छायापत्रकाराची कॉलर पोलिसांना पडली महागात 

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

नावेली :गोमंतकचे वरिष्ठ छायापत्रकार सोयरू कोमारपंत मडगाव कदम्ब बस्थानकावर सोमवारी दुपारच्या सुमारास छायाचित्र काढण्यासाठी गेले असता त्यांना अटकाव करून पोलीस जीपमध्ये जबरदस्तीने बसवून फातोर्डा पोलीस स्थानकावर नेल्याप्रकरणी पोलीस जीपचा चालक उजेश नाईक व महेंद्र गोसावी या पोलीस कॉन्स्टेबलसला सेवेतून निलंबित करण्यात आले.दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावास यांनी त्यांच्या निलंबनाचा आदेश जरी केला. कोमारपंत हे मडगाव बस्थानकाचे फोटो घेत होते.या बसथनकावर एका बसमध्ये प्रवाशांमध्ये बाचाबाची सुरु होती व त्यावेळी पोलिसांची जीप तिथे पोहचली.कोमारपंत यांनी या घटनेचे छायाचित्र घेतले.त

नावेली :गोमंतकचे वरिष्ठ छायापत्रकार सोयरू कोमारपंत मडगाव कदम्ब बस्थानकावर सोमवारी दुपारच्या सुमारास छायाचित्र काढण्यासाठी गेले असता त्यांना अटकाव करून पोलीस जीपमध्ये जबरदस्तीने बसवून फातोर्डा पोलीस स्थानकावर नेल्याप्रकरणी पोलीस जीपचा चालक उजेश नाईक व महेंद्र गोसावी या पोलीस कॉन्स्टेबलसला सेवेतून निलंबित करण्यात आले.दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावास यांनी त्यांच्या निलंबनाचा आदेश जरी केला. कोमारपंत हे मडगाव बस्थानकाचे फोटो घेत होते.या बसथनकावर एका बसमध्ये प्रवाशांमध्ये बाचाबाची सुरु होती व त्यावेळी पोलिसांची जीप तिथे पोहचली.कोमारपंत यांनी या घटनेचे छायाचित्र घेतले.त्यावेळी पोलीस जीपमधून आलेल्या जीपच्या चालकाने कोमारपंत याना दमदाटी करून फोटो काढण्यास मनाई केली,पण मीही फक्त ड्युटी करत असल्याचे कोमातपंत यांनी पोलिसांना सांगितले. 
कोमारपंत याना जीपमध्ये घालून पोलीस स्थानकावर नेण्याची सूचना जीप चालक पोलिसाने सहकार्याला केली.पोलीस कॉन्स्टेबलने कोमातपंत यांच्या शर्टाच्या कॉलरला पकडून जीपमध्ये बसवले.कोमारपंत यांनी आपण छायाचित्रकार असल्याचे सांगितले व दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अरविंद गावस याना तात्काळ फोन लावून त्या पोलिसांचीही त्यांच्याशी बोलणे करून दिले.पण ते पोलीस ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.त्यांनी कोमातपंत याना फातोर्डा पोलीस स्थानकात आणले.निरीक्षक कपिल नायक याना कोमारपंत यांनी पोलसांवर कारवाईची मागणी केली.मडगावच्या पत्रकारांनी आधी फातोर्डाचे पोलीस निरीक्षक कपिल नायक यांची व नंतर दक्षिण गोव्याचे अधीक्षक अरविंद गावास यांची भेट घेऊन पोलिसांवर कारवाईची मागणी केली. 
मग सामान्य नागरिकांची काय स्थिती? 
पत्रकारांवर अशी दमदाटी तर सामान्य जनतेच्या बाबतीत कश्याप्रकारे वागणूक होईल असा पत्रकार अनुराधा मोघे यांचा प्रश्न 
रॉबर्ट व्हॅनमधील पोलिसांकडून आपल्यास मिळालेली वागणूक अपमानास्पद असल्याचे कोमारपंत यांनी सांगितले.कोणताही गुन्हा नसतानाही आपण आपली स्कुटर घेऊन पोलीस स्थानकावर येतो,असे सांगितले तरी देखील ते पोलीस एकूण घेत नव्हते.त्यांनी माज्या शर्टाच्या कॉलरला पकडून जबरदस्तीने जीपमध्ये बसवले व पोलीस स्थानकावर आणले.या प्रकरणाची दाखल घेऊन दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक गावस, उपमहानिरीक्षक राजेश कुमार व पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी तात्काळ कारवाई केल्याबद्दल गोवा श्रमिक पत्रकार संघटनेने आभार व्यक्त  केले आहेत. 

"तंबाखूवरील निर्बंधांसाठी नवा कायदा चालीस लावण्‍याची गरज "

गुज तर्फे पोलिसांच्या वर्तनाचा निषेध 
छायापत्रकार सोयरू कोमारपंत यांच्याशी पोलिसांनी असभ्य वर्तन करून त्यानं जीपमध्ये कोंबल्याप्रकरणी गोवा पत्रकार संघातर्फे व गोवा छायाचित्रकार संघटनाने या घटनेचा निषेध केला आहे.या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल करून संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पत्रकारांशी पोलिसांनी केलेले वर्तन पोलीस खात्याची प्रतिमा बदनामी करणारी आहे,हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. 

संबंधित बातम्या