प्रजासत्ताक राष्ट्र झाल्यामुळेच सर्वांना न्याय मिळाला:आजगावकर

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

पेडणे:देशाला लोकशाही राज्य घटना मिळाल्याने व आपला देश प्रजासत्ताक राष्ट्र झाल्याने समाजातील दीन दुबळ्या घटकांना पुढे येण्यास तसेच न्याय, शिक्षण आदी बऱ्याच गोष्टींबरोबर मतदान व निवडणूक लढविण्याचा हक्क मिळाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला चांगली घटना दिली म्हणून माझ्यासारख्या एका दलित समाजातील व्यक्तीस लोकांचे प्रतिनिधीत्व करण्याचा मान मिळाला व गोव्याचे उपमुख्यमंत्री होण्याचे भाग्यही मिळाले, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी केले.

७१ व्या प्रजासत्ताकदिन सोहळ्यानिमीत्त पेडणे येथील शासकीय कार्यालयासमोर आयोजित कार्यक्रमात त्यांच्या हस्ते ध्वजरोहण झाल्यानंतर ते बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर नगराध्यक्ष श्वेता कांबळी, मामलेदार अनंत मळीक, संयुक्त मामलेदार सौ. गौतमी परमेकर, पोलिस निरीक्षक संदेश चोडणकर व अग्निशमन दलाचे अधिकारी दिलीप गावस उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री आजगावकर पुढे म्हणाले, की आज गोव्यातील युवकांनी आपले चांगले भविष्य निर्माण करायला हवे. ड्रग्जमुक्त गोवा बनविण्यासाठी तरुणांनीच पुढाकार घ्यायला ववा.खाणी सुरू होणार त्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.राज्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, तर देशाला नरेंद्र मोदी यांसारखे सक्षम नेतृत्व मिळाल्याने झपाट्याने विकास होत आहे.
स्वातंत्र्याचा लाभ जरी उशीरा, मिळाला तरी गोव्याने चौफेर विकास करून राज्याला प्रगतीपथावर नेले आहे. सुरवातीच्या काळात पेडणे तालुका जरी विकासात मागे राहीला, तरी आता माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पेडणे प्रगतीपथावर पोहचणार आहे.पेडण्यात भव्य असे ३५ हजार आसन क्षमतेचे क्रीडा मैदान, आयुष हॉस्पिटल, रवींद्र भवन असे चांगले प्रकल्प येणार आहेत.सरकार विकासकामांबाबत दक्ष आहे.
कार्यक्रमाला पेडणे विभागीय शिक्षणाधिकारी नरेंद्र नाईक, क्रीडा अधिकारी सदानंद सावळ देसाई आदी सरकारी अधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमात श्री भगवती हायस्कूल, व्हायकाउंट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.सूत्रसंचालन रामदास दावरे यांनी केले.शेवटी सेंट जोजेफ हायस्कूलच्या विद्यर्थ्यानी वंदे मातरम म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.

चौगुले खाणीवर बेकायदा उत्खनन

संबंधित बातम्या