आज आणि उद्या सरकारी बँकांचा संप: कामकाजावर होणार परिणाम

Government banks strike today and tomorrow
Government banks strike today and tomorrow

नवी दिल्ली: दोन बँकांच्या खासगीकरणाच्या प्रस्तावाविरोधात सोमवारी आणि मंगळवारी म्हणडे आज आणि उद्या देशभरातील बँकर्स संपावर असणार आहे. दोन दिवस बँक बंद राहिल्याने बँकिंगवर परिणाम होणार आहे. या संपाचा बँक शाखांमध्ये पैसे काढणे व जमा करणे, चेक क्लिअरन्स आणि कर्जाची मंजुरी यासारख्या बॅकिंग सेवांवर परिणाम होण्याची शक्यता. 

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन (यूएफबीयू) च्या बॅनरखाली नऊ संघटनांनी हा संप पुकारला आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने (एआयबीईए) सरचिटणीस सीएच वेंकटचलम यांनी 10 लाख बँकर्स संपात सामील असल्याचा दावा केला आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँकेसह अनेक सरकारी बँकांनी यापूर्वीच आपल्या ग्राहकांना माहिती दिली आहे की सोमवारी आणि मंगळवारी संपामुळे त्यांच्या कार्यालये आणि शाखांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकेल. असे असूनही, प्रस्तावित संपाच्या दिवशी बँका आणि शाखांमध्ये अधिक चांगल्या कामकाजासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येत असल्याचे बँकांनी म्हटले आहे. 

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात जाहीर केले की सरकारने यंदा सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँक आणि एका विमा कंपनीचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी सरकारने आयडीबीआय बँकेतील बहुतांश हिस्सा भारतीय आयुर्विमा महामंडळाला विकला होता. गेल्या चार वर्षांत सार्वजनिक क्षेत्रातील 14 बँका विलीन झाल्या आहेत.

वेंकटचलम म्हणाले की, 4, 9 आणि 10 मार्च रोजी मुख्य कामगार आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत कोणतेही चांगले परिणाम मिळाले नाहीत. त्यामुळे 15 आणि 16 मार्च रोजी सलग दोन दिवस संप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे 10 लाख कर्मचारी आणि बँकांचे अधिकारी यात सहभागी होणार आहे.

संपात संयुक्त आघाडी आणि बँक संघटना (यूएफबीयू) मध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (एआयबीईए), ऑल इंडिया बँक ऑफिसर कॉन्फेडरेशन (एआयबीओसी) नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईज (एनसीबीई), ऑल इंडिया बँक ऑफिसर असोसिएशन (एआयबीओए) आणि बँक कर्मचारी यांचा समावेश होता. 

संपाच्या दरम्यान एटीएम काम करतील
बँकांच्या एटीएम संपाच्या वेळी काम करतील. शनिवारी व रविवारीही सुटी असल्याने बँका बंद होत्या. यामुळे सेवांवर या संपाचाअधिक परिणाम होणार असे संकेत दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com