Last Update:
 
साप्ताहिक भविष्य (सूर्य रास)

मेष (मार्च २१ - एप्रिल २०)
तरुण-तरुणीचा विवाह ठरेल सप्ताहात अमावस्येचे गांभीर्य राहील. अश्‍विनी नक्षत्रास सप्ताह घटना वा परिस्थितीतून मानसिक दडपण ठेवेल. आजची संध्याकाळ घरी व दारी वादग्रस्ततेची. नोकरीतील हितशत्रुपीडा सतावेल. दि. 26 चा गणेश जयंतीचा दिवस भरणी नक्षत्रास एक उत्तम शुभमुहूर्त. पुत्रोत्कर्ष होईल. घरातील कोणा तरुण-तरुणीचा विवाह ठरेल. व्यावसायिक धनचिंता मिटेल.
वृषभ (एप्रिल २१ - मे २१)
घरातील लहान मुले सांभाळा ग्रहयोगांतर्गत खळबळीचा सप्ताह वाटतो. कोणतीही मस्ती अंगाशी येऊ शकते. घरातील लहान मुले सांभाळा. सप्ताह गृहिणींना प्रचंड मानसिक दडपणाचा. अमावस्येजवळ आगीपासून जपा. मृग नक्षत्रास दि. 22 व दि. 23 हे दिवस खराब. दि. 26 ची गणेश जयंती रोहिणी नक्षत्रास वैयक्तिक भाग्योदयाची. मोठे आदरसत्कार. कृत्तिका नक्षत्रास शनिवार प्रवासाचा.
मिथुन (मे २२ - जून २१)
स्पर्धा परीक्षात मोठे यश दि. 22 व दि. 23 जानेवारी 2012 हे दिवस अमावस्येचे एक मानसिक वावटळ ठेवतील. प्रचंड संशयग्रस्त व्हाल. आजार व्याधीची छाया ग्रासेल. शेजाऱ्यापाजाऱ्याची दहशत अस्वस्थ करेल. आर्द्रा नक्षत्र प्रथम, द्वितीय चरण व्यक्तींना जाणवतील अशी फळे मिळू शकतात. बाकी गणेशजयंतीचा दिवस विद्यार्थ्यांना आत्यंतिक शुभ राहील. स्पर्धापरीक्षांतून मोठे यश. नोकरीचा लाभ. मृग नक्षत्रास विवाहयोग.
कर्क (जून २२ - जुलै २२)
फसवणुकीपासून जपा दि. 23 जानेवारीची पौषी अमावस्या खोल खोल पाण्यासारखी. अर्थात परिस्थितीचे गांभीर्य वाढविणारी. फसवणुकीपासून जपा. मूर्ख मित्रांमुळे अडचणीत येऊ शकता. पुष्य नक्षत्रास सप्ताह नैसर्गिक गोष्टींची साथ न देणारा. सतत विचित्र अडथळे. घरातील गोष्टींमुळे बेरंग. बाकी दि. 26 ची गणेश जयंती गाठीभेटी, मुलाखती तसेच वैयक्तिक विशिष्ट सुवार्तांतून शुभ. शनिवार आश्‍लेषास स्त्रीविरोधी.
सिंह (जुलै २३ - ऑगस्ट २१)
परदेशगमनाचा योग दि. 23 च्या अमावस्येजवळपास राशीत मंगळ वक्री होत आहे. दि. 22 ते दि. 24 जानेवारी 2012 हे दिवस अनेक माध्यमांतून पोळणारेच. राशीतील सर्व नक्षत्र गटांनी काळजी घेतलेलीच बरी. बाकी पूर्वा नक्षत्रास दि. 25 व दि. 26 जानेवारी 2012 हे दिवस अतिशय शुभसंबंधित. विद्यार्थ्यांना, तसेच इतर तरुणतरुणींना हे दिवस जीवनातील मोठ्या संधी आणणारे. परदेशगमन.
कन्या (ऑगस्ट २२ - सप्टेंबर २३)
व्यावसायिक लाभाची शक्‍यता सप्ताहातील अमावस्येमुळे ग्रहयोगांतर्गत दबाव प्रचंड राहील. सप्ताह तरुणांना संसर्गजन्य बाधेचा. विचित्र खुपणाऱ्या शारीरिक व्याधींतून त्रास शक्‍य. दि. 22 ते दि. 24 जानेवारी 12 हे दिवस एकूणच शुभग्रहांचे पाठबळ नसणारेच. प्रवासात जपा. उत्तरा नक्षत्रास अमावस्येचे गांभीर्य राहील. बाकी हस्त नक्षत्र दि. 26 च्या गणेश जयंतीजवळ व्यावसायिक लाभ उठवेल. वास्तुयोग.
