पेडणे तालुक्यातून २० उमेदवारी अर्ज

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 मार्च 2020

पेडणे: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या आज शेवटच्या दिवशी पेडणे तालुक्यातील चारही मतदारसंघातून २० उमेदवारी अर्ज आले. हरमल व मोरजी मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे दोन उमेदवार अर्ज तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन उमेदवारांचे अर्ज,आम आदमी पक्षाचा एक अर्ज तर अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

हरमल मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षातर्फे नरेश मनोहर कोरगावकर तर काँग्रेस पक्षातर्फे नारायण लक्ष्मण रेडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

मोरजी मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे महेश जनार्दन कोनाडकर,राष्ट्रवादी काँग्रेसपक्षातर्फे ज्योओ फर्नांडिस, आम आदमी पक्षातर्फे प्रसाद कमलाकर शहापूरकर तर सतीश सीताराम शेटगावकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले.

धारगळ मतदारसंघातून दिवाकर वासुदेव जाधव (अपक्ष), ज्ञानेश्वर सीताराम वारखंडकर (अपक्ष), गुरुदास गणेश विर्नोडकर (अपक्ष), हरिश्चंद्र फटी पार्सेकर (अपक्ष), तर मनोहर यशवंत धारगळकर (भाजप),पुंडलिक मदन धारगळकर (अपक्ष ), समिर लक्ष्मण पार्सेकर (अपक्ष ) यांनी उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले. तोरसे या महिलासाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून रुपाली रमाकांत तुळसकर (अपक्ष ), शांती शांताराम कोरगावकर (अपक्ष),सिमा रामा खडपे (भाजप), भारती फटी सावळ (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

संबंधित बातम्या