Last Update:
 
Search Tag:     Section:  
 
  From Date:     To Date:    
Total Results: 940
पणजी, ता. 21 - कॉंग्रेसने जाहीरनाम्यातूनही पुन्हा जनतेची फसवणूक केली आहे. 2007 मधील जाहीरनाम्यातील 70 टक्के आश्वासने आताही देण्यात आली आहेत. गेल्या सात वर्षांत कॉंग्रेसच्या सरकारने काहीही केले नसल्याचीच ही कबुली असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रचार प्रमुख श्रीपाद नाईक यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. विल्फ्रेड मिस्कीता होते. नाईक म्हणाले, शांताराम नाईक यांना भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. कॉंग्रेसचे मंत्री लुटत आहेत. ती लूट बंद झाली आणि स्वच्छ प्रशासन दिले, तर या रकमेपैकी अर्ध्या रकमेतच दिलेली आश्वासने पूर्ण करता येतील. दयानंद सामाजिक सुरक्षा योजना भाजपनेच सुरू केली आहे. भाजपने त्या योजनेंतर्गत मासिक 2 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिल्याने, कॉंग्रेसने अडीच हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. या योजनेची पावणीच कॉंग्रेस घातली आहे. ही रक्कम वाढवण्याचा ठराव भाजपने विधानसभेत मांडला होता, त्यावेळी कॉंग्रेसने त्याला विरोध केला होता, हे जनतेला ठाऊक आहे. त्यामुळे कॉंग्रेसची नियत साफ नाही हे दिसून येते.
Tuesday, February 21, 2012 AT 11:04 PM (IST)
पणजी, ता. 21 - प्रादेशिक आराखडा 2021 पूर्णपणे रद्द करून तज्ज्ञांच्या नव्या समितीद्वारे जुन्या आराखड्याचा आढावा घेऊन नवीन आराखड्याची बांधणी करण्यास तृणमूल कॉंग्रेस कटिबद्ध असल्याचे ठाम निवेदन आज तृणमूल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ.विल्फ्रेड डिसोझा यांनी येथे केले. "गोमन्तक'तर्फे आयोजित केलेल्या "निवडणूकनामा' कार्यक्रमात डॉ. डिसोझा सहभागी झाले होते. गोमन्तक कार्यालयात त्यांनी विधानसभा निवडणुकीचे वातावरण, निवडणुकीतील प्रमुख मुद्दे, अपेक्षित निकाल या विषयावर "गोमन्तक'मधील कर्मचाऱ्यांशी त्यांनी सुसंवाद साधला. "प्रादेशिक आराखडा 2021' तयार करताना अंतिम टप्प्यात हस्तक्षेप कसा झाला आहे, ते नियोजनकार एडगर रिबेरो यांनी सरकारला लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले असून, आराखडा पूर्णपणे रद्द करणे हाच त्यावर उपाय आहे. दुरुस्त्या करणे म्हणजे कॉस्मेटिक सर्जरी- वरकरणी कृत्रिम बदल करण्यासारखे आहे आणि तसे करणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्‍त केले.
Tuesday, February 21, 2012 AT 11:03 PM (IST)
म्हापसा, ता. 21 : कालवी-कारोणा पुलाच्या बांधकामासाठी आवश्‍यक असलेली जमीन वापरण्यासाठी हळदोणे पंचायतीने विनंती केल्यानंतर दहा दिवसांच्या आत हळदोणे कोमुनिदादीने ना हरकत दाखला दिल्याचे स्पष्ट करून, कालवी बस दुर्घटनेला आमदार ऍड. दयानंद नार्वेकरच जबाबदार असल्याचा आरोप हळदोणे कोमुनिदादीचे खास ऍटर्नी मेल्विन फर्नांडिस यांनी आज येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला. ऍड. नार्वेकर यांनी काल (ता. 