महाराष्ट्रात 17 हजार 813 जणांना अटक

Dainik Gomantak
शनिवार, 2 मे 2020

राज्यभरात पोलिस विभागाच्या 100 या क्रमांकावर 82 हजार 128 दूरध्वनी आले. पोलिसांनी हातावर होम क्वारंटाईन असा शिक्का असलेल्या 628 व्यक्तींना शोधून विलगीकरण कक्षात पाठवले.

मुंबई

कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या नियमाच्या उल्लंघनाचे 89 हजार 383 गुन्हे राज्यात दाखल झाले आहेत. या प्रकरणांत एकूण 17 हजार 813 जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक 14 हजार 220 गुन्हे पुण्यात दाखल करण्यात आले. मुंबई पोलिसांनी 10 हजार 490 गुन्हे नोंदवले. ठाण्यात 1625 आणि नवी मुंबईत 537 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. रायगडमध्ये 402, तर पालघरमध्ये 990 गुन्हे दाखल करण्यात आले. ठाणे ग्रामीण पोलिसांनी 711 गुन्हे दाखल केले. वेगवेगळ्या गुन्ह्यांबद्दल 3 कोटी 14 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
राज्यभरात पोलिस विभागाच्या 100 या क्रमांकावर 82 हजार 128 दूरध्वनी आले. पोलिसांनी हातावर होम क्वारंटाईन असा शिक्का असलेल्या 628 व्यक्तींना शोधून विलगीकरण कक्षात पाठवले. अवैध वाहतूक करणाऱ्या 1242 वाहन चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. परदेशी नागरिकांविरोधात व्हिसा उल्लंघनचे 15 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या