१५४२ पैकी १५३९ कॉल्‍सना केली १०८ रूग्‍णवाहिकेने मदत

Dainik Gomantak
रविवार, 12 जानेवारी 2020

पणजी, 
२०१९ वर्षात प्रत्‍येक खात्‍याने आणि सरकारी व्‍यवस्‍थेने केलेल्‍या कामगिरीची माहिती आणि कौतुक सर्वत्र केले जात आहे. आरोग्‍याच्‍या बाबतीत मदतीचे मोलाचे कार्य करणारी १०८ रूग्‍णवाहिकासुध्‍दा यामध्‍ये मागे नाही. २०१९ साली या रूग्‍णवाहिकेला आलेल्‍या १५४२ पैकी १५३९ कॉल्‍सना या रूग्‍णवाहिकेने मदत केली असल्‍याची माहिती रूग्‍णवाहिका व्‍यवस्‍थापनाने दिली. या आकड्यांमध्‍ये सुमारे १०० पेक्षा अधिक अपघात असून यासह १५३९ कॉल्‍सच्‍या मदतीसाठी ही रूग्‍णवाहिका सेवा धावून आली आहे. 

३१ डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात अपघात गोव्‍यासारख्‍या पर्यटनप्रणित राज्‍यात होतात. मागीलवर्षी ३१ डिसेंबर २०१९ रोजी राज्‍यात १०० पेक्षा जास्‍त अपघातांची नोंद झाली. या प्रत्‍येकी अपघातातील जखमींना इस्‍पितळांपर्यंत नेत त्‍यांना जीवनदान देण्‍याचे आणि मदत करण्‍याचे काम १०८ रूग्‍णवाहिकेने केले. याचदिवशी घसरून पडण्‍याच्‍या ४३ घटना तर हृदयविकाराच्‍या झटक्‍याबाबत मदत मागणार्‍या १८ घटना घडल्‍या. मात्र १०८ रूग्‍णवाहिकेने दाखविलेल्‍या तत्परतेमुळे यातील सर्वांचा जीव वाचला आहे. 

संबंधित बातम्या