|
मनोरंजन
मुंबई. 1 - ज्येष्ठ संगीतकार अनिल मोहिले (वय 71) यांचे हृदयविकाराने राहत्या घरी निधन झाले. मराठी चित्रपटातील संगीत क्षेत्रात त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. त्यांनी आतापर्यंत 86 चित्रपटांचे संगीत संयोजन केले. अष्टविनायकपासून माहेरीची साडीपर्यंत तसेच थरथराट, दे दणादण, धडाकेबाज, झपाटलेला अशा अनेक चित्रपटाचे संगीत संयोजन विशेष गाजले. थोडिसी बेपर्वाई, अभिमान, लेकिन, डॉन, शराबी अशा अजरामर ठरलेल्या चित्रपटांसाठीही त्यांचे संगीत संयोजन होते.
Wednesday, February 01, 2012 AT 05:18 PM (IST)
मुंबई, 27   - अभिनेत्री विद्या बालनने आपल्या आगामी कहाणी या चित्रपटाची प्रसिद्धी चित्रपटातील गेट-अपवरच केली. 
Friday, January 27, 2012 AT 08:57 PM (IST)
मुंबई, 27 -  'वाय धीस कोलावेरी डी' म्हणत रातोरात तरुणांच्या गळ्यातला ताईत बनलेला रजनीकांतचा जावई धनुष आता हिंदी चित्रपटात आपले भविष्य आजमावणार आहे. त्याने नुकताच आपला पहिला वहिला चित्रपट साईन केला आहे.   दाक्षिणात्या चित्रपटांमधील लोकप्रिय अभिनेता आणि गायक धनुष दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.  रांझणा या रोमॅंटिक चित्रपटात तो भूमिका करतोय.
Friday, January 27, 2012 AT 08:55 PM (IST)
दू रचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिका असोत, की रिऍलिटी शो, आज भारतीय प्रेक्षकांना परदेशातून "आयात' केलेले कार्यक्रम बघण्याची सवय लागली आहे. पण मुळात "तिकडच्या' कल्पना उचलण्याची वेळ भारतीय वाहिन्यांवर का यावी? एक काळ असा होता, की घरातली एखादी गोष्ट इंपोर्टेड आहे, असं आवर्जून सांगितलं जाई. नंतर "हल्ली आपल्याकडेही सगळं मिळतं हो'चा जमाना आला.
Wednesday, January 25, 2012 AT 01:45 AM (IST)
नागपूर, 24 - कॉपीराइट कायद्याचा उल्लंघन केल्याने बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि प्रियांका चोप्रा यांची प्रमुख भूमिका असलेला "अग्निपथ' या हिंदी चित्रपटातील एका गाण्यावर जिल्हा सत्र न्यायालयाने बंदी घातली आहे. संबंधित गाणे वगळून चित्रपट प्रदर्शनाला न्यायालयाने परवानगी दिली आहे.   "अग्निपथ' चित्रपटातील "तेरी मेरी कहानी अधुरी...
Tuesday, January 24, 2012 AT 08:59 PM (IST)
पेडणे, ता. 18 - पोरस्कडे येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 वर (माऊली मंदिराजवळ) आज संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलची धडक बसून झालेल्या अपघातात अनंत बाळा हळदणकर (60 वर्षे) पादचारी ठार झाला, तर किशोर मोहन जाधव (26 वर्षे) मडुरा-बांदा (सिंधुदुर्ग) व पांडुरंग वामन महाले (37 वर्षे) हे मोटारसायकलस्वार व मागे बसलेला हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
Wednesday, January 18, 2012 AT 11:38 PM (IST)
पणजी, ता. 18- ज्येष्ठ संगीतकार अँथनी गोन्साल्विस (85 वर्षे) यांचे आज सायंकाळी उशिरा माजोर्डा येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचे पुत्र विदेशातून येथे पोचल्यावर त्याचा निर्णय घेतला जाणार आहे. बॉलीवूडमध्ये ऑर्केस्ट्रा ही संकल्पना सुरवातीला गोन्साल्विस यांनी आणली होती. त्याचमुळे लक्ष्मीकांत आणि प्यारेलाल त्यांना गुरुस्थानी मानत. एस. डी. बर्मन यांच्यासोबतही गोन्साल्विस यांनी काम केले होते.
