|
क्रीडा
पणजी, ता. 10  ः झटपट क्रिकेटमधील गोव्याचा यशस्वी क्रिकेटपटू डावखुरा फलंदाज सगुण कामत यावेळच्या जीपीएल क्रिकेट स्पर्धेतील सर्वांत महागडा खेळाडू ठरला आहे. या अनुभवी सलामीवीरासाठी साळगावकर स्पोर्टस क्लबने सर्वाधिक तीन लाख पाच हजार रुपये मोजले. जीपीएलच्या तिसऱ्या पर्वासाठी शुक्रवारी पर्वरी येथील जीसीए क्रिकेट अकादमी सभागृहात लिलाव प्रक्रिया झाली.
Friday, February 10, 2012 AT 10:53 PM (IST)
पणजी, ता. 9 ः लांबलेल्या जीपीएल क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वसाठी खेळाडूंचा लिलाव शुक्रवारी (ता. 10) होणार आहे. ट्वेंटी-20 व तीन दिवसीय स्पर्धेसाठी एकूण पाच फ्रॅंचाईजी संघ मैदानात उतरणार असून त्यांच्यात एकूण 59 खेळाडूंना खरेदी करण्यासाठी पर्वरी येथील जीसीए क्रिकेट अकादमी संकुलात चुरस असेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ज्युनियर स्पर्धांचे वेळापत्रक लाभल्यामुळे जीपीएल ट्वेंटी-20 यावेळेस डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झाली नव्हती.
Thursday, February 09, 2012 AT 10:36 PM (IST)
पणजी, ता. 8  ः कळंगुट समुद्रकिनारी गुरुवारी (ता. 9) व शुक्रवारी (ता. 10) बीच फुटबॉलचा थरार अनुभवायला मिळणार आहे. बाद फेरी पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील एकूण सोळा संघांत चुरस असेल. यामध्ये आय-लीग स्पर्धेत खेळणाऱ्या स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाचीही प्रवेशिका आहे. स्पर्धा "बीच सॉकर वर्ल्डवाईड'च्या नियमांनुसार खेळली जाईल. स्पर्धेतील विजेत्या संघाला 15 हजार रुपयांचे, तर उपविजेत्या संघाला 10 हजार रुपयांचे बक्षीस मिळेल.
Wednesday, February 08, 2012 AT 10:09 PM (IST)
मेलबर्न,7- मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर गेल्या एप्रिलपासून शंभराव्या शतकापासून जरी दूर असला तरी तो आजही ग्रेटच आहे, असे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टीव्ह वॉने आज (मंगळवार) म्हटले आहे. वॉ म्हणाला, 'सचिनच्या शंभराव्या शतकाकडे संपूर्ण जगातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. शतकांचा हा आकडा खूपच मोठा आहे. माझ्या मते, सचिनवर थोडेफार दडपण असल्यामुळेच शतक होण्यास वेळ लागत असावा. सचिन हा खरोखरच ग्रेट खेळाडू आहे, लवकरच त्याचे शंभरावे शतक पाहायला मिळेल.
Tuesday, February 07, 2012 AT 09:50 PM (IST)
लंडन, 7 - गर्भवती महिलेला मधुमेह असल्यास, मुलांमध्ये जन्मतः व्यंग निर्माण होऊ शकतो, असा निष्कर्ष एका संशोधनाअंती काढण्यात आला आहे. येथील न्यू कॅसल विद्यापीठाने हे संशोधन केले असून, "डायबेटॉलॉजीया' या वैद्यकीय विज्ञानविषयक नियतकालिकामध्ये हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या संशोधनासाठी ईशान्य लंडनमधील चार लाख गर्भवती महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
Tuesday, February 07, 2012 AT 09:49 PM (IST)
पर्थ, 7 - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत प्रभावी न ठरलेला आणि पहिल्या एकदिवसीय सामन्यात विश्रांती देण्यात आलेला भारतीय संघातील सलामीवीर वीरेंद्र सेहवाग श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. तिरंगी मालिकेत भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना बुधवारी होणार आहे. मेलबर्नमध्ये रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारताला ६५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
Tuesday, February 07, 2012 AT 09:48 PM (IST)
पणजी, ता. 6 ः नायजेरियन इदे चिदी याच्या अप्रतिम हेडरच्या जोरावर गतविजेत्या साळगावकर स्पोर्टस क्लबने पाचव्या आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील अपराजित मालिका दहा सामन्यापर्यंत नेली आणि चौथ्या स्थानापर्यंत प्रगतीही साधली. स्पर्धेच्या एकोणिसाव्या फेरीत फातोर्डा-मडगाव येथील नेहरू स्टेडियमवर त्यांनी कोलकत्याच्या प्रयाग युनायटेड क्लबला 1-0 असे हरविले. पुणे येथे मुंबई एफसी संघाने चर्चिल ब्रदर्सला 2-1 असा पराभवाचा जबरदस्त हादरा दिला.
