World Water Day 2021: जलशक्ती अंतर्गत कॅच द रेन अभियानाची सुरुवात

Water Day 2021: Launch of Catch the Rain campaign under water power
Water Day 2021: Launch of Catch the Rain campaign under water power

जागतिक पाणी दिवस 2021: 22 मार्च रोजी जागतिक पाणी दिवस साजरा केला जातो. परंतु कोणताही दिवस तेव्हाच साजरा केला जातो तेव्हा त्या असणाऱ्या गोष्टीची किंमत  होऊ लागते आणि लोकांना त्याचे महत्व सांगण्याची गरज असते.  

आधी एक काळ असा होता कि, सर्वत्र हिरवळ होती. नद्या, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत असायचे. शेतातील विहिरी काठोकाठ भरलेल्या असायच्या. पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने  जनजीवन सुरळीत होते. परंतु परंतु नंतर काळ असा काही बदलत गेला कि औद्यागिकीरण वाढत गेले, लोकांचे राहणीमान सुधारत गेले, लोक शिक्षित होऊ लागले आणि त्यांचे देखावे पण वाढत गेले. सध्या च्या काळात पाण्याची सर्वत्र काय स्थिती आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

ज्या भौगोलिक भागात पाण्याची देणं आधीपासून आहे तिथेच आता पाण्यचा दुष्काळ पडायला लागला. परंतु काही ठिकाणी प्रदूषण, शहरीकरण, काँक्रीटचे वाढणारे जंगल अश्या अनेक गोष्टिमुळे पाण्याचा साठा कमी झाला आहे. सद्यस्थितीत जगातील सुमारे सव्वा दोन अब्ज लोकसंख्येला स्वच्छ आणि चांगले पाणी उपलब्ध होऊ शकत नाही. अशी अत्यंत वाईट स्थिती आहे. त्यामुळेच या पाण्याविषयी सर्व प्रकारची जनजागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांतर्गत दरवर्षी 22 मार्च रोजी जागतिक पाणी दिन साजरा केला जातो.

संयुक्त राष्ट्राच्या सहाव्या सरचिटणीस, बुटोरोस घाली यांनी 32 वर्षांपूर्वी एक भविष्यवाणी केली होती. "जगात पाण्याची होणारी नासाडी बघता, जर लोकांनी वेळेत पाणी वाचवले नाही तर पुढील महायुद्ध हे पाण्यासाठीच होणार" असे त्यानी त्या भविष्यवाणीत म्हटले होते. त्याचबरोबर "आग हि पाण्यात सुद्धा लागू शकते त्यामुळे असे होऊ नये कि पुढचे विश्व् युद्ध हे पाण्यासाठीच होईल". असे माजी पंतप्रधान वाजपेयी यांनी जनतेला संबोधताना म्हटले होते.

सर्व प्रथम, हे समजले पाहिजे की पाण्याचे मूल्य केवळ बाटलीचे मूल्य नाही तर आपल्या घरांमध्ये, अन्न, संस्कृती, आरोग्य, शिक्षण, अर्थव्यवस्था आणि वातावरणातील त्याचे महत्त्व हे सगळंच पाण्याचे वास्तविक मूल्य मानले पाहिजे. पाण्याबद्दल जागरूकता म्हणून 22 जुलै 2012 मध्ये आमिर खानची  सत्यमेव जयते या टीव्ही मालिकेने पाणीटंचाई आणि भारतातील पाणी व्यवस्थापनाच्या उणीवा या मुद्दय़ावर लक्ष वेधले होते. या कार्यक्रमाचे दिग्दर्शक भटकळ यांच्यासह अमीर खानची पत्नी किरण राव आणि टीव्ही मालिका कोअर टीममधील इतरांनी या विषयाला वेळ दिला. समजून घेण्यासाठी आणि संभाव्य उपायांवर संशोधन करण्यासाठी एक वर्षाहून अधिक काळ व्यतीत केला. आणि 2016 मध्ये त्यांनी पानी फाऊंडेशनची स्थापना केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी जागतिक जल दिनी 'जलशक्ती अभियानांतर्गत कॅच द रेन अभियानाची सुरुवात करणार आहेत. “पाऊस कुठे पडेल, कधी पडेल” या विषयासह ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात ही मोहीम देशभरात राबविली जाईल. जल दिवस हा वेगवेगळ्या थीम नुसार साजरा केला जातो या वर्षीची थीम 'व्हॅल्यूंग वॉटर' म्हणजेच 'पाण्याचे मूल्यांकन' अशी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com