Wednesday, January 18, 2012 AT 11:37 PM (IST)
व्यंगचित्र -  अभिजीत घुले ----------------------------------------------------------------------------------- व्यंगचित्र -  बापू घावरे ----------------------------------------------------------------------------------- व्यंगचित्र -  अजय बारी ----------------------------------------------------------------------------------- व्यंगचित्र -  खलिल खान ----------------------------------------------------------- ...
Sunday, January 08, 2012 AT 09:08 PM (IST)
मुंबई, 28 - सहारा वन वाहिनीवर लवकरच सुरू होणारा "सूर क्षेत्र" हा कार्यक्रम वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. या संगीताच्या कार्यक्रमात पाकिस्तानी गायकांना सहभागी करून घेतले जाणार आहे. शिवसेनेच्या चित्रपट सेनेने कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराला कार्यक्रमात अथवा चित्रपटात सहभागी करून घेण्यास विरोध असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे हा कार्यक्रम कितपत सुरळीत होतोय याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.
Wednesday, December 28, 2011 AT 08:42 PM (IST)
पणजी, ता. 19 - "चुपके चुपके रात-दिन आसू बहाना याद है' ही रसिकांनी फर्माईश केलेली अत्यंत लोकप्रिय गझल गाऊन गझलसम्राट गुलाम अली यांनी आज मैफलीत रंग भरला. गोवा मुक्तिदिन सुवर्णमहोत्सवानिमित्त आज रात्री कांपाल मैदानावर गुलाम अली यांची गझल ऐकण्यासाठी रसिकांनी गर्दी केली होती. खुर्च्या रिकाम्या नसल्याने काही रसिकांनी रेड कार्पेटवर बसून गझलांचा आनंद लुटला. कार्यक्रमाच्या सुरवातीला त्यांनी गोवा मुक्तिदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
Monday, December 19, 2011 AT 11:20 PM (IST)
पणजी, ता. 15 (प्रतिनिधी) ः "अल्ला के बंदे' आणि अन्य एकापेक्षा एक सुरेल गाण्यांचा, सुफी संगीताचा नजराणा सादर करून आज प्रसिद्ध सुफी गायक कैलास खेर यांनी येथील कांपाल मैदानावर रसिकांना खुर्चीला खिळवून ठेवले. गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या संगीताच्या मैफलींच्या कार्यक्रमांना आज प्रारंभ झाला. संध्याकाळी साडेआठच्या दरम्यान सुरू झालेला श्री.
Friday, December 16, 2011 AT 01:12 AM (IST)
मुंबई - 'पप्पू कान्ट डान्स साला' या चित्रपटाच्या प्रसिध्दी कार्यक्रमात अभिनेत्री नेहा धूपीया ही येथे उपस्थित होती.
Wednesday, December 14, 2011 AT 06:15 PM (IST)
पणजी, ता. 2   ः इफ्फीत सुधारणांचे पर्व सुरू झाले असून, स्वतःहून महोत्सवात चित्रपट दाखवण्यासाठी संपर्क साधणाऱ्यांची संख्या वाढते म्हणजे इफ्फीचा दर्जा वाढतो आहे व तसे संदेश जगाच्या पाठीवर जात आहेत. ग्लॅमर आले नाही तरी सृजन येथे येत आहेत, असा दावा प्रसिद्धी निर्माते विधू विनोद चोप्रा यांनी आज येथे केला.  श्री.
Saturday, December 03, 2011 AT 12:29 AM (IST)
पणजी, ता. 1 ः भारतातील बालकांना ग्रासणारी गरिबी या विषयावरील "अनादर प्लॅनेट' या विषयावरील ब्रिटनमधील निर्माते जॅमी नटगेन्स यांच्या लघुपटाला इफ्फीतील शॉर्ट फिल्म सेंटरचा सोनेरी दिव्याचे पहिले बक्षीस मिळाले. स्मिता भिडे यांनी हा लघुपट दिग्दर्शित केला असून आंतरराष्ट्रीय स्पर्धा वर्गवारीत त्यांचा चित्रपट अव्वल ठरला.  गोवा मनोरंजन सोसायटीने आयोजित केलेल्या या स्पर्धेचे परीक्षण दिग्दर्शक बासू चटर्जी यांच्या नेतृत्वाखालील परीक्षक मंडळाने केले.
