|
विशेष लेख
भारतीय जनता पक्षाने प्रसृत केलेला निवडणूक जाहीरनामा आम आदमी आणि विशेषतः महिलांना जाम खूश करणारा आहे. गेल्या वर्षी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी योजना, सवलतींचा वर्षाव करून सर्वांनाच खूश करणारा अर्थसंकल्प सादर केला होता. रोजच्या चर्चेत नसणारा,समाजामध्ये ठळकपणे न दिसणारा घटकही अर्थसंकल्पाच्या "आनंदस्पर्शा'तून सुटणार नाही याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली होती.
Tuesday, February 21, 2012 AT 03:30 AM (IST)
विधानसभा निवडणुकीचा प्रचार केव्हाच सुरू झाला आहे. या आठवड्यात कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्षांनी आपले जाहीरनामे प्रकाशित केले. त्याच लोकांसाठी आश्वासनांची खैरात करण्यात आली असली, तरी प्रचारात यापूर्वीच मुद्दे वाहून गेल्याचे चित्र आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने 23 डिसेंबरला निवडणुकीची घोषणा केली आणि इच्छुकांनी 24 डिसेंबरपासून मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
Monday, February 20, 2012 AT 11:18 PM (IST)
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी देशातील 1 कोटी 60 लाख मुले अजूनही शाळेत जात नसल्याचे नुकतेच एका कार्यक्रमात जाहीर केले. केंद्रीय मंत्र्यांच्या या प्रकटनामुळे शाळाबाह्य मुलांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुळात यापूर्वीही शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. शासकीय पातळीवर विविध उपक्रमही राबविण्यात आले. पण ही संख्या घटण्याऐवजी वाढतानाच दिसत आहे.
Monday, February 20, 2012 AT 11:17 PM (IST)
संयुक्त राष्ट्र संघाने 2012 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरविले. त्यानुसार जगातील सर्वच देशांमध्ये हे वर्ष सहकार वर्ष सहकार चळवळीला वाहिलेले आहे. त्यानुसार जगभर सहकार चळवळीविषयी कार्यक्रम ठरविले जात आहेत. याचे औचित्य साधून "सहकार भारती'ने देखील संयुक्त राष्ट्रसंघाच्या संमतीने आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन केले आहे. संपूर्ण जगभरातून अत्यंत उत्साहात या परिषदेला प्रतिसाद मिळत आहे.
Wednesday, February 08, 2012 AT 10:33 PM (IST)
नि वडणुकीच्या निमित्ताने राजकारण ढवळून निघत आहे. राजकारणाची तत्त्वे आणि प्रत्यक्षातील राजकारण यांच्यातील तफावतीची दरी सध्या रुंदावू लागली आहे. त्यामुळे सर्वसामान्य मतदारांवर संभ्रमित होण्याची वेळ आली आहे. दोन महिन्यांपूर्वी विधानसभेची निवडणूक जाहीर झाली नि आपल्या मतदारसंघात अद्याप विकास व्हायचा असल्याचा साक्षात्कार सर्वांनाच झाला. आम्ही हे करू ते करू असे आश्वासने देत दारोदार फिरणारे उमेदवार गल्लोगल्ली दिसू लागले आहेत.
Tuesday, February 07, 2012 AT 04:45 AM (IST)
"प्र गतशील महाराष्ट्र' या सदरात मुख्यमंत्र्यांनी "शाश्वत विकास' व "व्यापक सामाजिक हिताचे राजकारण' यावर भर दिला, हे स्वागतार्ह आहे. पण त्यांच्या मांडणीत आरोग्य, शिक्षण यांचा अनुल्लेख खटकला. खरे तर शाश्वत विकासात त्यांना अग्रक्रम असायला हवा. महाराष्ट्रातील परिस्थिती याबाबत चिंताजनक आहे.
Tuesday, January 31, 2012 AT 04:45 AM (IST)
मं डल आणि मंदिर या मुद्द्यांभोवती 1990च्या दशकातले देशाचे राजकारण केंद्रित झालेले दिसते. या मुद्द्यांच्या राजकारणाचे केंद्र उत्तर प्रदेश होते. या काळात तेथे दलित, ओबीसी आणि उच्चजातीय या जनसमूहांच्या राजकीय आकांक्षा टोकदारपणे व्यक्त झाल्या. सामाजिक न्याय आणि हिंदुत्व या दोन विचारप्रणालींच्या आधारे दलित, ओबीसी व उच्चजातीय समाजगटांचे राजकीय संघटन या काळात केले गेले.
