Corona Update : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय 

Maharashtra
Maharashtra

भारतात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. केरळ, पंजाब, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये कोरोनाच्या सक्रिय आकडेवारीत तेजी दिसून येत आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत चालले आहेत. त्यामुळे कोरोनाची वाढती प्रकरणे लक्षात घेता महाराष्ट्रात आता 28 मार्चपासून रात्री कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज याबाबतची घोषणा केली. (Night curfew in Maharashtra due to increasing cases of corona)

महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे खबरदारीचा निर्णय म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पावले उचलत रात्री कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार महारष्ट्रातील मॉल व मोठी दुकाने ही रात्री ८ ते सकाळी 7 पर्यंत बंद राहणार आहेत. या संदर्भात, महाराष्ट्र सीएमओने रात्री करण्यात आलेल्या कर्फ्यूशी संबंधित आदेश आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन विभाग स्वतंत्र्यपणे जारी करेल, असे म्हटले आहे. 

गुरुवारी देशात कोरोना विषाणूची 59 हजाराहून अधिक नवीन प्रकरणे समोर आली होती. महाराष्ट्रासह (Maharashtra) पंजाब, कर्नाटक, छत्तीसगड आणि गुजरातमध्ये कोरोनाची नवी प्रकरणे वाढत असल्याचे स्वास्थ्य मंत्रालयाने म्हटले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 35,952 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, पंजाबमध्ये 2,661, कर्नाटकमध्ये 2,523, छत्तीसगडमध्ये 2,419 आणि गुजरातमध्ये 1,961 कोरोनाची नवी प्रकरणे आढळली आहेत. या राज्यांव्यतिरिक्त दिल्ली, तामिळनाडू, हरियाणा आणि राजस्थानमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याचे निदर्शनास येत आहे.     

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com