मास्क न वापरल्याने दिवसात सुमारे एक हजारांविरुद्ध कारवाई

dainik gomantak
गुरुवार, 30 एप्रिल 2020

मास्क न वापरल्याने दिवसात  सुमारे एक हजारांविरुद्ध कारवाई 

पणजी,

कोविड - १९ विरोधात लढा देण्यासाठी लॉकडाऊन काळात तोंडाला मास्क लावणे व सामाजिक अंतर ठेवणे ही सक्तीचे करण्यात आले होते. तोंडाला मास्क न लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा आदेश सरकारने काढून १०० रुपये दंडही लागू केला आहे. एका दिवसभरात पोलिसांनी सुमारे एक हजार जणांविरुद्ध मास्क न वापरल्याप्रकरणी कारवाई केली आहे. 
जगभरात तसेच देशात फैलावलेल्या कोरोना विषाणू साथीला रोखण्यासाठी तोंडाला मास्क लावणे महत्त्वाचे आहे व काहीजण तो वापरत नसल्याचे आढळून आले होते. मास्क न वापरणाऱ्यांना चपराक देण्यासाठी सरकारने कारवाईचा आदेशच काढून १०० रु. दंड निश्‍चित केला आहे. हा दंड लागू करूनही काहीजण तोंडाला मास्क न लावताच फिरत आहेत. त्यामुळे पोलिसांना यासंदर्भात कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मास्क न लावणाऱ्यांना १०० रुपये दंड लागू केल्यानंतर तो वसूल करण्याचा अधिकार पोलिस हवालदार, पंचायत सविच, तलाळी तसेच पालिका निरीक्षकांना दिला आहे. 
घराबाहेर पडल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी जाताना तोंडा मास्क सक्तीचा करण्यात आला आहे. इस्पितळात सर्जरीवेळी वापरण्यात येत असलेला मास्क वापरण्यास सरकारने बंदी आणली आहे तसेच फार्मसींनाही तो न विकण्याचे निर्देश दिले आहेत. अजूनही काहीजण मास्क वापरता फिरत आहेत. काही सार्जनिक ठिकाणीही काही व्यक्ती मास्क न वापरता येतात. त्यामुळे कोविड - १९ च्या राज्य कार्यकारी समितीने मास्क न वापरणाऱ्यांना धान्यसाठा तसेच पेट्रोल न देण्याबाबत मोहीम राबिवण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित बातम्या