनता पक्षाने प्रसृत केलेला निवडणूक जाहीरनामा आम आदमी आणि विशेषतः महिलांना जाम खूश करणारा आहे. गेल्या वर्षी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी योजना, सवलतींचा वर्षाव करून सर्वांनाच खूश करणारा अर्थसंकल्प सादर केला होता. रोजच्या चर्चेत नसणारा,समाजामध्ये ठळकपणे न दिसणारा घटकही अर्थसंकल्पाच्या "आनंदस्पर्शा'तून सुटणार नाही याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली होती.

Tuesday, February 21, 2012 AT 03:30 AM (IST)

मडगाव, ता. 20 - गोवा विकास पक्षातर्फे पक्षाध्यक्षा व्हियोला पाशेको यांच्या उपस्थितीत 18 कलमी निवडणूक जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात आला. राज्यातील भ्रष्टाचार मिटवण्याबरोबर आदर्श राज्य बनवणे आपल्या पक्षाची दोन महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. राज्यात पारदर्शक व सुरळीत प्रशासन सत्तेवर आणण्यासाठी आपण कॉंग्रेस वगळता कुठल्याही पक्षाला पाठिंबा देणार असल्याचे पक्षाचे सर्वेसर्वा मिकी पाशेको यांनी यावेळी सांगितले.

Monday, February 20, 2012 AT 11:10 PM (IST)

मडगाव, ता. 20  ः सासष्टी तालुक्‍यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्ष व अपक्ष उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाचे प्रकार वाढत चालले असून, यामुळे प्रचाराला गालबोट लागण्याच्या घटना घडत आहे. अशा तीन घटना काल सासष्टीत घडल्या.

Monday, February 20, 2012 AT 11:08 PM (IST)

विधानसभा निवडणुकीचा प्रचार केव्हाच सुरू झाला आहे. या आठवड्यात कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्षांनी आपले जाहीरनामे प्रकाशित केले. त्याच लोकांसाठी आश्‍वासनांची खैरात करण्यात आली असली, तरी प्रचारात यापूर्वीच मुद्दे वाहून गेल्याचे चित्र आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने 23 डिसेंबरला निवडणुकीची घोषणा केली आणि इच्छुकांनी 24 डिसेंबरपासून मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

Monday, February 20, 2012 AT 11:18 PM (IST)

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी देशातील 1 कोटी 60 लाख मुले अजूनही शाळेत जात नसल्याचे नुकतेच एका कार्यक्रमात जाहीर केले. केंद्रीय मंत्र्यांच्या या प्रकटनामुळे शाळाबाह्य मुलांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुळात यापूर्वीही शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. शासकीय पातळीवर विविध उपक्रमही राबविण्यात आले. पण ही संख्या घटण्याऐवजी वाढतानाच दिसत आहे.

Monday, February 20, 2012 AT 11:17 PM (IST)

म्हापसा, ता. 20 : हळदोणे कोमुनिदादीचे अध्यक्ष मेल्विन फर्नांडिस यांनी कारोणा-कालवी पुलाच्या भूसंपादनासाठी ना हरकत दाखला न दिल्याने सरकारला पुलाचे बांधकाम हाती घेता आले नाही, असा आरोप हळदोणेचे आमदार ऍड. दयानंद नार्वेकर यांनी आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिला. हळदोणेचा आमदार या नात्याने या पुलासाठी 2002 सालापासून आपण वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले.

Monday, February 20, 2012 AT 11:12 PM (IST)

पणजी, ता. 19- एप्रिलपासून पेट्रोलवरील मूल्यवर्धित कर रद्द करून, ते लिटरमागे 11 रुपयाने स्वस्त करण्याचे, तसेच एप्रिलपासून पुढील पाच वर्षांसाठी स्वयंपाकाच्या गॅसचा दर स्थिर ठेवण्याचे आश्वासन भारतीय जनता पक्षाने आज आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातून दिले आहे.

