मुरगाव मतदारसंघातील ९०० नावे वगळली

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

मुरगाव:1400 नव्हे तर ९०० नावे वगळली-संयुक्त मामलेदार साईश नाईक
काँग्रेस शिष्टमंडळाने विचारला जाब
मुरगाव मतदारसंघातील १४०० नव्हे तर ९०० नावे मतदार यादीतून वगळली असून अजूनही ९०० नावे वगळली जाऊ शकतात अशी कबुली मुरगावचे संयुक्त मामलेदार साईश नाईक यांनी काँग्रेस शिष्टमंडळाला दिली. यामुळे मुरगावात मतदारांची नावे वगळण्याचे कारस्थान मामलेदार कार्यालयातून सुरू असल्याचा आरोप काँग्रेस शिष्टमंडळाने केला आहे.

मुरगाव:1400 नव्हे तर ९०० नावे वगळली-संयुक्त मामलेदार साईश नाईक
काँग्रेस शिष्टमंडळाने विचारला जाब
मुरगाव मतदारसंघातील १४०० नव्हे तर ९०० नावे मतदार यादीतून वगळली असून अजूनही ९०० नावे वगळली जाऊ शकतात अशी कबुली मुरगावचे संयुक्त मामलेदार साईश नाईक यांनी काँग्रेस शिष्टमंडळाला दिली. यामुळे मुरगावात मतदारांची नावे वगळण्याचे कारस्थान मामलेदार कार्यालयातून सुरू असल्याचा आरोप काँग्रेस शिष्टमंडळाने केला आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे सरचिटणीस जनार्दन भंडारी, महिला प्रदेशाध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, युवाध्यक्ष वरद म्हार्दोळकर, मुरगाव गटाध्यक्ष महेश नाईक, माजी उपनगराध्यक्ष शांती मांद्रेकर, जयेश शेटगावकर, उद्धव पोळ आणि अन्य काँग्रेस कार्यकत्यांनी संयुक्त मामलेदार साईश नाईक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मतदार यादीतून नावे वगळल्याप्रकरणी तक्रार करून, मतदारांना न्याय द्यावा अशी मागणी केली.
काँग्रेस नेते संकल्प आमोणकर यांनी मुरगावमधून १४०० मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा गौप्यस्फोट केला होता.त्यात तथ्य असल्याचे मुरगावचे संयुक्त मामलेदार साईश नाईक यांच्या कबुलीनंतर स्पष्ट झाले. एकूण १८०० जणांची नावे वगळण्यात येणार आहेत, तसा अहवाल बीएलओकडून आल्याचे श्री.नाईक यांनी काँग्रेस शिष्टमंडळाला सांगितले. तसेच आत्तापर्यंत ७५० नव्हे तर २८० नवीन नावे यादीत समाविष्ट केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुरगावमधील भाजप आमदार तथा मंत्री मिलिंद नाईक यांच्या मर्जीतील मुरारी बांदेकर, शशिकांत परब, दामोदर कासकर, लिओ रॉड्रीक्स या नगरसेवकांनी आणि उज्वल पी.नामक एका महिलेने बीएलओवर दबाव आणून मतदारांची नावे यादीतून वगळण्यास भाग पाडल्याचे यावेळी काँग्रेस शिष्टमंडळाने श्री. नाईक यांच्या निदर्शनास आणून दिले.तसेच मतदानाच्या हक्कापासून मतदारांना वंचित ठेवण्याचा मोठा गुन्हा वरील पाच जणांनी केला असल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.याप्रकरणी चौकशी करू असे आश्वासन श्री.नाईक यांनी काँग्रेस शिष्टमंडळाला दिले.

गोवा विद्यापिठात आता जपानी भाषा

बीएलओंनी सादर केलेल्या अहवालानुसार मतदारांची नावे वगळण्यात आली आहे. यामागे कोणताही राजकीय दबाव नाही. जर नावे वगळण्याच्या प्रक्रियेत कुणावरही अन्याय झालेला असेल तर त्या मतदारांनी पुनःच्छ आपली नावे नोंदविण्यासाठी अर्ज करावेत. नवीन नावे नोंदविण्याची प्रक्रिया जिल्हा पंचायतीच्या निवडणुकांत सुरू होईल.
- साईश नाईक, संयुक्त मामलेदार,मुरगाव
-----------
बीएलओंवर दबाव घालून मतदारांची नावे वगळली जात आहे. जर याकामी बीएलओनी सहकार्य केले नाही तर त्यांच्या बदलीची धमकी दिली जात आहे असे काही बीएलओंनी आपणास सांगितले.
- संकल्प आमोणकर, काँग्रेस नेते
-----------
चौकट करणे-----
तर सर्वांनी सतर्क रहावे
काँग्रेस शिष्टमंडळाने संयुक्त मामलेदार श्री.नाईक यांच्याकडे मतदारांवर अन्याय करू नये अशी मागणी केली. तसेच राजकीय दबावाखाली काम करणाऱ्या बीएलओंवर कारवाई करावी, मंत्री मिलिंद नाईक यांच्या ‘त्या’ पाचही जणांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिष्टमंडळाने केली. मुरगाव प्रमाणे अन्य मतदारसंघातही विशिष्ट मतदारांची नावे यादीतून वगळली जाऊ शकते अशी शक्यता काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली. तसेच सर्वच मतदारसंघातील काँग्रेस पुढाऱ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना केले आहे.

Remarks :

संबंधित बातम्या