गोवा सरकारची साप्ताहिक लॉटरी 23 नोव्हेंबरपासून सुरू

Weekly lottery of Goa government  starts from 23 November
Weekly lottery of Goa government starts from 23 November

पणजी : गोवा राज्य सरकारने राज्यात 28 नवीन साप्ताहिक लॉटरी दहा रुपये किमतीने सुरू केल्या आहे. यासा लॉटरीचा निकाल दिवसातून चार वेळा जाहीर करण्यात येणार आहे. साप्ताहिक लॉटरी 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. अर्थ खात्याचे अव्वल सचिव प्रणब भट यांनी याबाबतची अधिसूचना यांनी जारी केली आहे.

अनेक वर्षापासून बंद असलेली लॉटरी राज्यात सुरू करणायात आली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक लहान लॉटरी व्यावसायिकांना या लॉटरीचा लाभ मिळणार आहे आणि काही प्रमाणात धंदा सुध्दा उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारने डिअर, शुभलक्ष्मी, साप्ताहिक लॉटरी अशा वेगवेगळ्या नावाने 28 लॉटरी सुरू केल्या आहे. यासाठी वितरक म्हणून फ्यूचर गेमिंग अ‍ॅन्ड हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक लॉटरीचे वेगवेगळे नाव ठेवण्यात आले आहे आणि प्रत्येक दिवशी मशिनद्वारे चार लॉटरीचे निकाल काढण्यात येणार आहे. अनुक्रमे सकाळी 11.20 वाजता, सायंकाळी 4 वाजता, सायंकाळी 6 वाजता आणि रात्री 8.40 वाजता निकाल जाहीर करण्यात येतील. हे निकाल लॉटरी संचालनालयच्या कार्यालयात  आणि आल्तिनो-पणजी येथील आकाशवाणी केंद्राजवळ सेर्रा इमारतीत असलेल्या लघूबचत येथे काढण्यात येणार आहे.

यासाठी प्रत्येक लॉटरीची किंमत दहा रुपये ठरविण्यात आली असून प्रत्येक साप्ताहिक लॉटरी 0000 ते 9999 क्रमांकापर्यंत अशा 10 हजार तिकिटे काढली जाणार आहेत. प्रथम एक बक्षीस 10 हजार रुपयांचे, द्वितीय पाच बक्षिसे 5000 रुपयांची, तृतीय 10 बक्षिसे 500 रुपयांची, चौथे 10 बक्षिसे 300 रुपयांची, पाचवे 10 बक्षिसे 200 रुपयांची, तर सहावे 100 बक्षिसे 100 रुपयांची, अशी एकूण 55 हजार रुपयांची बक्षिसे प्रत्येक लॉटरीसाठी असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com