फातोर्ड्यातील दुहेरी हत्याकांडाचा 24 तासांत छडा; मुंबई पोलिसांच्या मदतीने संशयित ताब्यात

Double murder in Fatorda solved in 24 hours Suspect arrested with the help of Mumbai Police
Double murder in Fatorda solved in 24 hours Suspect arrested with the help of Mumbai Police

सासष्टी : चंद्रवाडा फातोर्डा येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणी गोवा पोलिसांनी तिघा संशयितांना दादर मुंबई येथे ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. मिंगेल मिरांडा आणि त्यांची सासू कॅटरिना पिंटो या दोघा वृद्धांचा खून करून संशयित फरार झाले होते. तेथे भाडेपट्टीवर राहात असलेले तेथील मजूर गायब झाले होते. घराशेजारी असलेली स्कुटी चोरून नेली होती ती काल वास्को रेल्वे स्टेशन परिसरात सापडली होती त्यानंतर पोलिसांनी काही 20 जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली होती.  या चौकशीतून काहींची नावे पुढे आल्यावर मुंबई पोलिसांच्या सहायाने तिघा संशयितांना गोवा पोलिसांनी ताब्यात घेऊन या हत्याकांडाचा 24 तासात छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

फातोर्डा येथील ही दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना सोमवारी 9:30 च्या सुमारास उघडकीस आली. त्‍यामुळे फातोर्डा परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. मिगेंल मिरांडा (65) आणि त्यांची सासू कॅटरिना पिंटो (86) या वृद्ध व्यक्तींचा खून करण्यात आली. मिंगेल यांची गायब झालेली दुचाकी वास्को रेल्वे स्थानकावर सापडली असून पोलिसांनी मडगाव तसेच वास्को रेल्वे स्थानकावरून काहीजणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या दुहेरी हत्याकांडची माहिती मिळाल्यावर फातोर्डाचे पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी जाऊन तपासकाम सुरू केले. पोलिस महानिरीक्षक परमादित्य, दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक पंकज कुमार, माजी आमदार आलेक्स सिक्वेरा यांनीही घटनास्थळी भेट दिली होती.

...आणि वडील, आजी रक्ताच्‍या थारोळ्यात!

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिंगेल हे दररोज चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी जात होते. पण, दोन दिवसांपासून प्रार्थना करण्यासाठी ते न आल्यामुळे त्यांची मुलगी विचारपूस करण्यासाठी घरी आली होती. घरात कुणीही नसल्याचे निदर्शनास आल्यावर तिने घरच्या मागच्या बाजूला असलेल्या स्टोअर रुममध्ये डोकावून पाहिले असता, रक्ताच्या थारोळ्यात पडलेले वडील व आजीचा मृतदेह दिसला. याप्रकरणी पोलिसांना कळविल्यावर पोलिस घटनास्थळी त्‍वरित पोहोचले. या हत्याकांडमुळे फातोर्डा परिसरात सध्या भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.

सीसीटीव्‍ही कॅमेरा फुटेजची तपासणी

मिंगेल मिरांडा हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कंत्राटदार असून त्यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या मुलाची प्रकृती ठीक नसल्याने मिंगेलची सासू कॅटरिना पिंटो त्यांच्या घरी होती. मिंगेल यांच्या घराचा मागच्या बाजूला खोल्या असून या खोल्यांमध्ये मच्छिमारी व्यावसायिकांकडे काम करणारे तीन कामगार राहत होते. या तिघाही कामगारांचा पोलिस शोध घेत आहे. मिंगेल यांची दुचाकीही गायब झाल्याचे निदर्शनास आले. या तिघांना जाताना काही नागरिकांनी पाहिले असून पोलिस तपासासाठी मिंगेल यांच्या घराजवळ असलेल्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजही तपासण्‍यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com