Friday, December 02, 2011 AT 02:00 AM (IST)
पणजी, ता. 1   ः संपूर्ण पूर्वांचलमध्ये हिंदी सिनेमावर बंदी आहे. थिएटर्सही फार कमी आहेत. परंतु गेल्या वर्षी मी इफ्फीत प्रतिनिधी म्हणून आलो आणि यंदा माझा चित्रपट इंडियन पॅनोरमातून देश विदेशी प्रतिनिधी पाहात आहेत. गोवा इफ्फीने खूप समाधान दिले आणि व्यासपीठही मिळाले. मणिपुरी चित्रपट "फी जिगी मणी' या चित्रपटाचे दिग्दर्शक ओ गौतम सिंग यांचे हे भावपूर्ण उद्गार आहेत.
Friday, December 02, 2011 AT 01:45 AM (IST)
कॅ न्सरपीडित तिझियानो तेरझानी याचे जगायचे थोडकेच दिवस राहिलेले आहेत. काही अंतरावर उभा असलेला मृत्यू हा "मित्र आहे, आयुष्यात घडायची असलेली एक नवीन गोष्ट आहे,' अशी प्रगल्भ जाणीव त्याच्या मनात रुजली आहे.
Friday, December 02, 2011 AT 01:30 AM (IST)
स्व स्त भोजन नाही, चहा-नाश्ताही महाग. साध्या पाण्याच्या बाटलीला आयनॉक्स प्राकारातील जुन्या गोमेकॉ इमारतीत एक दर, तर प्रांगणात दुसरा दर. पाच-दहा रुपयांचा फरक ते का? शिवाय वाहतूक व्यवस्थेचा घोळ, प्रतिनिधीच नव्हे तर पाहुण्यांचे आतिथ्य बरोबर केले जात नाही. एक ना हजार तक्रारी तरीही एकच सूर, एकमताचा ठराव "इफ्फी गोव्यातच राहावा' ओपन फोरममध्ये यू. राधाकृष्णन यांनी मंजूर करून घेतलेला.
Friday, December 02, 2011 AT 01:00 AM (IST)
पणजी, ता. 1 ः लोकप्रशंसा हा चित्रकर्मींसाठी सर्वात मोठा पुरस्कार असतो, असे उद्गार "सेंगदल' चित्रपटाच्या दिग्दर्शिका लीना मनीमेकलाई यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या, हा चित्रपट म्हणजे रामेश्वरच्या धनुष्यकोडी येथील मच्छीमारांच्या संघर्षाचा दस्तऐवज आहे.  धनुष्यकोडी आणि रामेश्वरम मंडपम शिबिरातील मच्छीमार आणि शरणार्थींनी या चित्रपटात अभिनय केला असून लेखन प्रक्रियेतही सहभाग घेतला आहे, अशी माहिती देऊन त्या म्हणाल्या, सेंगदल म्हणजे मृत सागर.
Thursday, December 01, 2011 AT 11:40 PM (IST)
पणजी, ता. 30 ः देशात हाताळण्यासाठी विषय अनेक आहेत, पण चित्रपटनिर्मितीसाठी वित्त पुरवठा लागतो आणि तो सहजासहजी मिळत नाही. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) पाठिंबा देत असल्याने स्थानिक भाषांत दर्जेदार चित्रपट निर्मिती होते, अशी माहिती "ही' या भोजपुरी चित्रपटाचे दिग्दर्शक मंगेश जोशी यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत बालकलाकार मदन देवधर आणि चित्तरंजन गिरी होते. जोशी म्हणाले, सुरवातीला चित्रपटाचे नाव हिरो ठरविले होते.