Monday, February 20, 2012 AT 04:45 AM (IST)

म्हापसा, ता. 19 - कारोणा- फेरी धक्‍क्‍याजवळ प्रवासी बस नदीत शिरल्याने झालेल्या दुर्घटनेला बस चालक राजेश चंद्रकांत नाईक जबाबदार असल्याचे निष्कर्षाप्रत पोलिस आले असून त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 304 कलमाखाली सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज म्हापसा येथील न्यायालयात सादर केले असता, त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

Sunday, February 19, 2012 AT 11:34 PM (IST)

पणजी, ता. 19 - सांत आंद्रे मतदारसंघात प्रचारावेळी भाजप उमेदवार विष्णू वाघ यांच्या सभेत गोंधळ घालून दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून आगशी पोलिसांनी, या मतदारसंघाचे विद्यमान आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांच्या दोन बंधूंसह अन्य दोघाजणांविरूद्ध तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी पोलिस तपास सुरू असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई यांनी दिली.

Sunday, February 19, 2012 AT 11:32 PM (IST)

मडगाव, ता. 19 - वेळ्ळी मतदारसंघातील रंगाळी-बेतूल भागातील एका घरात वनमंत्री फिलिप नेरी रॉड्रिग्ज मतदारांना पैसे वितरित करीत असल्याची तक्रार सासष्टीतील निर्वाचन अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. त्याबरोबर भरारी पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली असता, पथकाच्या हाती काहीच सापडले नाही.

Sunday, February 19, 2012 AT 11:29 PM (IST)

डिचोली, ता. 19: शिवलकरवाडा मुळगाव येथील महेश धोमण यांच्या दुचाकी गॅरेजला आज रविवार 19 फेब्रुवारी रोजी दुपारी अचानक आग लागली व त्यामध्ये गॅरेज संपूर्ण भस्मसात झाले. या आगीत या गॅरेजचे सुमारे पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा या गॅरेजच्या मालकांनी केलेला आहे. गॅरेजमध्ये महेश आणि त्यांचे भाऊ काम करीत असताना या गॅरेजला अचानक आग लागली. या आगीने भयानक स्वरूप धारण केल्याने आणि संपूर्ण गॅरेजच आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

Sunday, February 19, 2012 AT 11:28 PM (IST)

पणजी, ता. 17  ः एकीकडे विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी चालू होण्याच्या बेतात असताना उद्यापासून गोव्याच्या राजधानी पणजीतून चार दिवस किंग मोमोची राजवट चित्ररथ मिरवणुकीने राज्यात सुरू होणार आहे. कार्निव्हल मिरवणुकीची त्रिस्तरीय छाननी निवडणूक आयोगाद्वारे केली जाणार असून चित्ररथातून राजकारण, प्रचारमोहीम खपवून घेतली जाणार नाही असा इशारा पर्यटन खात्याने दिला आहे.

Friday, February 17, 2012 AT 10:52 PM (IST)

पणजी, ता. 17 ः सर्वधर्मसमभाव, समता, सामाजिक न्याय, सर्वसामान्यांचे कल्याण आणि विकासाभिमुख कार्य अशा समान सूत्रांवर आधारित कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार राज्यात गेल्या निवडणुकीवेळी सत्तेवर आले. त्यावेळी राष्ट्रवादीचे फक्त दोन मंत्री तर कॉंग्रेसकडे जास्त मंत्री.

Friday, February 17, 2012 AT 10:51 PM (IST)

पणजी, ता. 17 ः निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर यावेळी फोंडा तालुक्‍यातील राजकीय स्थितीचे वर्णन "त्रांगडे' या शब्दांत करता येईल. कारण एक शिरोडा मतदार वगळता फोंडा, मडकई व प्रियोळ येथील राजकारण "इंटर-कनेक्‍टेड' आहे. दुसऱ्या शब्दांत या मतदारसंघांचा विचार स्वतंत्रपणे करण्यापेक्षा एकत्रित करणेच अधिक संयुक्तिक ठरेल.