20) केलेल्या आरोपांचे त्यांनी खंडन केले. कारोणा-कालवी नदीवरील नियोजित पुलाच्या बांधकामासाठी आवश्‍यक असलेली जमीन वापरण्यासाठी ना हरकत दाखला द्यावा, अशी विनंती हळदोणे पंचायतीने 16 ऑक्‍टोबर 2009 रोजी पत्राद्वारे केल्यानंतर 26 ऑक्‍टोबर 2009 रोजी कोमुनिदादीने ना हरकत दाखला दिल्याचे मेल्विन फर्नांडिस यांनी पत्रकारांना ना हरकत दाखल्याच्या प्रती देऊन स्पष्ट केले व आमदार ऍड. नार्वेकर यांनी स्वत:च्या अपयशाचे खापर हळदोणे कोमुनिदादीवर मारू नये, असा सल्ला फर्नांडिस यांनी दिला. कारोणा-कालवी पुलाचे बांधकाम लवकर व्हावे अशी ऍड.
Tuesday, February 21, 2012 AT 11:01 PM (IST)
पणजी, ता. 21ः कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याने सरकार स्थापन करण्यासाठी छोट्या पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार असून, गोवा विकास पार्टीच्या पाठिंब्याशिवाय आगामी सरकार सत्तेवर येणे कठीण असेल, असा विश्‍वास गोवा विकास पार्टीच्या (गोविपा) अध्यक्ष व्हियोला पाशेको व पक्षाचे सरचिटणीस लिंडन मोंतेरो यांनी "गोमन्तक निवडणूकनामा' कार्यक्रमात व्यक्त केला. निवडणुकीनंतर कोणत्या पक्षाजवळ सरकार स्थापन करण्याची क्षमता असेल हे सांगता येत नसले तरी कोणताही पक्ष (भाजपसह) गोविपासाठी "अस्पृश्‍य नाही', असेही त्यांनी स्पष्ट केले. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणीत सरकारचे मोंतेरो यांनी कौतुक केले. "आम्ही कॉंग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांची सरकारे पाहिली आहेत. यात पर्रीकर यांचे सरकार निश्‍चितच उजवे होते. हे सरकार लोकाभिमुख, विकासाभिमुख होते. पण, निवडणुकीचा निकाल सांगता येत नाही. कोणाला बहुमत मिळेल हे अनिश्‍चित आहे. कोणती परिस्थितीत तेव्हा निर्माण होईल, पुढे काय घडेल सांगणे कठीण आहे', अशा शब्दात मोंतेरो यांनी निवडणुकीनंतरची पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
Tuesday, February 21, 2012 AT 11:01 PM (IST)
पणजी, ता.20 - गोवा सरकारच्या मेडिक्‍लेम योजनेची रक्कम 7 लाख रुपयांवर नेणार, स्वर्णजयंती सामाजिक सुरक्षा योजना कुटुंब निधीत 1 लाख रुपयांपर्यंत वाढ, अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय तसेच व वार्षिक 1 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्या कमकुवतांना 150 युनिटस्‌पर्यंत मोफत वीज, पाणी इत्यादी घोषणांचा समावेश असलेला कॉंग्रेस पक्षाचा जाहीरनामा आज कॉंग्रेस निवडणूक अधिकारिणी प्रमुख ऑस्कर फर्नांडिस यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. पूर्वेपासून पश्‍चिमेपर्यंत व उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत मोनोरेल प्रकल्प, हळदोणे येथील कालवी नदीवर पूल इत्यादी साधनसुविधा बांधणीचे आश्‍वासनही या जाहीरनाम्यातून देण्यात आले आहे. मागील पानावरून पुढे जाणाऱ्या कॉंग्रेस सरकारच्या या जाहीरनाम्यात पेडणे क्रीडानगरी, राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान वसाहतीचा उल्लेख नाही हे विशेष.
Tuesday, February 21, 2012 AT 04:45 AM (IST)
1 2 3 4 5 ...
 
 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: