धारावीत 94 नवे रुग्ण

Dainik Gomantak
सोमवार, 4 मे 2020

धारावीतील एकूण रुग्णसंख्या 590 वर पोहोचली आहे

मुंबई

धारावीत आज तब्बल 94 नवे कोरोना रुग्ण आढळले आणि दोन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनातर्फे युद्धपातळीवर प्रयत्न करूनही धारावीची परिस्थिती अद्याप नियंत्रणात आल्याचे दिसत नाही.
धारावीतील एकूण रुग्णसंख्या 590 वर पोहोचली आहे. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये 55 पुरुष; तर 39 महिला आहेत. आज दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने धारावीतील मृतांचा आकडा 20 झाला आहे.
दादर-माहीममध्येदेखील आज नवे रुग्ण सापडले. त्यामुळे येथील चिंताही वाढली आहे. आज माहीममध्ये 16; तर दादरमध्ये चार नवे रुग्ण सापडले. दोन्ही परिसरात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. माहीममधील एकूण रुग्णांची संख्या 68 झाली असून आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे; तर दादरमधील एकूण रुग्णांची संख्या 50 झाली असून मृतांचा आकडा चारवर गेला आहे.

संबंधित बातम्या