‘एकच प्‍याला’ अन् सिगारेटचा झुरका सुटतोय

Dainik gomantak
बुधवार, 29 एप्रिल 2020

सांतिनेज येथील एका व्‍यक्‍तीने दिलेल्‍या माहितीनुसार, सुरवातीच्‍या दिवसात अत्‍यंत अस्‍वस्‍थ वाटत होते, चिडचड आणि आदळ-आपट होत होती. उगाच अशक्‍त वाटत होते. मात्र स्‍वनियंत्रणाच्‍या माध्‍यमातून निश्‍‍चय केला आणि तो पुढे नेला

पणजी

दारू आणि सिगारटेचे व्‍यसन सुटावे म्‍हणून अनेक लोक नानाप्रकारचे प्रयत्‍न करीत असतात. अनेकजणांना या व्‍यसनाचा दुरुपयोग आणि शरीरावर होणारे वाईट परिणाम माहित असतात. पण, तरीही व्‍यसनावी तल्‍लफ इतकी असते की त्‍यांच्‍याकडून व्‍यसन सुटणे अशक्‍य वाटत असते. लॉकडाऊनमुळे मद्य आणि सिगारेट मिळणे मुश्‍‍किल झाले असल्‍याने हे लोक आपोआप व्‍यसनमुक्‍तीकडे वळत असल्‍याची माहिती त्‍यांच्‍याशी बोलल्‍यानंतर मिळाली. 
काही जणांशी बोलल्‍यानंतर त्यांनी सांगितले की, लॉकडाऊन जाहीर झाल्‍यानंतर किंवा लॉकडाऊन वाढण्‍याची शक्‍यता होती. तेव्‍हा अनेकांनी शक्‍कल लढवून घरी अधिक प्रमाणात दारू आणि सिगारेटची पाकिटे आणून ठेवली होती. मात्र, लॉकडाऊनचा कालावधी अधिक वाढविल्‍याने आणि हा साठा संपल्‍याने त्‍यांच्‍यासमोर पर्याय राहिला नाही. त्‍यामुळे अनेकांनी या लॉकडाउनचा वापर व्‍यसनमुक्‍तीसाठी करून घेतला. 
सांतिनेज येथील एका व्‍यक्‍तीने दिलेल्‍या माहितीनुसार, सुरवातीच्‍या दिवसात अत्‍यंत अस्‍वस्‍थ वाटत होते, चिडचड आणि आदळ-आपट होत होती. उगाच अशक्‍त वाटत होते. मात्र स्‍वनियंत्रणाच्‍या माध्‍यमातून निश्‍‍चय केला आणि तो पुढे नेला. 

-----------------------
अनेक मित्रांनी ब्‍लॅकमध्‍ये म्‍हणजे चोरून सिगारेट मिळते का, यासाठी फोन केले. मात्र, मी स्वतःवर नियंत्रण ठेवण्‍याचा निर्णय घेतला. कारण आता सिगारेट सोडू शकलो नसतो तर केव्‍हाच सुटली नसती. 
- अमोल नामक (युवक) 

----------------------- 

आता मद्याशिवाय लागते झोप 
रोज मद्य घेतल्‍याशिवाय झोपच येत नव्‍हती. अनेक मित्रांना पहिला फोन करून त्‍यांच्‍या घरी मद्य आहे का विचारले. मात्र, त्‍यांच्‍याकडेही नव्‍हते. मग घरच्‍या घरी व्‍यसन कसे सोडवावे याबद्दलची माहिती इंटरनेटवरून घेतली. व्‍यायाम, योग्‍य आहार सुरू केल्‍याने आता कोणत्‍याही प्रकारचे मद्य न घेता झोप लागत असल्‍याची माहिती एका व्‍यक्‍तीने दिली. 

 

 

 

संबंधित बातम्या