"अ‍ॅड. प्रतिमा कुतिन्होंचा राजकीय गेम करण्याचा काॅंग्रेस नेत्यांचा डाव": विनय तेंडुलकर

Congress leaders plot to damage Advocate Pratima Kutinhos political career said
Congress leaders plot to damage Advocate Pratima Kutinhos political career said

मडगाव : काॅंग्रेसच्या धडाकेबाज नेत्या अ‍ॅड. प्रतिमा कुतिन्हो यांना जिल्हा पंचायतीच्या पोटनिवडणुकीत उतरवून त्यांचा राजकीय `गेम` करण्याचा काॅंग्रेस नेत्यांचा डाव आहे, अशी टिका राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर व भाजपचे प्रवक्ते उर्फान मुल्ला यांनी केली आहे. जिल्हा पंचायतीच्या नावेली मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपतर्फे सत्यविजय नाईक यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. यावेळी पत्रकारांशी बोलताना तेंडुलकर व मुल्ला यांनी ही टिप्पणी केली. 

गोवा प्रदेश महिला काॅंग्रेसच्या अध्यक्ष अ‍ॅड. प्रतिमा कुतिन्हो या सतत सक्रीय असतात. त्यांना काॅंग्रेसने खरेतर विधानसभा निवडणुकीची उमेदवारी द्यायला हवी. जिल्हा पंचायतीच्या नावेली मतदारसंघाच्या पोटनिडणुकीत उमेदवारी देऊन त्यांचा राजकीय गेम करण्यात येणार आहे.  या निवडणुकीत त्यांना पाडून त्यांचे राजकीय भवितव्य उध्वस्त करण्याचा काॅंग्रेस नेत्यांचा डाव आहे. पूर्वी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचीही अशीच गेम करण्यात आली होती, असे तेंडुलकर यांनी सांगितले. 

कुतिन्हो या काॅंग्रेसच्या प्रभावी नेत्या आहेत. विधानसभेची उमेदवारी न देता त्यांना राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीची उमेदवारी देण्यात आली आहे.  विरोधी पक्षनेते दिगंबर कामत हे बहुजन समाजातील नेते - कार्यकर्त्यांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. चोडणकर यांनाही राजकीयदष्ट्या संपवण्यासाठी उत्तर गोवा लोकसभा निवडणुकीत पुढे करण्यात आले होते, असे मुल्ला यांनी सांगितले. 
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com