FATF च्या ब्लॅक लिस्ट मधून वाचण्यासाठी पाकिस्तानची नवी खेळी 

PAkistan
PAkistan

पाकिस्तानने फायनान्स अ‍ॅक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीएफ) काळ्या सूचीत येऊ नये म्हणून लष्करचा संस्थापक हाफिज सईदवर कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे. मात्र मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदवर पाकिस्तानने थेट कारवाई करण्याऐवजी त्याच्या पाच सहकाऱ्यांना ताब्यात घेतले असल्याचे समजते. शिवाय, या सर्वांना दहशतवादाला फंडिंग केल्याप्रकरणी दहशतवाद विरोधी न्यायालयाने नऊ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. तसेच न्यायालयाने त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. (Pakistan took action against Hafiz Saeed to escape the FATF blacklist)

पाकिस्तानने (Pakistan) दहशतवाद्यांवरच्या केलेल्या कारवाईत उमर बहादुर, नसरुल्लाह आणि समीउल्लाह या तिघांचा समावेश आहे. ही कारवाई पंजाब प्रांतातील दहशतवादविरोधी विभागाने केली असल्याची माहिती मिळाली आहे. यासह जमात उद दावा याह्या मुजाहिद आणि प्रमुख नेता जफर इक्बाल या दोघांवर देखील कारवाई करण्यात आल्याचे समजते. या दोघांवर पहिला देखील दहशतवादाला फंडिंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर आता दहशतवादविरोधी न्यायालयाचे न्यायाधीश इजाज अहमद बटर यांनी या पाचही दहशतवाद्यांना नऊ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. 

यानंतर, याप्रकरणीच हाफिज सईदचा (Hafiz Saeed) मेव्हणा हाफिज अब्दुल रहमान मक्की याला सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने या सर्वांना दहशतवादाला फंडिंग केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. या सर्वांनी बेकायदेशीरपणे दहशतवादी कारवायांसाठी निधी गोळा केला आणि बंदी घातलेल्या संघटनांना मदत केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच न्यायालयाने फॅडिंगमुळे तयार केलेली मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. 

सर्व दहशतवाद्यांना सुनावणीसाठी कडक सुरक्षेत न्यायालयात हजर करण्यात आले. हाफिज सईदसह या सर्व दहशतवाद्यांविरूद्ध पाकिस्तानातील पंजाब पोलिसांनी सुमारे 41 एफआयआर नोंदविले आहेत. हाफिज सईद हा संयुक्त राष्ट्राने घोषित दहशतवादी आहे. आंतरराष्ट्रीय दडपणाखाली पाकने त्याला काही दिवसांपूर्वी अटक केली होती. परंतु, आता तो पुन्हा पाकिस्तानच्या संरक्षणाखाली जगत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com