मोरजीत साडेनऊ लाखांचा ड्रग्ज जप्त

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

हिमाचलच्या प्रदेशच्या दोघा तरुणांना अटक

किनारपट्टी भागात ड्रग्ज विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला असल्याची माहिती या कक्षाकडे पोलिस खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यामुळे साध्या वेशातील पोलिस पथक मोरजी येथील पार्किंग क्षेत्रात गस्तीवर होते.

 

पणजी : गेल्या काही दिवसांपासून अमलीपदार्थविरोधी कक्षाने ड्रग्ज विक्रेत्यांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे. मोरजी खिंड उद्यानामागे असलेल्या पार्किंगच्या जागेत काल संध्याकाळच्या सुमारास दोघा हिमाचल प्रदेशच्या तरुणांना अटक करून १ किलो ९०० ग्रॅम चरस जप्त केला. या चरसची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ९ लाख ५० हजार रुपये किंमत आहे. या कक्षाने केलेली ही आठवड्यातील दुसरी कारवाई आहे.

पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्‍या संशयितांची नावे पुरन चंद (४८) व किशोरी लाल (४४) अशी आहेत.दोन तरुण संशयास्पद घुटमळत असताना दिले असता त्यांना ताब्यात घेण्यात आले. या दोघांची झडती घेण्यात आली असता त्यांच्या खांद्यावरील बॅगेत चरस प्लास्टिकमध्ये गुंडाळण्यात आला होता. त्यांनी तो गोव्यातील पर्यटकांना विकण्यास आल्याचे प्राथमिक चौकशीवेळी कबूल केले. हे दोघेही हिमचाल प्रदेशचे स्थायिक असून पाच दिवसांपूर्वीच गोव्यात आले होते. ड्रग्जला गोव्यात चांगली मागणी असल्याने त्याची विक्री करून झटपट पैसा जमा करण्याचा त्यांचा प्रयत्न होता तो पोलिसांनी अटक करून उधळून लावला. गोव्यात आलेले हे संशयित हरमल येथील गेस्ट हाऊसमध्ये उतरले होते. गेल्या पाच दिवसांपासून ते ड्रग्ज खरेदी पर्यटक ग्राहकांचा शोध या किनारपट्टी परिसरात घेत होते.

नाना आणि हॉटेलातली कांदाभजी

गोव्यात ड्रग्ज माफिया नसले तरी हिमाचल प्रदेश येथील काही तरुण तसेच विदेशी पर्यटक ड्रग्ज विक्रीमध्ये गुंतलेले आहेत. राज्यात दरवर्षी पोलिस ठाणे, सीआयडी क्राईम ब्रँच तसेच अमलीपदार्थविरोधी कक्षातर्फे ड्रग्जप्रकरणी गुन्हे नोंद केले जातात. दरवर्षी सरासरी सुमारे दोनशेपेक्षा अधिक प्रकरणांची नोंद होते. पोलिसांची कारवाई होत असली, तरी गोव्यातील ड्रग्ज विक्रेत्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. राज्यातील ड्रग्जचे उच्चाटन करण्यासाठी सरकारने कृती दल वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आले आहे.

तीन वर्षातील ड्रग्ज प्रकरणे
वर्ष प्रकरणे

२०१७ १६८
२०१८ २२२
२०१८ २१९
२०२० १५
--------------------------------
 

संबंधित बातम्या