INDvsENG : तिसऱ्या डे नाईट सामन्यात कोण ठरणार वरचढ? गौतम गंभीरनेच दिले याचे उत्तर  

INDvsENG Day Night
INDvsENG Day Night

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना उद्यापासून अहमदाबादच्या नवीन सरदार वल्लभभाई पटेल (मोटेरा) स्टेडियम मध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना डे नाईट असेल. व भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ पहिल्यांदाच डे नाईट सामन्यासाठी मैदानात उतरणार आहेत. यापूर्वी चेन्नईमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पाहुण्या इंग्लंड संघाकडून लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत पहिल्या सामन्यातील पराभवाची परतफेड केली होती. त्यामुळे चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने इंग्लंडशी बरोबरी साधली आहे. यानंतर भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने आगामी डे नाईट सामना हा भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांसाठी समान बरोबरीचा राहणार असल्याचे म्हटले आहे.

अहमदाबाद येथे होणाऱ्या तिसऱ्या डे नाईट कसोटी सामन्यात भारत आणि इंग्लंडचे संघ समतुल्य असतील, असे गौतम गंभीरने म्हटले आहे. अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल (मोटेरा) स्टेडियमवर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे येथील खेळपट्टी देखील नवीन असून, पहिलाच सामना हा गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणार असल्यामुळे चेंडू कसा वळेल, चेंडू सीम होईल की बाउन्स होईल हे कोणीच सांगू शकणार नसल्याचे गौतम गंभीरने म्हटले आहे. याशिवाय दोन्ही संघांसाठी खेळपट्टी नवीन असल्यामुळे त्यांच्यात होणार सामना हा बरोबरीचा राहणार असल्याचे मत गौतम गंभीरने व्यक्त केले आहे. 

याव्यतिरिक्त, चेन्नईतील मैदानाची खेळपट्टी आणि नवीन मोटेरा स्टेडियमवरील खेळपट्टीची तुलना केल्यास यावर कोणताच अंदाज वर्तविणे शक्य नसल्याचे गौतम गंभीरने म्हटले आहे. तसेच चेन्नईच्या खेळपट्टीचा विचार केल्यास तेथील खेळपट्टीबाबत माहिती होती. परंतु अहमदाबाद येथील नव्या खेळपट्टीविषयी इंग्लंड संघासोबतच भारतीय संघाला देखील खेळपट्टीच्या स्थितीचा अंदाज नसल्याचे गौतम गंभीरने सांगितले. यानंतर मालिकेत दोन्ही संघ 1 - 1 च्या बरोबरीनंतर डे नाईट सामन्यासाठी मैदानात उतरणार असल्यामुळे दोघांना देखील समान संधी मिळणार असल्याचे गौतम गंभीरने नमूद केले. 

तसेच, भारतीय संघाकडे ज्याप्रमाणे मजबूत वेगवान गोलंदाजी आहे, त्याप्रमाणेच इंग्लंडच्या संघाकडे देखील उत्तम गोलंदाज असल्याचे गौतम गंभीरने सांगितले. आणि त्यामुळे कोणत्या संघाचे गोलंदाज जास्त प्रभावी ठरतात हे पाहणे मोठ्या उत्साहाचे ठरणार असल्याचे त्याने पुढे म्हटले आहे. पाहुण्या इंग्लंड संघाकडे वेगवान गोलंदाजांची कमी नसल्याचे गौतम गंभीरने पुन्हा एकदा अधोरेखित केले. व या वेळी त्याने स्टुअर्ट ब्रॉडचे उदाहरण दिले. दुसऱ्या कसोटी सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडला आपला फॉर्म गवसला नसल्याचे त्याने सांगितले. तर पहिल्या कसोटी सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडला खेळवण्यात आले नव्हते. आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात ब्रॉड लयीत येत असल्याचे अखेरीस दिसत होते, मात्र त्याच्याकडे उशिराने चेंडू सोपविण्यात आल्याचे गौतम गंभीरने सांगितले.                  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com