तिसऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेचे उद्‌घाटन

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

वास्को:कौशल्‍यासह मुल्‍य शिक्षणावर भर द्या
कुलभूषण शर्मा : तिसऱ्या राष्‍ट्रीय शैक्षणिक परिषदेचे उद्‍घाटन
पूर्वीचे राजेसुद्धा ज्ञानप्राप्तीसाठी कुटीमध्ये जात असे. त्यांना तेथे कौशल्य, मूल्य शिक्षणासह अध्यात्मिक शिक्षण मिळत असे. परंतु, आता आम्ही या गोष्टींपासून दूर गेलो आहोत. त्यामुळे प्रत्येकजण कुटीतून महालाकडे जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे का होत आहेत यासंबंधी विचारमंथन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वतंत्र विद्यालये संघाचे अध्यक्ष कुलभूषण शर्मा यांनी येथे केले.

अखिल गोवा सरकारी मान्यताप्राप्त विनाअनुदान विद्यालय संघटनेने ‘एज्युव्हिजन इंडिया २०३०’ अंतर्गत ‘शिक्षण व अध्यात्मिकता' या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय शैक्षणिक परिषद बायणा रवींद्र भवनामध्ये आयोजित केली होती. याप्रसंगी प्रमुख वक्ते या नात्याने शर्मा बोलत होते. व्यासपीठावर गोवा राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण मंडळाचे अध्यक्ष नागराज होन्नेकरी, संघटनेचे अध्यक्ष दीपक खेतान, सचिव विजय शेट्टी, अधिवेशाचे समन्वयक एलिझाबेथ वालसन, सहाय्यक समन्वयक संध्‍या व्यंकटेश होते.शर्मा म्हणाले की, प्रत्येकजण महालाकडे जाण्याचे स्वप्न पाहतो. त्यामुळे ती कुटी कोठे गेली. जे आम्ही गमावले आहे.ते पुन्हा कसे आणता येईल यासंबंधी विचारमंथन झाले पाहिजे. देशभरात नवीन शिक्षण धोरण अंमलात आणण्याचा विचार चालू आहे. तथापि शिक्षणाला अध्यात्मिकची जोड देण्यात यावी, अशी मागणी आमच्या संघटनेने केली आहे. या नवीन शिक्षण धोरणामध्ये काही उणिवा आहेत.त्या दूर केल्यावर ते धोरण अंमलात आणण्याची गरज आहे. शिक्षण व अध्यात्मिकता यामध्ये भारत देश विश्‍वगुरू होता. तो भारत पुन्हा मिळविण्याची गरज आहे.
होन्नेकरी म्हणाली की, या संघटनेने अध्यात्मिकता हा विषय घेतला ही चांगली गोष्ट आहे.सध्या आम्ही भयमुक्त असतो. मी बोललो तर दुसरा काय म्हणेल, या भीतीने आम्ही स्पष्ट बोलतच नाही. जोपर्यंत तुम्ही खरे चित्र दाखवीत नाही, तोपर्यंत तुम्ही प्रगती करू शकत नाही. शॉर्टकट मार्गामुळे आपले नुकसान होते हे लक्षात ठेवा. शिक्षकांच्या जबाबदारी मोठी आहे. शिक्षक असल्याबद्दल अभिमान बाळगा.खरा शिक्षक हा शेवटच्या श्‍वासापर्यंत शिक्षकच राहतो. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम हे राष्ट्रपतीनंतर पुन्हा शिक्षणाकडे वळले आणि शिकविता शिकविता त्यांनी देह ठेवला.

१५ व्या वित्त आयोग गोवा दौऱ्यावर
दीपक खेतान यांनी स्वागत केले. विजय शेट्टी यांनी वार्षिक अहवाल सादर केला.संध्या व्यंकटेश यानी सदर परिषद आयोजन करण्यामाघील उद्देश सांगितला. याप्रसंगी चिन्मय आंतररराष्ट्रीय निवासी विद्यालय कोईम्‍बतुरचे संचालक स्वामी अनुकुलानंद, सोसायटी ऑफ मिशनजीर ऑफ सेंट फ्रान्सिस झेव्हियरचे सदस्य डॉ.आयव्हन आल्मेदा, ब्रह्माकुमारीच्या प्रशिक्षक बी. के. सुमन वगैरांनी उपस्थित शिक्षकांना अध्यात्मिक शिक्षणासंबंधी मार्गदर्शन केले.

संबंधित बातम्या