१५ व्या वित्त आयोग गोवा दौऱ्यावर

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

पणजी:१५व्या वित्त आयोगाचा २३, २४ रोजी गोवा दौरा

पणजी:१५व्या वित्त आयोगाचा २३, २४ रोजी गोवा दौरा
१५व्या वित्त आयोगाचा २३ व २४ जानेवारीला गोवा दौरा नियोजित आहे.आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंग यांच्या अध्यक्षतेखालील वित्त आयोगाचे पथक गोवा दौऱ्यावर येत आहे. राज्यातील आर्थिक स्थितीवर त्यांनी आज राज्याचे प्रधान महालेखापाल आशुतोष जोशी यांच्याशी चर्चा केली.राज्यातील दोन दिवसाच्या दौऱ्यात आयोग नागरी स्थानिक संस्था, ग्रामीण स्थानिक संस्था, उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रातील प्रतिनिधी आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहे. मुख्यमंत्री आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेतही आयोगाची तपशीलवार चर्चा अपेक्षित आहे. गोव्यात वित्त आयोग येत नसल्याने विरोधकांनी विधानसभेतील कामकाजावेळी टीका केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आयोग गोव्यात येणार असल्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार हा आयोग गोव्यात येत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 हे वाचा डिचोलीतील रस्ते वाहतुकीस असुरक्षीत

संबंधित बातम्या