Tuesday, February 07, 2012 AT 02:00 AM (IST)
मेलबर्न, ता.५ - ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यात आज (रविवार) भारतीय कागदी वाघांचा ऑस्ट्रेलियन कांगारूंनी तब्बल 65 धावांनी दणदणीत पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सरस कामगिरी करीत भारतासमोर 216 धावांचे आव्हान ठेवले होते. त्याचा पाठलाग करीत भारतीय फलंदाजांनी एकापाठोपाठ एक विकेट दिल्याने भारताला सर्वबाद 151 धावा करता आल्या.
Sunday, February 05, 2012 AT 06:54 PM (IST)
मेलबर्न, ता. ५ -  मॅथ्यू वेडचे आणि डेव्हिड हसीच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयसाठी २१७ धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताकडून विनय कुमारने तीन बळी मिळविले. तिरंगी मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत असलेल्या सलामीच्या या एकदिवसीय सामन्यात भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Sunday, February 05, 2012 AT 04:28 PM (IST)
नवी दिल्ली, ता. ५ - भारतीय संघातील फलंदाज युवराज सिंग याला कॅन्सर झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. युवराजचे फिजिओ जतिन चौधरी यांनी त्याला कॅन्सर झाल्याचे स्पष्ट केले आहे.   एका वृत्तवाहिनीशी बोलताना चौधरी यांनी त्याचा कॅन्सर गंभीर नसल्याचे म्हटले आहे. सध्या त्याच्यावर अमेरिकेत उपचार सुरु असून, किमोथेरेपी करण्यात आली आहे. त्याच्यावर मार्चपर्यंत किमोथेरेपी करण्यात येणार आहे. तसेच त्याच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया करण्यात येणार नाही.
Sunday, February 05, 2012 AT 04:27 PM (IST)
बंगळुरू, ता. ४ - आयपीएलच्या पाचव्या मोसमासाठी आज (शनिवार) येथे लिलावास सुरुवात झाली आहे. या लिलावात देश-विदेशातील १४४ क्रिकेटपटूंवर बोली लावण्यात येणार आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला आतापर्यंत झालेल्या लिलावात सर्वाधिक म्हणजे सुमारे १० कोटी रुपयांना चेन्नई सुपर किंग्जने विकत घेतले आहे.
Saturday, February 04, 2012 AT 08:15 PM (IST)
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रायोजक असलेल्या 'सहारा' इंडिया कंपनीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाबरोबर (बीसीसीआय) झालेल्या वादामुळे प्रायोजकत्व काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आयपीएलमधील पुणे वॉरियर्स संघाची मालकी रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आज (शनिवार) आयपीएलच्या पाचव्य मोसमासाठी होत असलेल्या लिलावापूर्वी सहाराने हा निर्णय घेत सर्वांनाच मोठा झटका दिला.