Thursday, December 01, 2011 AT 02:00 AM (IST)
पणजी, ता. 30 ः दिल्ली, आग्रा आणि जयपूर या त्रिकोणावर यापुढे चित्रपट करणार आहे. त्याची पूर्वतयारी व पटकथा तयार आहे, अशी माहिती "यू डोण्ट बिलॉंग' चित्रपटाचे दिग्दर्शक स्पंदन बॅनर्जी यांनी आज येथे दिली. यावेळी त्यांच्यासोबत पटकथेच्या लेखिका रूपलीना बोस होत्या.  बॅनर्जी म्हणाले, या चित्रपटाचा प्रिमिअर न्यूयॉर्कमधील ट्रायबेका महोत्सवात झाला. आता चीनमधील महोत्सवात सध्या चित्रपट दाखविण्यात येत आहे. संगीताचा प्रवास मांडणारा हा चित्रपट आहे.
Thursday, December 01, 2011 AT 01:30 AM (IST)
नवरा-बायकोमधील बेदीली घटस्फोटापर्यंत पोचते तेव्हा त्या दुःखाचे चटके त्या दोघांना सोसावे लागतातच, परंतु त्यात सर्वांत जास्त परवड होते ती त्यांच्या मुलाची. आईवडिलांच्या प्रेमाला आचवल्याने मुलांचे उद्ध्वस्त होणारे भावविश्व सावरावे कसे, त्यांच्या प्रेमाची भूक भागवावी कशी, असे अस्वस्थ प्रश्नही या परवडीला लगटून येतात.
Thursday, December 01, 2011 AT 01:15 AM (IST)
कित्येक वर्षे अंतरातच कुठेतरी गाडून गेलेल्या प्रेमाला आयुष्याच्या संध्याकाळी अकस्मातच आलेली जाग, त्यातून स्वतःचाच धांडोळा देत सामोरे येणारे क्षण आणि ते सारे उद्ध्वस्त होत जाण्याचा प्रवास अस्वस्थ तरलपणाने टिपणारा "व्होल्कानो' हा आइसलॅंडचा चित्रपट. थोडा संथ वाटणारा पण मनाचा ठाव घेणारा.   हेन्स (थिओडोर ज्युलिउसान) सेवानिवृत्त झाल्यानंतर अंगावर आलेल्या प्रचंड मोकळ्या वेळाखाली दबलेला आहे. काहीशा उग्र, आपल्या मुलांशीही तुसडेपणाने वागणारा.
Thursday, December 01, 2011 AT 01:00 AM (IST)
मुंबई, ता. 30 - एकाच चित्रपटात जर दोन नायिका असतील, तर त्यांचं काही फारसं बरं चालत नाही म्हणतात. आत्तापर्यंत बॉलिवूडमध्ये अशी उदाहरणं पाहिलेली आहेत. नुकत्याच रिलीज झालेल्या "देसी बॉईज'मध्ये चित्रांगदा सिंह आणि दीपिका पदुकोण यांनी एकत्र काम केलं होतं. चित्रपटात त्यांचं चांगलं पटत तर होतंच, अगदी स्क्रीनच्या मागेही दोघींना एकमेकांपासून काही प्रॉब्लेम नाही, असं भासवत होत्या. मात्र त्यांच्या एकाच फॅशनवरून त्यांच्यात फॅशन वॉर रंगलंय असं वाटत होतं.
Wednesday, November 30, 2011 AT 10:44 PM (IST)
मुंबई, ता. ३० - सलमान खान म्हटलं तर तापट डोक्याचा माणूस... पण त्याचा एक चांगला गुण म्हणजे एकदा का कोणी त्याच्याबरोबर काम केलं, तर त्याला तो विसरत नाही. फिल्म इंडस्ट्रीत त्याला नक्की पुन्हा काम मिळतं. कतरिना कैफवरून सगळ्यांनाच हे माहीत आहे. सध्या "बॉडीगार्ड'चा दिग्दर्शक सिद्दीकीच्या तो फेवरमध्ये आहे. "बॉडीगार्ड'मध्ये काम करतानाच सलमानने ठरवलं होतं की सिद्दीकीबरोबर पुन्हा काम करायचं. आपल्या बिझी शेड्यूलमधून सलमानने सिद्दीकीसाठी वेळ काढला.
Wednesday, November 30, 2011 AT 10:56 PM (IST)
|