Friday, February 17, 2012 AT 10:48 PM (IST)

पणजी, ता. 16 ः गोवा विधानसभेच्या येत्या 3 मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीत 40 मतदारसंघांतून 215 उमेदवार रिंगणात असून 2007 सालापेक्षा 13 उमेदवारांची संख्या यंदा वाढली आहे. यंदाच्या उमेदवारांत 74 अपक्ष आणि 9 महिला उमेदवारांचा समावेश आहे. 2007 सालापेक्षा 2012 साली अपक्ष उमेदवारांची संख्या 24 ने वाढली आहे हे विशेष. 2007 साली अपक्षांची संख्या 50 होती. उत्तर गोव्यातील 23 मतदारसंघात 119 तर दक्षिण गोव्यातील 17 मतदारसंघात 96 उमेदवार आहेत.

Friday, February 17, 2012 AT 04:45 AM (IST)

पणजी, ता. 16 ः गोव्यात गेली पाच वर्षे सत्तेवर असलेले कॉंग्रेस सरकार म्हणजे जनतेच्या आशाआकांक्षा पायदळी तुडवणारे, सरकार पक्षातील मंत्री, आमदारांच्या तुंबड्या भरणारे आणि सर्वच क्षेत्रात प्रदूषण, भ्रष्टाचार करणारे सरकार, अशी व्याख्या करणे संयुक्तिक ठरेल, असे परखड मत व्यक्त करतानाच सामान्य माणसाला अभिप्रेत असणारे भाजप-मगोचे सरकार सत्तेवर आणणे हा आमचा संकल्प असल्याचा आत्मविश्‍वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केला. दै.

Thursday, February 16, 2012 AT 10:31 PM (IST)

पणजी, ता. 16 ः मडगाव पालिका क्षेत्रातील सध्या सोनसोडो प्रकल्पातील कचऱ्याची विल्हेवाट 31 मेपूर्वी लावावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आज दिला. तेथे असलेला सुमारे 80 हजार टन कचरा तेथून 31 मेपूर्वी हटविण्याचे आव्हान मडगाव पालिकेसमोर आहे. दररोज 762 टन कचऱ्याची विल्हेवाट लावणे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या आदेशानुसार आवश्‍यक आहे.

Thursday, February 16, 2012 AT 10:30 PM (IST)

पणजी, ता. 16 ः कॉंग्रेसला मतदान करू नका, असे सांगणाऱ्या तथाकथित गोवा मुस्लिम फोरमला कोणताही हक्क नसून प्रत्येकाने त्याच्या निवडीनुसारच उमेदवाराला मतदान करा, असे आवाहन पणजीत आज (गुरुवारी) आयोजित मुस्लिमांच्या पत्रकार परिषदेत करण्यात आले.

Thursday, February 16, 2012 AT 10:28 PM (IST)

पणजी, ता. 16 ः सभापती प्रतापसिंह राणे आणि त्यांचे पुत्र आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्या रूपाने गोव्याच्या राजकारणावर छाप पाडलेल्या सत्तरी तालुक्‍यातील वाळपई आणि पर्ये या मतदारसंघांचा विकास बऱ्यापैकी झाला आहे. तथापि, तेथील मतदारांचा आवाज मात्र कांहीसा दबला असल्याचे चित्र आज या तालुक्‍याचा फेरफटका मारला असता दिसून आले. वाळपई मतदारसंघात नव्याने समावेश करण्यात आलेल्या उसगाव भागाचा विकास मात्र म्हणावा तसा झालेला नाही.

Thursday, February 16, 2012 AT 10:27 PM (IST)

पणजी, ता. 16 ः सौदर्यींकरण व पदपथावरील पार्किंग रोखण्यासाठी आता फुलझाडांच्या कुंड्यांचा वापर करण्यात येणार आहे. महापालिकेने हा प्रतिबंधात्मक उपाय शोधून काढला असून प्रायोगिक तत्त्वावर 18 जून रस्त्यावरील जुन्ता हाऊस इमारतीकडील बाजूस असलेल्या पदपथावर 19 कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. या कुंड्या सिमेंटच्या असून त्या आकाराने मोठ्या आहेत. पण अद्याप त्यात झाडे लावण्यात आलेली नाहीत.

Thursday, February 16, 2012 AT 10:26 PM (IST)

 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: