राकेश्वर सिंग यांनी सांगितली नक्षलींच्या ताब्यात असतानाची कहाणी

rakeshwar singh.jpg
rakeshwar singh.jpg

छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमधील चकमकी दरम्यान अपहरण झालेल्या कोब्रा जवान राकेश्वरसिंग मनहास यांची सुखरूप सुटका झाली. जवान मनहास सहा दिवस नक्षलवाद्यांच्या कैदेत होते. कैदेतून सुटल्यानंतर त्यांनी या सहा दिवसांची कथा थोडक्यात सांगितली. यावेळी राकेश्वरसिंग मनहास यांनी अपहरणांनंतरची हकीकत सांगितल्याचे समजते आहे.(Commando Rakeshwar Singh told the story of being in the custody of the Naxals)

टेकलगुडा-जोनागुडा गावाजवळ 3 एप्रिल रोजी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांच्या दरम्यान झालेल्या चकमकीत 22 जवान शहीद झाले तर 30 हून अधिक जवान जखमी झाले होते. तर  या चकमकी दरम्यान नक्षलवाद्यांच्या तावडीत सापडलेल्या राकेश्वर सिंग यांचे नक्षलींनी अपहरण केले होते. नक्षलवाद्यांच्या ताब्यात गेल्यानंतर आपल्याला कोठे नेले गेले, हे आपल्याला माहिती नसल्याचे राकेश्वर सिंग यांनी सांगितले. कारण नक्षली त्यांचे ठिकाण बदलण्याच्यावेळी  डोळे बांधून ठेवत असल्याचे राकेश्वर यांनी सांगितले.

नक्षलवाद्यांच्या ताब्यात असताना त्यांच्या स्थानिक भाषेत बोलत होते, त्यामुळे ती भाषा आणि त्या भाषेत झालेला सवांद आपल्याला समजू शकला नाही असे  संगीतले. नक्षलवाद्यांनी मनहासला अटक केल्यानंतर राज्य सरकारने यासंदर्भात लवादाची नेमणूक करण्याची मागणी केली. त्यावेळी बस्तरचे गांधीवादी कार्यकर्ते धरमपाल सैनी आणि गोंडवाना समाजप्रमुख मुरैया तरेम हे काही स्थानिकांसह जंगलात गेले होते, अशी माहिती देखील मिळाली आहे.  स्थानिक लोक आणि निर्णयप्रक्रियेत असणाऱ्या काही मंडळींशी चर्चा झाल्यानंतर नक्षलवाद्यांनी सार्वजनिक कोर्ट स्थापन केले आणि त्यावेळी जवान राकेश्वर सिंग मनहास यांना सोडण्याचा निर्णय नक्षलींनी घेतला. नक्षलवाद्यांच्या  ताब्यातून मुक्त झाल्यानंतर राकेश्वरसिंग मनहासला (Rakeshwar Singh Manhas) दुचाकीवरून छावणीत आणले गेले आणि सीआरपीएफचे (CRPF) डीआयजी कोमल सिंग यांच्याकडे सोपवण्यात आले असल्याचे समजते आहे. 

नक्षलवाद्यांच्या (Naxal) पामहेड एरिया कमिटीने गुरुवारी टेकलमेटा गावाजवळ जंगलातील 20खेड्यांमधील आदिवासींना बोलावून सामूहिक कोर्ट सुरू केले होते. चकमकीच्या सहाव्या दिवशी नक्षलवाद्यांनी जवान राकेश्वर सिंग याना धरमपाल सैनी यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे समोर आलेल्या व्हिडीओ मधून दिसते आहे. 

धरमपाल सैनी (Dharampal Saini) हे 91 वर्षीय गांधीवादी कार्यकर्ते असून या परिसरात प्रसिद्ध आहेत. आचार्य विनोबा भावे यांचे शिष्य आलेले सैनी हे 1979 पासून बस्तर (Bastar) येथे महिला शिक्षणासाठी कामी करता आहेत. गेल्या चार दशकांत त्यांनी 36 आश्रमशाळा सुरु केल्या आहेत. 1992 साली भारत सरकारने त्यांचा पद्मश्री देऊन गौरव देखील केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com