देशातील इंधन दरवाढीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे विधान  

v
v

देशात मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज वाढत आहे. सलग आठव्या दिवशी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत दरवाढ केल्यामुळे देशातील काही राज्यांमध्ये ब्रँडेड पेट्रोल व डिझेलचे दर प्रतिलिटर शंभर रुपयांच्या पुढे गेले आहेत. त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवर भाष्य केले आहे. नरेंद्र मोदी यांनी याबाबत बोलताना, पूर्वीच्या सरकारने उर्जा आयातीवरील अवलंबित्वावर लक्ष दिले असते तर आज सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागला नसता, असे म्हटले आहे. 

तामिळनाडूमधील एन्नोर-तिरुवल्लूर-बेंगलुरू-पुद्दुचेरी-नागापट्टिनम-मदुराई-तूतीकोरिन या नैसर्गिक गॅस पाइपलाइन प्रकल्पाच्या रामानाथपुरम-थुथुकुडी विभागाचे उदघाटन नरेंद्र मोदी यांनी केले. आणि यावेळी इंधन दरवाढीबाबत जाहीर भाष्य न करता 2019-20 मध्ये भारताने आपल्या गरजेच्या 85 टक्के तेल आणि 53 टक्के गॅसची आयात केली असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच इंधनाच्या आयातीवर इतके अवलंबून असणे योग्य आहे का? असा प्रश्न देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळेस विचारला. शिवाय यावरून कोणालाही दोष देत नसल्याचे म्हणत, मात्र जर या विषयावर गंभीरतेने लक्ष दिले असते तर आज मध्यमवर्गाला इतका त्रास सहन करावा लागला नसता, असे नरेंद्र मोदी म्हणाले. 

याव्यतिरिक्त, स्वच्छ आणि हरित उर्जा स्त्रोतांसाठी काम करणे व उर्जा अवलंबन कमी करणे आपले सामूहिक कर्तव्य असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी नमूद केले. त्यानंतर देशातील इंधनाच्या किमती या काही ठिकाणी शंभर रुपयांच्या पुढे गेल्या आहेत तर काही ठिकाणी त्या शंभर रुपयांच्या जवळ पोहचलेल्या आहेत. मात्र देशातील इंधन दर आंतरराष्ट्रीय स्तरावरील तेलाच्या दरावर अवलंबून असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. आणि सरकार मध्यमवर्गाच्या अडचणींबाबत संवेदनशील असून, शेतकरी आणि ग्राहकांना मदत करण्यासाठी इथेनॉलवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याची माहिती त्यांनी पुढे दिली. 

इथेनॉलच्या निर्मिती संदर्भात बोलताना इथेनॉलमुळे इंधनाची आयात देखील कमी होणार असून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील वाढ होणार असल्याचे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. आणि यासाठी सरकारने अक्षय ऊर्जेच्या स्त्रोतांवर लक्ष केंद्रित केले असून, 2030 पर्यंत देशात 40 टक्के ऊर्जा निर्मिती होणार असल्याचे ते म्हणाले. याव्यतिरिक्त, सुमारे 6.52 दशलक्ष टन पेट्रोलियम पदार्थांची निर्यात देशात झाली आहे. व ही संख्या आणखी वाढेल अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. इतकेच नाही तर देशातील कंपन्यांनी दर्जेदार तेल आणि गॅस मालमत्ता संपादन करण्यासाठी परदेशात गुंतवणूक केली असल्याचे नरेंद्र मोदी यांनी यावेळी अधोरेखित केले.      

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com