ग्रामीण भागातील महिलांना उद्योजक बनवण्यासाठी गुगल करणार मदत

Google will help women entrepreneurs in rural areas
Google will help women entrepreneurs in rural areas

अंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील महिला उद्योजकांना पाठबळ देण्यासाठी गुगल फॉर इंडिया इव्हेंट व्हर्च्युअल आवृत्तीत गुगलने सोमवारी मोठी घोषणा केली आहे. हिमाचलप्रदेश, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, उत्तरप्रदेश या सहा राज्यांमध्ये डिजीटल साक्षरता वाढवण्यासाठी त्याचबरोबर आर्थिक साक्षरता प्रशिक्षणासाठी नॅसकॉम फाउंडेशनला 5 लाख डॉर्लसचे अनुदान दिले आहे. गुगलने या कार्यक्रामातंर्गत 1 लाख महिला कृषी कामगारांना पाठबळ देण्यात येण्याचा विचार आहे.

''ग्रामीण भागातील महिला उद्योजकांना सहाय्य, मार्गदर्शनसाठी आणि त्यासह इतर कार्यक्रमांना मार्गदर्शन देणारे 'वुमन विल' वेब प्लॅटफॉर्म सुरु करण्याची घोषणा सुध्दा या समितीने केली आहे. महिला उद्योजकांच्या कल्पनांना व्यवसायात बदलण्यात मदत करण्यासाठी आणि त्यांचा प्रसार करण्य़ासाठी हे प्लॅटफॉर्म काम करणार आहे,''असं गुगले म्हटले आहे. 

तसेच गुगल जगभरातील सामाजीक संस्थासाठी एकूण 25 दशलक्ष डॉर्लसची तरतूद करेल जी महिला आणि मुलींच्या आर्थिक सशक्तीकरणाला चालना देण्यासाठी मदत करण्य़ात येणार आहे. महिला दिनाच्या निमित्ताने गुगुल पे ने 'बिझिनेस पेजेस' लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. जी होमप्रेयर्सना त्यांची उत्पादने आणि सेवांची सोपे कॅटलॉग तयार करण्यास सक्षम करेल आणि विशिष्ट यूआरएलद्वारे लोकांना त्यांच्यापर्यंत पोहचवेल.  
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com