गोव्यातील सनदी अधिकाऱ्यांची बदली

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

९ अधिकाऱ्यांच्या बदल्या

पदाच्या प्रतीक्षेत असलेले विनेश आर्लेकर यांची भू नोंदणी व सेटलमेंट संचालकपदावर, गोवा हस्तकला व ग्रामीण विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डेरीक नेटो यांची गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकपदी तसेच गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.

पणजी : गोवा नागरी सेवेतील नऊ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश आज काढण्यात असून खाण व भूगर्भ खात्याचे संचालकपदी अरविंद बुगडे, तर मुख्यमंत्र्यांची संयुक्त सचिव व्ही. पी. डांगी यांची वर्णी लावण्यात आली आहे. वाणिज्य कर आयुक्तपदी आयएएस अधिकारी हेमंत कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एस. व्ही. नाईक यांची गोवा शिक्षण संचालक महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी. गोवा शिक्षण संचालक महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक नीतल आमोणकर यांची गोवा मानवाधिकार आयोगाच्या सचिवपदी, वाणीज्य कर आयुक्त दीपक बांदेकर यांची उद्योग, व्यापार व वाणिज्य खात्याचे संचालकपदी, तर या खात्याचे संचालक व्ही. पी. डांगी यांची मुख्यमंत्र्यांचे संयुक्त सचिव, खाण संचालक आशुतोष आपटे यांची तुरुंग महानिरीक्षकपदी तसेच गोवा अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांचा अतिरिक्त ताबा, हस्तकला, टेक्सटाईल व काथा खात्याचे संचालक अरविंद बुगडे यांची खाण संचालकपदी वर्णी लावण्यात आले आहे.

याव्यतिरिक्त तुरुंग महानिरीक्षकपदी असलेले आयएएस अधिकारी हेमंत कुमार यांची वाणिज्य कर आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

कनिष्ठ श्रेणी अधिकारी पदावरील वाणिज्य कर सहाय्यक आयुक्त चंद्रेश कुंकळकर यांची उत्तर गोवा उपजिल्हाधिकारी (महसूल) तर पदाच्या प्रतिक्षेत असलेल्या त्रिवेणी वेळीप यांची दक्षिणेत उपजिल्हाधिकारी (डीआरओ) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

 

जगप्रसिद्ध फॅशन डिझाइनर वेंडल रॉड्रिग्स यांचे निधन

संबंधित बातम्या