हॉस्पिसियोत १० इमर्जन्सी, ४ ‘कोविड’ ओपीडी सुरू

Dainik Gomantak
मंगळवार, 14 एप्रिल 2020

सोशल डिस्टंसिंगला केंद्रस्थानी ठेऊन रुग्णांना तपासण्यात येत असून आजपासून रुग्णांना तपासण्यासाठी १० इमर्जन्सी ओपीडी आणि ४ कोविड ओपीडी सुरू केलेल्या आहेत. बालरोगशास्त्र आणि प्रसूतिशास्त्र ओपीडी सोडल्यास सर्व तज्‍ज्ञ डॉक्टरांच्या ओपीडी बंद करण्यात आलेल्या असून मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार कोविड ओपीडी २४ तास सुरू राहणार आहेत.

सासष्टी,

‘कोविड-१९’ स्पर्शातून तसेच संपर्कातून फैलावत असल्यामुळे सध्या सुरक्षित अंतर ठेवण्यावर भर देण्यात येत आहे. मडगाव हॉस्पिसियो इस्पितळाने तपासणी करताना रुग्णांनी सामाजिक अंतर ठेवावे, यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. इस्पितळात येणाऱ्या रुग्णांना तपासण्यासाठी १० इमर्जन्सी ओपीडी, तर ४ ‘कोविड’ ओपीडी सुरू केल्‍या आहेत. इस्पितळात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मोफत मास्क देण्यात येत आहे. रुग्णांची एकाच वेळी गर्दी होऊ नये यासाठी सकाळी ८.३० ते संध्याकाळी ४ वा.पर्यंत ओपीडी सुरू ठेवण्यात आल्या आहेत. 
सोशल डिस्टंसिंगला केंद्रस्थानी ठेऊन रुग्णांना तपासण्यात येत असून आजपासून रुग्णांना तपासण्यासाठी १० इमर्जन्सी ओपीडी आणि ४ कोविड ओपीडी सुरू केलेल्या आहेत. बालरोगशास्त्र आणि प्रसूतिशास्त्र ओपीडी सोडल्यास सर्व तज्‍ज्ञ डॉक्टरांच्या ओपीडी बंद करण्यात आलेल्या असून मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार कोविड ओपीडी २४ तास सुरू राहणार आहेत. उपचारासाठी आलेल्या रुग्णांना आवश्यकतेनुसार त्वरित उपचार देण्यात येतील, अशी माहिती हॉस्पिसियो इस्पितळाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ आयरा आल्मेदा यांनी दिली.
हॉस्पिसिओत येणाऱ्या रुग्णांच्या नाव नोंदणीसाठी हॉस्पिसिओच्या कर्मचाऱ्यांना बाहेर बसण्याची व्यवस्था केली असून नाव नोंद करताना रुग्णांच्या समस्या जाणून घेऊन रुग्णांना संबंधित ओपीडीत पाठविण्यात येत आहे. हॉस्पिसिओ इस्पितळात गर्दी होऊ नये, यासाठी सकाळी ८.३० ते संध्याकाळी ४ वा.पर्यंत सर्व ओपीडी सुरू ठेवण्यात येणार आहे. कोविडची लक्षणे आढळल्यास संशयित रुग्णाला त्वरित क्वारंटाइन करण्यासाठी पाठविण्यात आहे.  रुग्णांच्या हातावर क्वारंटाइन स्टॅम्प लावण्यासाठी इस्पितळाच्या प्रवेशद्वारावर हेल्प डेस्कची व्यवस्थाही केल्‍याचे डॉ. आल्मेदा यांनी सांगितले. इस्पितळात तसेच इस्पितळात उपचारासाठी येणाऱ्यामध्ये सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी विशेष समिती नियुक्त केल्‍याचे त्यांनी सांगितले. 

 

संबंधित बातम्या