Farmer Protest: आता महाराष्ट्राकडेही वळणार शेतकरी आंदोलनाचा मोर्चा

Farmer Protest farmer leader Rakesh Tikait will attend public meetings at Akola in Maharashtra
Farmer Protest farmer leader Rakesh Tikait will attend public meetings at Akola in Maharashtra

अकोला: गावपातळीवर नव्या शेतकरी कायद्याचा विरोध पाचविण्यासाठा देशातील विविध भागात जावून जनजागृती करण्याचा प्रयत्न भारतीय किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत, किसान महापंचायत मोर्चा 20 फेब्रुवारी रोजी अकोल्यात आयोजित करण्यात आली आहे.  संयुक्त किसान मोर्चाची ‘किसान कैफीयत’ ही महापंचायत 20 फेब्रुवारी रोजी शेतकरी प्रक्रियेतला भाग म्हणून अकोल्यात शेतकरी नेते राकेश टीकैत व युद्धविर सिंह यांच्या उपस्थितीत होणार आहे.

अकोल्यातील शेतकरी जागर मंचाने या महापंचायतीचे आयोजन केले आहे. आंदोलनाचे बिगुल संयुक्त किसान मोर्चा फुंकणार असल्याचे शेतकरी जागर मंचच्या वतीने सांगण्यात आले आहे. शनिवारी शासकीय विश्राम गृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत शेतकरी जागर मंचाच्या वतीने ही माहिती देण्यात आली. "महाराष्ट्रात होणारी ही पहिलीच किसान महापंचायत असणार आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांवर हे विरोधी कायदे लादण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. शेतकरी आंदोलन हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या लढाईतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. लाखो शेतकरी देहभान विसरून दिल्ली आंदोलनात ठिया देऊन बसले आहेत. राकेश टीकैत यांची अकोल्यात होणारी सभा ही अख्या महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीला नवे वळण देणारी असणार आहे," अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.

महापंचायतीमध्ये असणार या संघटनांचा सहभाग
अकोल्यातील खुले नाट्यगृह येथे किसान कैफीयत महापंचायतीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता ही महापंचायत होणार आहे. या सभेत स्वाभीमानी शेतकरी संघटना, किसान विकास मंच, कुणबी विकास मंडळ, नेहरू युवा परिवार, अमरावती विभागीय शिक्षक संघ, मराठा सेवा संघ, देशमुख समाज मंडळ, अखिल भारतीय मराठा महासंघ आणि इतर अनेक संघटनांचा आयोजन आणि नियोजनात सक्रिय सहभाग राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com