‘अच्छे  दिन’ येणारच  नाहीत :  विजय सरदेसाई 

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 मार्च 2020

सासष्टी: देशात सर्वाधिक बेरोजगारी  गोव्यात असून गोव्यातील बेरोजगारीचा टक्का ३४.५ वर  पोहचलेला  आहे. देशात सर्वत्र विकास साधून देशात ‘अच्छे  दिन’ आणणार असल्याची घोषणा करण्यात येत होती.  पण, सध्या देशाची आर्थिक स्थिती  पाहिल्यास ‘अच्छे  दिन’ येणारच नाहीत, असे मत आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले. 

पाजीफोंड फातोर्डा येथे सामुदायिक क्रीडांगण तसेच क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास आले असता विजय सरदेसाई बोलत होते. ते म्हणाले, सरकारी नोकऱ्या करणाऱ्यांना यापुढे पगार मिळणार की नाही, हा एक प्रश्‍न असून गोव्यातील युवकांनी सरकारी नोकरीची वाट पाहून काहीही फायदा नाही. काही लोक सरकारी नोकऱ्या देण्यात येणार असल्याची विधाने करून लोकांची दिशाभूल करीत आहेत. गोव्यातील तरुण पिढीसाठी चांगले दिवस आणण्यासाठी सर्वांनी एकत्र राहून काम करणे महत्त्वाचे आहे, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

सरकारमध्ये राहिल्याने फातोर्डाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर देण्यात आला होता. हा विकास लोकांना दिसत आहे. गोव्यात फक्त फातोर्डा मतदारसंघातच होत असल्याने सरकारमधून गोवा फॉरवर्ड पक्षाला बाहेर काढण्यात आले होते, असे सरदेसाई यांनी सांगितले. धर्म, जातींमध्ये फूट घालून निवडणूक लढविणारा पक्ष लोकांना हवा की सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारा पक्ष हवा हे लोकांना निवडावा लागणार, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नगरसेवक आंजलीस परेरा, यतिन प्रभूदेसाई व इतर उपस्थित होते.

संबंधित बातम्या