West Bengal Election : सत्ता आल्यास घुसखोरांचा प्रश्न निकाली; अमित शहा यांचा पुनरूच्चार 

Amit Shaha and Mamata Banerjee
Amit Shaha and Mamata Banerjee

पश्चिम बंगाल मध्ये सध्या विधानसभा निडणुकांसाठी प्रचारसभांनी जोर धरल्याचे दिसून येते आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला हरवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मैदानात उतरले आहेत. पश्चिम बंगाल मध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आले, तर पुढच्या पाच वर्षात आम्ही घुसखोरांचा प्रश्न निकाली काढू. तसेच, सरस्वती आणि दुर्गेची पूजा करण्यासाठीही पश्चिम बंगालच्या नागरिकांना कुणी रोखू शकणार नाही असे आश्वासन अमित शाह यांनी आज दिले. पश्चिम बंगालच्या मिदनापुर शहरातील पूर्व मतदार संघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारासाठी आयोजित प्रचार सभेत बोलत असताना, घराबाहेर पडून निर्भयपणे मतदान करा असे आवाहन अमित शाह यांनी मतदारांना केले. (Amit Shah reiterates that if he comes to power BJP will solve the problem of infiltrators)
   
दीदींनी 'माँ, माटी, मानुष' चा नारा दिला, पण बदल झाला का? घुसखोरी आधी होती आणि आताही आहे. घुसखोरांपासून तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे आहे का? दीदी तुम्हाला घुसखोरांपासून स्वातंत्र्य देऊ शकतात का? असे प्रश्न उपस्थित करत आम्ही पुढच्या पाच वर्षात पश्चिम बंगालला घुसखोरांपासून मुक्त करू असे आश्वासन अमित शाह यांनी मतदारांना दिले. शिवाय जर आम्हाला सत्तेत आणण्यासाठी तुम्ही मतदान केले तर यानंतर दुर्गेची आणि सरस्वतीची पूजा करण्यापासून तुम्हाला कुणीही रोखू शकणार नाही असे म्हणत अमित शाह यांनी जनतेला एकप्रकारे भावनिकी आवाहन केले.

अमित शहा (Amit Shaha) यांनी लोकांना आश्वासन दिले की भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यास तृणमूल कॉंग्रेसच्या (टीएमसी) गुंडांची वाईट वेळ येणार असल्याचे सांगितले. व त्यासाठी तुम्हाला मतदान करण्यापासून कुणीही रोखू  शकणार नसल्याचे अमित शहा म्हणाले. यावेळी या प्रचार सभेत अमित शाह यांच्या सोबत नंदीग्राम येथून ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांचे वडील खासदार सिसीर अधिकारी हे देखील उपस्थित होते. तृणमूल काँग्रेसच्या गुंडानी भाजप कार्यकर्त्यांची हत्या केल्याचा आरोप करत, 2 मे रोजी जेव्हा आमचे सरकार सत्तेत येईल तेव्हा आम्ही त्या गुंडांवर कारवाई करु, असे अमित शहा यांनी पुढे सभेत सांगितले. यानंतर, आयुष्मान भारत योजने अंतर्गत थेट शेतकरी आणि मासेमाऱ्यांच्या बँक खात्यावर  पैसे पाठवले जातील असे आश्वासन देखील अमित शाह यांनी यावेळी जनतेला दिले.

दरम्यान, 27 मार्च पासून 8 टप्प्यांत पश्चिम बंगालच्या 294 जागांसाठी निवडणूका होणार आहेत. त्यानंतर या निवडणुकांचे 2 मे रोजी निकाल जाहीर होतील. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात मुख्य लढत असलेल्या या राज्यात दोन्हीही पक्ष जोरदार प्रचार करताना दिसून येत आहेत. ज्येष्ठ राजकीय रणनीतीकर प्रशांत किशोर हे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षासाठी रणनीती आखण्याचे काम करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com