Saturday, February 04, 2012 AT 08:12 PM (IST)
पणजी, ता. 1  ः सामन्याच्या पहिल्या वीस मिनिटांत दोन गोलांनी पिछाडीवर पडलेल्या स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने नंतर झुंजार खेळ केला व पाचव्या आय-लीग फुटबॉल स्पर्धेत पुणे एफसी संघाला 4-2 असे पराजित केले. फातोर्डा-मडगाव येथील नेहरू स्टेडियमवर अठराव्या फेरीतील सामना बुधवारी झाला. सामना गमावल्यामुळे मागील अकरा सामन्यांत अपराजित असलेल्या पुणे एफसी संघाला प्रथमच गुण गमवावे लागले.
Wednesday, February 01, 2012 AT 02:00 AM (IST)
सिडनी, 1 - मॅथ्यू वेड याच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात भारतासमोर विजयासाठी १७२ धावांचे आव्हान ठेवले आहे. सिडनीतील ऑलिंपिक पार्क मैदानावर होत असलेल्या या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचे सलामीवार डेव्हिड वॉर्नर आणि मॅथ्यू वेड यांनी चांगली सुरुवात करून देत जोरदार फटकेबाजी केली.
Wednesday, February 01, 2012 AT 05:34 PM (IST)
कराची, 1 - जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या इंग्लंड संघाला पाकिस्तान पहिल्या दोन सामन्यातील विजयानंतर तिसऱ्या सामन्यातही विजय मिळवून व्हाईटवॉश देईल, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने व्यक्त केले आहे. आफ्रिदी म्हणाला, ''मला वाटतेय की, पाकिस्तान तिसऱ्या कसोटीतही इंग्लंडचा सहज पराभव करेल. पाकिस्तानला ही मालिका ३-० अशी जिंकण्याची चांगली संधी आहे. सध्याच्या संघातील खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करीत असून, त्यांना यश मिळत आहे.
Wednesday, February 01, 2012 AT 05:31 PM (IST)
लंडन, 27 - 1984 साली घडलेल्या भोपाळ वायू दुर्घटनेवरून डाऊ केमिकल्स या कंपनीच्या ऑलिंपिक 2012 च्या प्रायोजकत्वाला असलेला विरोध दिवसेंदिवस वाढत असला तरी कंपनीचे प्रायोजकत्व मागे घेतले जाणार नाही, असे आयोजकांनी आज (शुक्रवार) स्पष्ट केले.   यासंदर्भात लंडन ऑलिंपिकचे कार्यकारी अधिकारी म्हणाले,""आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने डाऊ केमिकल्ससोबत 10 कोटी पाऊंडचा करार केला आहे. कुणी राजीनामा दिला म्हणून करारावर फेरविचार करण्याची गरज नाही.
Friday, January 27, 2012 AT 08:53 PM (IST)
नवी दिल्ली ता. 25 - दिवंगत ज्येष्ठ गायक-संगीतकार भूपेन हजारिका, दिवंगत व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा, ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती यांच्यासह पाच जणांना पद्मविभूषण, प्रा. डॉ. शां. ब. मुजुमदार, धर्मेंद्र, शबाना आझमी, प्रा. शशिकुमार चित्रे, मीरा नायर यांच्यासह 27 जणांना पद्मभूषण, तर लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर, नाटककार सतीश आळेकर, उद्योजक अरुण फिरोदिया, प्रभाकर वैद्य आदींसह 77 जणांना या वर्षीचे पद्मश्री पुरस्कार बुधवारी जाहीर झाले.
Thursday, January 26, 2012 AT 02:01 AM (IST)
ऍडलेड ता. 25 - मायकेल क्लार्क आणि रिकी पॉंटिंग या आजी-माजी कर्णधारांनी भारतीय गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेताना शानदार द्विशतके झळकविली. त्यांच्या खेळामुळे चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला 7 बाद 604 असा धावांचा डोंगर उभारून डाव घोषित करता आला. त्यानंतर भारताची दुसऱ्या दिवसअखेर 2 बाद 61 अशी डळमळीत सुरवात झाली. त्यामुळे प्रतिष्ठा पणाला लागलेल्या टीम इंडियाच्या फलंदाजांची आता सत्त्वपरीक्षा लागणार आहे.
