हिंदू कुटुंबाने केले मुस्लिम महिलेवर अंत्यसंस्कार 

korona death.jpg
korona death.jpg

कोरोनाने पुन्हा एकदा संपूर्ण देशात थैमान घालायला सुरवात केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मध्यप्रदेशातही चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.    सामान्य नागरिकच नव्हे तर कोरोनाच्या या संघर्षात कोरोना योध्यानाही कोरोनाने आपल्या विळख्यात घेतल्याने त्यांच्यातही चांगलीच दहशत पसरली आहे. मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच मध्यप्रदेशतील राजधानी भोपाळमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुरुवारी भोपाळच्या हमीदिया हॉस्पिटलमध्ये कोरोनाने दोन महिलांचा मृत्यू झाला. यातील एक महिला हिंदू होती तर दुसरी मुस्लिम. मात्र रुग्णालय प्रशासनाच्या एका चुकीमुळे दोन्ही महिलांच्या मृतदेहाची आदलाबदल झाल्याची माहिती समोर आली आहे. ( Funeral of a Muslim woman performed by a Hindu family) 

रुग्णालय प्रशासनाने दोन्ही महिलांच्या मृतदेहवर चुकीचा टॅग लावल्यामुळे हिंदू महिलेचा मृतदेह मुस्लिम कुटुंबाकडे गेला आणि मुस्लिम महिलेचा मृतदेह हिंदू कुटुंबाकडे गेला.  त्यानंतर हिंदू कुटुंबाने मुस्लिम महिलेच्या मृतदेहवर अंत्यसंस्कार केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. खरं तर, कोविड प्रोटोकॉलनुसार कोरोनाच्या मृत्यूनंतर शरीर पूर्णपणे पॅक केले जाते. यात मृत व्यक्तीचा चेहराही झाकला जातो.  मात्र ज्यावेळी हिंदू कुटुंबीय महिलेच्या मृत्यूनंतर ज्यावेळी तिचा मृतदेह घेण्यासाठी आले त्यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मृतदेहावर लावलेल्या टॅगकडे दुर्लक्ष करत मुस्लिम महिलेचा मृतदेह हिंदू कुटुंबियांकडे सोपवला. हिंदू कुटुंबीयांनी मुस्लिम महिलेच्या मृतदेहवर अंत्यसंस्कर केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. या बेजबाबदार पणामुळे रुग्णालयातील त्या दोन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित केले असल्याची माहिती रुग्णालय अधिकाऱ्यांनी दिली आहे.  

दरम्यान, मध्यप्रदेशतील शिवराजसिंह सरकारने कोरोनाच्या वाढत्या रउगणसंख्येच्या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेशत कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हॉटस्पॉट भागातही पूढील नऊ दिवसंसाठी कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या एका आठवड्यात कोलार आणि शाहपुरा भागात एकूण संक्रमित झालेल्यांपैकी 40 टक्क्यांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या भागातून कोणत्याही प्रकारची कामे करण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचा  निर्णय भोपाळ जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. गेल्या 24 तासात मध्यप्रदेशत 4324 इतकया नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यात एकूण  सक्रीय रूग्णांची संख्या 28060 वर पोहचली आहे. तर गल्या  24 तासात कोऱ्ओनामुळे 27 लोकानी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे मध्यप्रदेशतील एकूण मृतांची संख्या 4113 वर पोहचली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com