वाढत्या वाहतूक कोंडीची सरकारकडून दखल 

kolwal bridge
kolwal bridge

कोलवाळ: कोलवाळ येथे दुसरी फेरीबोट सेवा सुरु 
५० वर्षांपूर्वी कोलवाळ नदीतून होडीतून प्रवाशी वाहतूक करत असताना होडी उलटून सुमारे १५ ते २० प्रवाशांना जलसमाधी मिळाली होती.या मोठ्या दुर्घटनेनंतर कोलवाळ नदीवर फेरी सेवा सुरु करण्यात आली.सुरवातीला एकाच फेरीबोट प्रवाशी वाहतूक करीत असे.परंतु आता सरकारने वाढत्या वाहतुकीची दाखल घेत दुसरी फेरीबोट सुरु केली आहे. 
उत्तर गोव्यातील बहुसंख्य लोक कोलवाळ नदीतून फेरीबोटीतून प्रवास करून म्हापसा व पणजी शहराकडे आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी प्रवास करीत असत.म्हापसा शहरातील शुक्रवारला बाजाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी होत असे.पेडणे ते महाखाजं व कोलवाळ ते म्हापसा अशी प्रवाशी बसमधून कित्येक वर्षे वाहतूक सुरु होती. 
लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कोलवाळ व महाखाजन नदीच्या तीरावर वाहनांच्या संख्येत वाढ झाली.त्यामुळे कोलवाळ व महाखाजन फेरी धक्क्यावर वाहनांच्या रंग दिसू लागल्या.त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन अपघातात वाढ झाली. गोवा ते मुंबई अशी वाहतूक करणाऱ्या प्रवाशी बसेस दोडामार्ग मार्गे न जात कोलवाळ मार्गे फेरीबोटीतून प्रवास करण्यास सुरवात केली.कोलवाळमार्गे बरेच अंतर कमी पडत असल्यामुळे प्रवाशी बसेस फेरीबोटीतून पैलतीर गाठत असत.फेरोबोटितुन गोवा मुंबई प्रवाशी बस चढत  असताना अचानक फेरीबोट मागे गेल्यामुळे प्रवाशी बस प्रवाशांना घेऊन सरळ पाण्यात गेली व दुर्घटना झाली.त्यानंतर कोलवाळ नदीवर लोकांना पुलाची आवशक्यता भासू लागली.

माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे गोव्याचे मुख्यमंत्री असताना या नदीवर काँक्रीट पूल बांधण्याचा आराखडा तयार करण्यास सुरवात केली. एनपीसीसी कंपनीला काँक्रीटचा पूल बांधण्याचे कंत्राट देण्यात आले होते. कोलवाळ नदीवर बांधण्यात येणाऱ्या कोलवाळच्या काँक्रीट पुलाला सहा खांब होते. कोलवाळ नदीच्या मध्यभागी असलेल्या खांबाऱ्या खोदकामाची सुरवात केल्यानंतर काही तांत्रिक अडचणीमुळे कंपनीने बरीच वर्ष काम रेंगाळले.पुलाच्या बांधकामाची मुदत संम्पल्यानंतर कंत्राट रद्द करण्यात आले.त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी कोंकऱ्यात पूल बांधण्यासाठी जमान इंडिया कंपनीला कंत्राट देण्यात आले.कंपनीने ठराविक वेळेत पूल बांधून सरकारकडे सूपूर्द केला. १० डिसेम्बर १९९९ मध्ये माजी मुख्यमंत्री फ्रान्सिस सार्दिन यांच्या हस्ते काँक्रीट पुलाचे उदघाटन करण्यात आले.थिवी मतदारसंघाचा सर्व दृष्टिकोनातून विकास व्हावा,या हेतूने थिवीचे माजी आमदार दयानंद नार्वेकर यांनी कोलवाळ नदीवरील पूल लवकरात लवकर बंधू घेण्यासाठी वेळोवेळी पाठपुरवठा केला व मोलाचे सहकार्य केले. 

"काणकोण कदंब बसस्थानकाची दुरावस्था "​
वाढत्या  पर्यटक संख्येमुळे काम सुरु 
गोवा आकर्षक पर्यटक स्थळ असल्यामुळे देश विदेशातील पर्यटकांची संख्या वाढत आहे.पर्यटकांच्या वाहनांची वाहतूक रात्रंदिवस या पुलावरून होत असते.या पुलावरून होणारी वाढती वाहतूक लक्षात घेऊन गोवा सरकारने केंद्र सरकारकडे कोलवाळ नदीवर समांतर दुसरा बांधण्यासाठी प्रस्ताव मांडला.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रस्ताव मंजूर करून महामार्ग क्रमांक १७ वरील सहापदरी रास्ता तयार करण्यासाठी कोलवाळ नदीवर काँक्रीट पुलाच्या बाजूला समांतर नवीन काँक्रीट पूल बांधण्यास सुरवात केली आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com