Thursday, January 26, 2012 AT 02:00 AM (IST)
ऍडलेड, 24 - भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात कसोटी कारकिर्दीतील ४१ वे शतक झळकाविणारा ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू रिकी पाँटिंग याने, आपला सध्या तरी निवृत्तीचा विचार नसल्याचे म्हटले आहे. पाँटिंग हा ३७ वर्षांचा असून, त्याने या शतकासह १३ हजार धावांचा टप्पाही पार केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील तिसरा खेळाडू आहे. गेल्या तीन कसोटी डावांमध्ये पाँटिंगने हे दुसरे शतक केले आहे.
Tuesday, January 24, 2012 AT 08:51 PM (IST)
नवी दिल्ली, 24 - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा विक्रम करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरऐवजी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस सर्वात प्रभावी फलंदाज असल्याचे म्हटले आहे.   भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऍडलेडमध्ये आजपासून सुरु झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यावेळी इयान चॅपेल यांच्यासमवेत समालोचन करताना गांगुलीने हे वक्तव्य केले आहे.
Tuesday, January 24, 2012 AT 08:50 PM (IST)
दिवस निश्चित करण्याचे अधिकार रणधीरसिंगना नवी दिल्ली, ता. 23 ः राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या संयोजनातील भ्रष्टाचारात अडकलेल्या सुरेश कलमाडी यांचे अस्तित्व निश्चित करण्यासाठी भारतीय ऑलिंपिक संघटनेने सोमवारी तातडीने कार्यकारी समितीची बैठक बोलाविण्याचा निर्णय घेतला. भ्रष्टाचाराच्या आरोपात तुरुंगात रवानगी झालेल्या कलमाडींची नऊ महिन्याने जामिनावर सुटका झाली. त्या वेळी त्यांनी "आयओए'च्या अध्यक्षपदी राहण्यास स्वारस्य नसल्याचे स्पष्ट केले होते.
Monday, January 23, 2012 AT 07:29 PM (IST)
मेलबर्न, ता. २३ - ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाने मिश्र दुहेरी आणि महिलांच्या दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सानियाने दुहेरीत एलेना वेसनिना हिच्यासह, तर मिश्र दुहेरीत महेश भूपतीसह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सानिया आणि भूपती यांनी २००९ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचे मिश्र दुहेरीचे विजेतेपद मिळविले होते.
Monday, January 23, 2012 AT 07:19 PM (IST)
चेन्नई, ता. २३ - गतविजेत्या राजस्थानने यावर्षी सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक जिंकण्यात यश मिळविले आहे. पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर राजस्थानने अंतिम सामन्यात तमिळनाडूचा पराभव केला. चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राजस्थानने पहिल्या डावात तमिळनाडूवर ३२९ धावांची आघाडी घेतली होती. राजस्थानच्या गोलंदाजांनी तमिळनाडूचा पहिला डाव २९५ धावांत संपुष्टात आणून संघाला विजयासाठी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली होती.
Monday, January 23, 2012 AT 07:18 PM (IST)
दुबई, ता. २३ - श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेचा पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यात पराभव केल्याने भारताला आय़सीसी एकदिवसीय क्रमवारीत दुसऱे स्थान मिळाले आहे. विश्वविजेत्या भारतीय संघाला श्रीलंकेचा याच मालिकेत दक्षिण आफ्रिकेने पहिल्या तीन सामन्यात पराभव केल्याने दुसरे स्थान गमवावे लागले होते. फलंदाजांच्या यादीत भारताचा विराट कोहली तिसऱ्या स्थानावर असून, महेंद्रसिंह धोनी पाचव्या स्थानावर आहे.
Monday, January 23, 2012 AT 07:14 PM (IST)
बंगळुरू, ता. २३ -  दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत ३-२ असा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार तिलकरत्ने दिलशान याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत भारताकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर श्रीलंकेच्या कर्णधारपदावरून कुमार संगकाराने राजीनामा दिला होता. त्यावेळी तिलकरत्ने दिलशानला कर्णधार बनविण्यात आले होते.
Monday, January 23, 2012 AT 07:13 PM (IST)
|