Monday, January 30, 2012 AT 02:45 AM (IST)
पा च राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया सध्या सुरू आहे. सर्वांचे लक्ष मार्चमध्ये लागणाऱ्या त्यांच्या निकालांकडे आहे. हे निकाल केवळ पाच राज्यांमधील सरकारपुरते मर्यादित नाहीत. केंद्रातील सत्तारूढ डॉ. मनमोहनसिंग सरकारच्या स्थैर्याशीही ते निगडित आहेत. अशी स्थिती निर्माण होण्याचे कारण काय? या निवडणुकांच्या निमित्ताने काही वेगळीच राजकीय समीकरणे आकाराला आलेली दिसत आहेत.
Monday, January 30, 2012 AT 02:30 AM (IST)
पणजी, ता. 27 ः गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय उपकरणे हाताळण्यासाठी कर्मचाऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण वेळोवेळी दिले जात नसल्याने अपघात घडत असल्याची माहिती पुढे आली आहे. इस्पितळात नवीन उपकरणे आणल्यानंतर ती कशी हाताळावीत, याची माहिती परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांना दिली जात नाही. काही वरिष्ठ डॉक्टरांनाच त्याची माहिती असते. पण त्यांच्या गैरहजेरीत हाताखालच्या कर्मचाऱ्यांना ती हाताळता येत नाहीत.
Saturday, January 28, 2012 AT 04:00 AM (IST)
गो वा विधानसभा निवडणुकीची अधिसूचना येत्या 6 फेब्रुवारी रोजी जारी होणार असल्यामुळे येत्या आठवड्यात प्रमुख राजकीय पक्षांचे किमान 75 टक्केपर्यंत उमेदवार जाहीर होणार आहेत. अपक्ष, प्रादेशिक पातळीवर नव्याने स्थापन झालेल्या, संजीवनी मिळालेल्या गोवा विकास पार्टीसारख्या पक्ष, गटांतून उमेदवारांची नावे घोषित झाली आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी पहिल्या टप्प्यात अपेक्षित आहे.
Saturday, January 28, 2012 AT 02:00 AM (IST)
काणकोण, ता. 27 ः जगाच्या पर्यटन नकाशावर असलेली पाळोळे किनारपट्टी हळू हळू मानवनिर्मित आपत्तीच्या दिशेने सरकत आहे. त्याची चाहूल बुधवारी (ता. 25) घडलेल्या आगीच्या दुर्घटनेने लागली आहे. या आगीत तीन कपड्यांची व वाद्यांची दुकाने जळून खाक झाली. अग्निशामक दलाच्या माहितीप्रमाणे या आगीत 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, दुकानदारांनी या आगीत 50 लाखांपेक्षा जास्त किमतीचा माल जळाल्याचा दावा केला आहे.
Saturday, January 28, 2012 AT 03:15 AM (IST)
पणजी, ता. 27 : उच्च शिक्षणाच्या पद्धतीत मोठा बदल होण्याची गरज आहे. सध्याच्या माहितीवर आधारित शिक्षण प्रणालीपेक्षा विश्लेषणात्मक क्षमता व कल्पकतेला चालना देणारी पद्धत अवलंबिल्यास ती अधिक परिणामकारक व "फेसबुक'चा वापर करणाऱ्या पिढीला आकर्षक वाटेल, असे प्रतिपादन वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषदेचे महानिर्देशक प्रा. समीर के. ब्रह्मचारी यांनी आज केले. गोवा विद्यापीठाचा 24वा दीक्षान्त समारंभ आज सकाळी विद्यापीठाच्या ज्युबिली सभागृहात पार पडला.
Friday, January 27, 2012 AT 09:24 PM (IST)
दू रचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिका असोत, की रिऍलिटी शो, आज भारतीय प्रेक्षकांना परदेशातून "आयात' केलेले कार्यक्रम बघण्याची सवय लागली आहे. पण मुळात "तिकडच्या' कल्पना उचलण्याची वेळ भारतीय वाहिन्यांवर का यावी? एक काळ असा होता, की घरातली एखादी गोष्ट इंपोर्टेड आहे, असं आवर्जून सांगितलं जाई. नंतर "हल्ली आपल्याकडेही सगळं मिळतं हो'चा जमाना आला.
