सासष्टीत ३५ उमेदवार रिंगणात

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 8 मार्च 2020

सासष्टीः  जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी सासष्टी तालुक्यातील नऊ मतदारसंघातून ३५ उमेदवार रिंगणात आहेत. आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ४१ पैकी सहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून अर्ज मागे घेतलेले सहाही पक्ष उमेदवार आहेत.

सासष्टीः  जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी सासष्टी तालुक्यातील नऊ मतदारसंघातून ३५ उमेदवार रिंगणात आहेत. आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ४१ पैकी सहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून अर्ज मागे घेतलेले सहाही पक्ष उमेदवार आहेत.

झियाउल्ला रिकर्टी (दवर्ली), फातिमा गावकर (राय), रेमिडीयस फर्नांडिस (बाणावली), मिंगेल कार्दोझ (नावेली) मिनाक्षी गावकर (गिरदोली), स्वाती गावकर (गिरदोली) यांनी अर्ज मागे घेतले.
सासष्टी तालुक्यात एकूण ५७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यातील काल छाननी प्रक्रियेत ४१ उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले, तर आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सहा अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने सासष्टीमधून ३५ उमेदवार जिल्हा पंचायत निवडणूक लढविणार आहेत. दवर्ली मतदारसंघातून उल्हास तुयेकर (भाजप), अब्दुल शेख (अपक्ष), फ्लोरियानो फर्नांडिस (अपक्ष), मुर्तुजा कुकनुर (काँग्रेस), प्रदीप वेर्लेकर (अपक्ष) आणि सुकुर गोम्स (अपक्ष) हे सहा उमेदवार निवडणूक लढणार आहेत.

राय मधून जोजफ वाझ (काँग्रेस), क्रूझ परेरा (अपक्ष), डॉम्निक गावकर (अपक्ष) आणि लियांड्रिना गोम्स (आप) हे चार उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. नुवेमधून ब्रिझी बार्रेटो (अपक्ष), असुसियाना रॉड्रिग्ज (काँग्रेस) आणि मार्सेलिना कुलासो (आप) हे तीन उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. कोलवामधून सुझी फर्नांडिस (काँग्रेस), ऐश्र्वर्या फर्नांडिस (आप) आणि वानिया बाप्तिस्त (राष्ट्रवादी काँग्रेस) हे तीन उमेदवार निवडणूक लढविणार आहे. बाणवलीमधून मिनिन फर्नांडिस (राष्ट्रवादी काँग्रेस), रॉयला फर्नांडिस (काँग्रेस) आणि हेझल फर्नांडिस (आप) हे तीन उमेदवार निवडणूक लढणार आहेत.

वेळळीमधून जोन्स सिल्वा (अपक्ष), जुलिओ फर्नांडिस (काँग्रेस), आंतोनियो रॉड्रिग्ज (अपक्ष), राफेल कार्दोझ (अपक्ष), स्वप्निल झाटेकर (अपक्ष) आणि ताउमार्तुग रॉड्रिग्ज हे सहा उमेदवार निवडणूक लढणार आहेत. नावेलीमधून जुझे कुयेलो (काँग्रेस), एडवीन (सिप्रु) कार्दोझ (अपक्ष) आणि मातिल्डा डिसिल्वा (आप) हे तीन उमेदवार निवडणूक लढणार आहेत. गिरदोलीमधून रुदोल्फिना वाझ (आप), संजना वेळीप (भाजप) आणि सोनिया फर्नांडिस (काँग्रेस) हे तीन उमेदवार निवडणूक लढणार आहेत. कुडतरीतूनमधून मिशॅल रिबेलो (कॉग्रेस), ब्रिंडा सिल्वा (आप), सरिता फर्नांडिस (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि ऍन्ड्रिया फर्नांडिस (अपक्ष) हे चार उमेदवार निवडणूक लढणार आहेत.
 

संबंधित बातम्या