भारतात दरवर्षी 7 लाख लोकांचा तापमान वाढीमुळे होतो मृत्यु

ऑस्ट्रेलियाच्या मोनाश विद्यापीठाच्या (Monash University) संशोधकांच्या नेतृत्वाखालील झालेल्या अभ्यासात चिंताजनक बाबी समोर आल्या आहेत.
Temperature
TemperatureDainik Gomantak

प्रसिद्ध वैद्यकीय जर्नल लॅन्सेन्टच्या अभ्यासानुसार भारतात दरवर्षी साधारणत: 40 लाख लोकांचा थंडी आणि उष्माघातामुळे मृत्यू होता. यावरुन हवामानातील बदल हे किती गंभीर आव्हान आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

ऑस्ट्रेलियाच्या मोनाश विद्यापीठाच्या संशोधकांच्या नेतृत्वाखालील झालेल्या अभ्यासात असे आढळले की, बदलत्या तापमानामुळे जगभरात 5 दशलक्षाहुन अधिक लोक मृत्यूमुखी पडतात.

कोरोना विषाणुमूळे होणाऱ्या मृत्यूंपेक्षा थंडी आणि उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या जास्त आहे, यावरूनही या समस्येचे गांभीर्य लक्षात येते . बुधवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात असे म्हटले आहे की, 2000 ते 2019 दरम्यान जगातील सर्वच भागांत उष्ण तापमानामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये वाढ झाली असून, जागतिक तापमानवाढीमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या भविष्यात आणखी वाढण्याचा धोका आहे.

Temperature
Google विरुद्ध अमेरिकेचे 36 राज्य न्यायालयात !

भारतात, थंड तापमानामुळे वर्षाकाठी 655400 मृत्यू होतात, तर उष्ण तापमानाशी संबंधित मृत्यूंची संख्या सुमारे, 83,700 आहे. तसेच 2000 ते 2019 दरम्यान मृत्यू आणि तापमानाचा अभ्यास केला, त्यानुसार दर दशकात जागतिक तापमानात 0.26 डिग्री सेल्सिअसने वाढ झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com