गोव्यात गेल्या 24 तासांत 54 नव्या कोरोना रूग्णांची नोंद; एकूण संख्या 55,463 वर

Goa registers 54 new corona patients in last 24 hours Total number at 55463
Goa registers 54 new corona patients in last 24 hours Total number at 55463

पणजी : गोव्यात सोमवारी 54 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली, यामुळे आत्तापर्यंत एकूण कोरोना रूग्णांची संख्या ही 55,463 झाली आहे. सोमवारी 110 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी परतले. गेल्या तीन दिवसात राज्यात एकाही कोरोना रूग्णाचा मृत्यू झाला नसल्याने राज्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कोरोना रूग्णांची एकूण संख्या 799 झाली आहे. सध्या गोव्यात 632 रूग्ण कोरोनाचे उपचार घेत असून, आत्तापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या एकूण रूग्णांची संख्या 54,032 वर पोहोचली आहे. मंगळवारी एकूण 1,264 रूग्णांची कोरोना तपासणी कऱण्यात आली. आत्तापर्यंत गोव्यात एकूण 5,04,938 कोरोना चाचण्या कऱण्यात आल्या आहेत. 

गोव्यातील आत्तापर्यंतची कोरोना आकडेवारी

  • एकूण रूग्णसंख्या - 55,463
  • नवे रूग्ण - 54
  • एकूण मृत्यू - 799
  • एकूण कोरोनामुक्त रूग्ण - 54,032
  • सध्या उपचार घेत असलेले रूग्ण - 632
  • आत्तापर्यंत झालेल्या कोरोना चाचण्यांची संख्या - 5,04,938

दरम्यान, राज्यात सोमवारी 60 वर्षांवरील 2753 नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस टोचून घेतला. एका व्यक्तीने दुसरा डोस घेतला. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील व्यक्ती आणि 45 वर्षांवरील आजारी व्यक्तींना कोविड प्रतिबंधक लस देण्याचा उपक्रम सुरू झाला आहे.   आज वरील गटातील एकूण 3017 व्यक्तींनी कोविड प्रतिबंधक लस टोचून घेतली. यामध्ये 45 वर्षांवरील 364 आजारी व्यक्तींचा व 60 वर्षांवरील 2653 व्यक्तींचा समावेश आहे. वरील दोन्ही गटातील प्रत्येक एकाने दुसरा डोस घेतला.  आज 236 जणांना पहिला डोस व 267 जणांना दुसरा डोस देण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com