Share Market : महिन्याच्या पहिल्या सत्रव्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ  

Share Market
Share Market

देशातील भांडवली बाजाराने महिन्याच्या आणि आठवड्याच्या पहिल्याच सत्रव्यवहारात मोठी तेजी नोंदवली आहे. मागील महिन्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या तुलनेत भांडवली बाजारातील दोन्ही निर्देशकांनी आज वाढ दर्शविली आहे. मागील सत्र व्यवहाराच्या तुलनेत मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 749.85 अंकांनी वधारला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने देखील आज 232.40 अंशांनी बढत घेतली. मागील महिन्याच्या शेवटच्या सत्रात दोन्ही निर्देशकांनी एकाच सत्रात सर्वात मोठी आपटी नोंदवली होती. त्यावेळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बीएसई तब्बल 3.80 टक्क्यांनी गडगडत 49,099.99 वर बंद झाला होता. आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक एनएसई 3.76 टक्क्यांनी खाली येत 14,529.15 वर बंद झाला होता. 

आठवड्याच्या आणि मार्च महिन्याच्या पहिल्या सत्रात देशातील सर्वात जुना भांडवली बाजार मुंबई शेअर बाजार 1.53 टक्क्यांनी वधारला. तर राष्ट्रीय शेअर बाजार सुद्धा 1.60 टक्क्यांनी उचलला. आजच्या सत्रात सकाळी सेन्सेक्स मागील व्यवहाराच्या तुलनेत 847.72 अंकांनी वाढत खुला झाला. त्यानंतर निफ्टी देखील 173.35 अशांनी वधारत उघडल्याचे पाहायला मिळाले. शिवाय, सेन्सेक्सने आजच्या व्यवहारात 50,058.42 ची पातळी गाठली होती. व निफ्टीने 14,806.80 अशांचा स्तर गाठला होता. मात्र त्यानंतर दोन्ही निर्देशांकांमध्ये थोडीफार घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. 

आजच्या संपूर्ण व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 749.85 अंशांनी वाढत 49,849.84 वर बंद झाला. आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने 232.40 अंकांची वाढ नोंदवत 14,761.55 चा स्तर गाठला. दरम्यान, मागील आठवड्याच्या शेवटच्या सत्रात अमेरिकेने सीरिया मधील दहशतवादी तळांवर हल्ले केल्याच्या प्रकरणानंतर जगातील सर्व भांडवली बाजारात चिंतेच्या वातावरणामुळे मोठी पडझड झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावेळी सेन्सेक्स तब्बल 1939.32 अशांनी खाली येत 49,099.99 वर बंद झाला होता. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 568.20 अंकांनी घसरत 14,529.15 या स्तरावर बंद झाला होता.      

मुंबई शेअर बाजारातील ओएनजीसी, इंडसइंड बँक, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स, आयटीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, बजाज ऑटो, एचसीएल टेक,  एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, एनटीपीसी, सन फार्मा, टीसीएस, डॉक्टर रेड्डीज, एशियन पेंट, मारुती सुझुकी, लार्सन अँड टुब्रो, टायटन, कोटक महिंद्रा बँक, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स आणि पॉवरग्रिड यांचे शेअर्स आज वधारल्याचे पाहायला मिळाले. तर भारती एअरटेल, महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक आणि बँक ऑफ बरोडा यांचे समभाग घसरल्याचे पाहायला मिळाले.           

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com