तूळ (सप्टेंबर २४ - ऑक्टोबर २३)
संमिश्र ग्रहमानाचा कालखंड दि. 22 ते दि. 24 हे अमावस्येच्या प्रभाव क्षेत्रातील दिवस जबरदस्त उपद्रवमूल्य असलेले. घरातील व्यक्तींचे एक व्हायरस राहील. क्वचित एखादी कुवार्ता अस्वस्थ करेल. बाकी स्वाती नक्षत्र दि. 25 व दि. 26 या दिवसात मोठ्या शुभघटनांतून चर्चेत राहील. नोकरीत सन्मानित व्हाल. वसंत पंचमीचा शनिवार यंत्र वा वाहनपीडेचा.
वृश्चिक (ऑक्टोबर २४ - नोव्हेंबर २२)
वास्तूविषयक व्यवहार होतील दि. 23 च्या अमावस्येजवळ सिग्नल्स विचित्र पडतील. सतत धडपडाल. रस्त्यावर जपाच. आईवडिलांशी मतभेद होतील. अनुराधा नक्षत्र अमावस्येजवळ अतिशय हळवे बनेल. स्त्री वर्गास अमावस्या व्याकूळ करणारी. बाकी दि. 25 व दि. 26 हे दिवस एकूणच आपल्या राशीस शुभ. घरात एखादा आनंदोत्सव होईल. वास्तूविषयक व्यवहार होतील.
धनु (नोव्हेंबर २३ - डिसेंबर २२)
कलाकारांचा मोठा सन्मान होईल दि. 22 ते दि. 23 जानेवारी 12 हे अमावस्येच्या प्रभावक्षेत्रातील दिवस. मूळ नक्षत्रास घरात अशांततेचे. काहींना विचित्र जागरणाचे प्रसंग येतील. मौल्यवान चीजवस्तूंची नासधूस होईल. बाकी दि. 25 ते दि. 27 जानेवारी 12 हे दिवस पूर्वाषाढा नक्षत्रास गोड गोड बातम्यांचे. तरुणांना सर्व बाबतींत शुभसंबंधित. प्रेमिकांना अतिशय संवेदनशील असे ग्रहमान. कलाकारांचे मोठे सन्मान होतील.
मकर (डिसेंबर २३ - जानेवारी २०)
धनलाभ व ओळखीतून फायदा सप्ताहारंभी अमावस्येचा जबरदस्त होल्ड राहील. कोणताही अतिरेक टाळा. मंगळाची स्थिती धोकादायकच राहील. आगीपासून जपा. उत्तराषाढा नक्षत्र व्यक्ती प्रचंड दडपणाखाली येणार आहेत. बेसावधता टाळा. बाकी श्रवण नक्षत्रास शुक्रभ्रमण वसंतागमनातून प्रसन्न करणारे. धनलाभ होतील. स्त्रीकडून आदर सत्कार होतील. तरुणांना ओळखीमध्यस्थीतून मोठे लाभ होतील. शनिवारी पोलिसांचा जाच.
कुंभ (जानेवारी २१ - फेबृवारी १९)
तरुणांना खास यश देणारा सप्ताह अमावस्येचे आवर्त वादग्रस्त मंडळींना सतावू शकते. विशेषतः नोकरीतील वादग्रस्त प्रकरणे सतावू शकतात. बाकी वसंतागमनाच्या सप्ताहात राशीच्या शुक्रभ्रमणाचा एक विशेष अधिकार राहील. दि. 25 ते दि. 27 हे दिवस शततारका नक्षत्रास अतिशय वेचक, वेधक फळे देणारे. सर्व स्तरांवरील वर्चस्व वाढेल. तरुणांना जीवनातील खास असे यश देणारा सप्ताह. शनिवारी पायाच्या दुखापती जपा. पूर्वाभाद्रपदा नक्षत्र टार्गेट होईल.
मीन (फेबृवारी २० - मार्च २०)
सरकारी कामे मार्गी लागतील शनी आणि मंगळ या महासत्ता आपल्या बाबतीत काटेकोर होत जाणार आहेत. अर्थात त्यांची मोर्चेबांधणी सुरू होत आहे. दि. 22 ते दि. 24 या अमावस्येच्या प्रभाव क्षेत्रात याचीच लक्षणे दिसतील. अपवादात्मक परिस्थितीचे सतत भान ठेवा. तरुणांनी बेभान होऊ नये. उत्तरा भाद्रपदा नक्षत्रास दि. 23 ची अमावस्या काटेरी. रेवती नक्षत्र सप्ताहात अतिशय हळवे बनेल.
 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2011 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: