मुरगावात १४ विदेशी आंतरराष्ट्रीय पर्यटक जहाजे

Dainik Gomantak
बुधवार, 1 जानेवारी 2020

डिसेंबर २०१९ पर्यंत पहिल्या टप्प्यात एकूण १४ विदेशी आंतरराष्ट्रीय पर्यटक जहाजे मुरगाव बंदरात दाखल झाली. यातून ३०,२०१ देशी विदेशी पर्यटक गोव्यात दाखल झाले.

प्रदीप नाईक
दाबोळी

२०१९-२० या पर्यटन हंगामात सागरी पर्यटनाचा पहिला टप्पा पार पडला असून डिसेंबर २०१९ पर्यंत पहिल्या टप्प्यात एकूण १४ विदेशी आंतरराष्ट्रीय पर्यटक जहाजे मुरगाव बंदरात दाखल झाली. यातून ३०,२०१ देशी विदेशी पर्यटक गोव्यात दाखल झाले. तर मुंबई-गोवा अशा फेऱ्या मारणाऱ्या ‘कार्निका’ या देशी पर्यटक जहाजाच्या १२ फेऱ्यात एकूण १७,६५९ देशी पर्यटक गोव्यात दाखल झाले. एकूण पहिल्या टप्प्यात २६ देशी विदेशी पर्यटक जहाजातून ४७, ८६० देशी विदेशी पर्यटक २०१९ या मावळत्या वर्षात गोव्यात दाखल झाले. या सागरी पर्यटनातील डिसेंबर २०१९ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण झाला असून २६ डिसेंबर २०१९ रोजी या सागरी पर्यटन हंगामातील पहिल्या टप्प्यातील शेवटचे तसेच १४वे पर्यटक जहाज ‘सेलेब्रेटी कॉन्स्टेलेशन’ ३१२९ पर्यटकांना घेऊन गोव्यात मुरगाव बंदरात दाखल झाले.
नयनरम्य सौंदर्यासाठी प्रसिध्द असलेला गोवा येथील समुद्रकिनारे, मंदिरे, चर्च तसेच इतर पर्यटक स्थळांसाठीही जगभर प्रसिद्ध असून प्रत्येक देशातील पर्यटक गोव्यातील पर्यटक स्थळांनाच जास्त पसंती देतो. गोवा आता केवळ समुद्रकिनारी पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्धीच्या झोतात नसून ते सर्वांगाने व्यापून गेलेले पर्यटन स्थळ आहे. गोवा हा केवळ गोमंतकीयांचा नाही तर प्रत्येकाचा आपला बनला आहे. पर्यटनाचे स्वरूप आता बदलत आहे. काळानुरूप आता इथे विविध बदल झाले आहेत. रोप वे सील्पेन, हॉट एअर बलून हनिमून डेस्टिनेशन अशा नवीन प्रकल्पामुळे सध्या गोवा हे उत्कृष्ट पर्यटन स्थळ म्हणून पुढे आले आहे. ग्रामीण जीवनशैली येथील सण, कार्निव्हल, शिगमोत्सव हे पर्यटकांना नेहमीप्रमाणे भावतात.
दरम्यान, याच कारणास्तव गोव्यात सध्या पर्यटकांचा ओघ चालू असून सागरी पर्यटनांतून देशी विदेशी पर्यटकांचा जास्त कल असलेला दिसून आला आहे. गेल्या वर्षी ४० विदेशी पर्यटक जहाजातून ७० हजाराहून अधिक पर्यटक गोव्यात दाखल झाले होते. तर यंदा मे.जे.एम.बक्‍सी व इनकॅप सिपिंग या कंपनीच्या माध्यामातून गोव्यात मुरगाव बंदरात ४२ विदेशी पर्यटक जहाजे दाखल होणार असून पैकी १४ विदेशी पर्यटक जहाजे पहिल्या टप्प्यात म्हणजे डिसेंबर पर्यंत येऊन गेली. यातून ३०,२०१ देशी विदेशी पर्यटक गोव्यात दाखल झाले होते. याव्यतिरिक्त इनकॅप सिपिंग या कंपनीच्या प्रायोजनाखाली ‘कार्निका’ हे देशी पर्यटक जहाजाच्या मुंबई - गोवा अशा बारा फेऱ्यांमधून एकूण १७,६५९ देशी पर्यटक गोव्यात दाखल झाले. तर एकूण ऑक्‍टोबर ते डिसेंबर २०१९ या तीन महिन्यात सागरी पर्यटन हंगामाच्या पहिल्या टप्प्यात २६ देशी विदेशी पर्यटक जहाजातून ४७,८६० देशी विदेशी पर्यटक या मावळत्या वर्षात गोव्यात दाखल झाले.
प्रायोजक मे.जे. एम.बक्‍सी यांच्या माध्यमातून एकूण आठ विदेशी पर्यटक जहाजे गोव्यात मुरगाव बंदरात दाखल झाली. यात ९७८३ प्रवासी तर ५२५९ या जहाजातील कर्मचारी मिळून १५०४२ देशी विदेशी पर्यटक गोव्यात आले. जे एम.बक्षी तर्फे सिल्वर स्पिरीट, सेव्हन सीज-व्होलजर, मरेल्ला डिस्कव्हरी, नोर्वजीयन जडे, युरोपा, सेलेब्रीटी कॉन्स्टेलेशन, नौटीका, अशी जहाज दाखल झाली होती.
दरम्यान, प्रायोजक इनकॅप शिपिंग या कंपनीच्या माध्यमातून कॉस्ता विक्‍टोरिया, आयडाविटा, कॉस्ता फोर्च्यूना अशी तीन विदेशी पर्यटक जहाजे दाखल झाली. यात कॉस्ता विक्‍टोरिया याच्या चार फेऱ्या गोव्यात झाल्या. तसेच या कंपनीच्या माध्यमातून ‘कार्निका’ या देशी जहाजाच्या मुंबई - गोवा असा १३ फेऱ्या झाल्या. यात ९९३२ प्रवासी व या जहाजावरील ७७२७ कर्मचारी मिळून १७,६५९ देशी पर्यटक या ‘कार्निका’ पर्यटक जहाजातून दखल झाले. पैकी ५०० विदेशी पर्यटकांचा समावेश होता. तर आलेल्या सहा विदेशी जहाजातून १०,५८७ प्रवासी व ४५७२ या जहाजावरील कर्मचार मिळून १५,१५८ देशी विदेशी पर्यटक गोव्यात दाखल झाले.
दरम्यान २०१९-२०२० या पर्यटन हंगामाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरवात उद्या गुरुवार १ जानेवारी २०२० रोजी ‘कॉस्ता विक्‍टोरीया’ या विदेशी जहाजाद्वारे होणार आहे. सदर जहाज इनकॅप शिपिंग या कंपनीच्या प्रायोजनाखाली येणार असून या जहाजातून १७३३ प्रवासी व या जहाजावरील ८०३ कर्मचारी मिळून २३३६ देशी विदेशी पर्यटक नववर्षारंभी गोव्यात दाखल होणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात २६ विदेशी आंतरराष्ट्रीय पर्यटक जहाजे मे.जे. एम.बक्षी व इनकॅप शिपिंग या कंपनीच्या प्रायोजनाखाली दाखल होणार आहेत. यात इनकॅप शिपिंग कंपनीतर्फे कॉस्ता विक्‍टोरीया, ला बेला देस ओशियन, विकींग सन, आयडा विटा, कॉस्ता डेलिसीओशा, आयडाबेला आदी विदेशी पर्यटक जहाजे मुरगाव बंदरात गोव्यात दाखल होणार आहे. तर मे.जे. एम.बक्‍सी यांच्या प्रायोजनाखाली सेलेब्रीटी कॉन्स्टेलेशन बौडीका, मेन स्कीफ ५, नॉर्वेजियन जडे, अलबट्रोस, सेवन सीज मरीन, मरेल्ला डिस्कव्हरी, असूका २, इनिसग्नीचा, नौटीका आदी विदेशी आंतरराष्ट्रीय पर्यटक जहाजे देशी विदेशी पर्यटकांना घेऊन गोव्यात दाखल होणार आहेत. यात मे.जे.एम. बक्‍सीतर्फे १६ विदेशी पर्यटक जहाजातून एकूण ३४,९३३ देशी विदेशी पर्यटक गोव्यात दाखल होणार आहेत. ही सर्व आंतरराष्ट्रीय पर्यटक जहाजे हार्बर येथील एमपीटीतर्फे बांधलेल्या स्वतंत्र्य जेटीवर नांगरली जातात. याव्यतिरिक्त कार्निका या देशी जहाजाच्या मुंबई गोवा अशा फेऱ्या असणार आहे

संबंधित बातम्या