Wednesday, January 25, 2012 AT 01:45 AM (IST)
पंतप्रधान, लष्कर आणि अध्यक्ष यांच्यातील विसंवाद आणि ताण पाहता, पाकिस्तानातील पेचप्रसंगाची तीव्रता लक्षात येते. सर्व काही आलबेल असल्याचे अधिकृतरीत्या सांगण्यात येत असले तरी त्यात तथ्य नाही. आजही प्रत्यक्षात अमेरिकेच्या हातातच सर्व सूत्रे आहेत. पा किस्तान सध्या एका अभूतपूर्व राजकीय पेचप्रसंगातून जात आहे. सत्तेच्या विविध केंद्रांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
Thursday, December 29, 2011 AT 01:45 AM (IST)
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात जे महत्त्वाचे नेते झाले त्यातले शरद पवार एक. राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण, संस्कृतीकारण, कृषी, अर्थकारण अशा विविध विषयांत समाजाला, राज्याला विलक्षण गती देणारे नेते, अशी पवारांची ओळख देशाला झाली ती त्यांच्या अजोड कर्तृत्वामुळे. यशवंतराव चव्हाणांनंतर देशाच्या राजकारणावर छाप पाडू शकलेला पवारांसारखा दुसरा मराठी नेता आजवर झालेला नाही.
Monday, December 12, 2011 AT 01:45 AM (IST)
"दिल्ली सबकी है, मगर दिल्ली का कोई भी नही!', "जेत्यापुढे स्वतःला सादर करणारी अभिसारिका!' दिल्लीला स्वतःचे हवामानही नाही. राजस्थानातील वाळवंटी गरमीने तापणारी, तर काश्मीर व हिमाचलमधील बर्फवृष्टीने गारठणारी ही दिल्ली! दिल्लीची असंख्य वर्णने आहेत, तिची असंख्य रूपे आहेत. अशा या दिल्ली राजधानीची शताब्दी 12 डिसेंबरपासून सुरू होत आहे. 12 डिसेंबर 1911 ला ब्रिटिशांनी राजकीय राजधानी कोलकत्याहून दिल्लीला हलविली आणि दिल्लीचे राजकीय महत्त्व वाढत गेले.
Monday, December 12, 2011 AT 01:30 AM (IST)
भारत-अमेरिका यांच्यातील वाढते सहकार्य, चिनी प्रभाव रोखण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न आणि अंतर्गत असंतोष यांमुळे चीनमध्ये अस्वस्थता आहे. दलाई लामांचे निमित्त करून चीन भारतावर दबाव आणत आहे...  भा रत-चीन यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. चीन सातत्याने भारतावर दबाव आणू पाहत आहे.
Monday, December 05, 2011 AT 01:45 AM (IST)
तान्ह्या बाळाला मायेने जोजवणारे हात मोठेपणी त्याला शिस्तही लावतात आणि तरुणपणी एकमेकांना वरल्यावर त्या "दोन हातां'चे "चार हात'ही होतात. हात किती भूमिका पार पाडतात!... "एका हाताने टाळी वाजत नाही', "हात दाखवून अवलक्षण', "हात की सफाई', "दोनाचे चार हात', "हातचे राखून' अशा बऱ्याच म्हणी किंवा वाक्प्रचार हातावर आहेत. इतक्या, की जणू त्या हातांवर मोजता येणार नाहीत ! लहान बाळाचं संगोपन आई प्रेमानं, वात्सल्यानं करते. ते बाळालाही जाणवतं.
Wednesday, November 30, 2011 AT 05:16 PM (IST)
मुंबईवरच्या अभूतपूर्व दहशतवादी हल्ल्याला तीन वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर भारतीय जनतेने आपले जीवन पूर्ववत जगायला सुरवात केली आहे. त्या कटू प्रसंगापासून जे धडे शिकायला हवे होते, जे कठोर निर्णय घ्यायला हवे होते, ते घेतले गेलेच नाहीत. नाही म्हणायला, मुंबईवरच्या हल्ल्याने दहशतवादाचा भयानक चेहरा ठळकपणे जगासमोर आणला खरा पण त्यामुळे भारताने आपली विचारसरणी आणि धोरणांमध्ये गंभीरपणे काही मूलभूत बदल केला आहे, असे म्हणवत नाही.
Saturday, November 26, 2011 AT 04:15 AM (IST)
गो व्याचा चेहरा अगदी रक्ताळलेला व निस्तेज होत चालला असून अतिशय चिंतनीय व शोचनीय अशा वळणावर आज गोवा उभा आहे. नैसर्गिक संपत्ती व लोभनीय सौंदर्य लाभलेले गोवा हे सर्व दृष्टिकोनातून देशातील संपन्न असे राज्य आहे. पूर्वेकडील नंदनवन म्हणून परिचित असलेल्या व सध्या विनाशाकडे पदभ्रमण करणाऱ्या गोव्याला वाचविण्यासाठी त्वरित ठोस व महत्त्वपूर्ण पावले उचलली नाहीत तर आमचा पराजय निश्चित आहे.
Thursday, November 24, 2011 AT 03:45 AM (IST)
|