165 बांगलादेशी मुंबईतून निघाले

Dainik Gomantak
सोमवार, 4 मे 2020

बांगलादेशात परतल्यावर त्यांना 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.

मुंबई

आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद असल्याने विविध देशांत अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत आणण्याची मोहीम बांगलादेशने सुरू केली आहे. त्याअंतर्गत आज मुंबईहून खास विमानाने 165 बांगलादेशी बांगलादेशला निघाले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 165 बांगलादेशींनी बांगलादेशच्या विमानाने प्रयाण केल्याचे वृत्त आहे. यापूर्वी बांगलादेशने कोलकाता तसेच दिल्लीत कामानिमित्त गेलेल्या बांगलादेशींना परत घेण्यात आले आहे. त्यानुसार 1 मे रोजी कोलकाता आणि 2 मे या दिवशी दिल्लीहून बांगलादेशवासीय परत आले होते. त्यांना वैद्यकीय तपासणीनंतरच प्रवासास परवानगी देण्यात आली होती. बांगलादेशात परतल्यावर त्यांना 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. गुवाहाटी, आगरतळा तसेच चेन्नईहूनही त्यांना परत आणण्यात आले. भारतात सुमारे दीड हजार बांगलादेशवासीय अडकले होते, असा दावा करण्यात आला.
 

संबंधित बातम्या