गोव्यात २१९२ ठिकाणी निर्जंतुकीकरण

dainik gomantak
गुरुवार, 30 एप्रिल 2020
गोव्यात २१९२ ठिकाणी निर्जंतुकीकरण

पणजी,

राज्यात टाळेबंदी लागू झाल्यापासून ‘कोविड-१९’ विरोधात लढा देण्यासाठी अग्निशामक दलातर्फे सुमारे २१९२ सार्वजनिक ठिकाणांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ठिकाणे मडगाव (५३७) या भागातील आहेत. सरकारी कार्यालये, पालिका तसेच वाहनांचाही यामध्ये समावेश आहे.
‘कोविड-१९’चा प्रादुर्भाव व प्रसार राज्यात होऊ नये यासाठी अग्निशमन दलातर्फे राज्यभर अनेक ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी पाण्याचे बंबचा वापर करण्यात आला. पालिका व पंचायत क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणांना निर्जंतुकीकरणासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. ज्या भागात परप्रांतियांची वस्ती आहे त्या परिसरातही निर्जंतुकीकरणाचा वापर करण्यात आला. या कामासाठी दलाच्या स्थानकात असलेल्या कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली. गरजेनुसार ही निर्जंतुकीकरण मोहीम यापुढेही सुरू ठेवली जाणार आहे, अशी माहिती या दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

 

 

संबंधित बातम्या