सावर्डेत बेकायदेशीर उत्खननावर कारवाई

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

कुडचडे:सांगे उपजिल्हाधिकाऱ्यांची धडक मोहीम चिरे व्यवसायिक यंत्रे ठेवून पळाले
सावर्डे मीराबाग येथे सरकारी जमिनीवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर चिरे उत्खनन सुरू होते.या व्यवसायिकांनी सर्व नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे सरकारी यंत्रणेच्या नाकावर टिच्चून हा व्यवसाय सुरू ठेवला होता. उपजिल्हाधिकाऱ्यांनी अचानक धडक दिल्याचे पाहताच यंत्रे बंद ठेवून व्यवसायिकांनी पळ काढला.

कुडचडे:सांगे उपजिल्हाधिकाऱ्यांची धडक मोहीम चिरे व्यवसायिक यंत्रे ठेवून पळाले
सावर्डे मीराबाग येथे सरकारी जमिनीवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर चिरे उत्खनन सुरू होते.या व्यवसायिकांनी सर्व नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे सरकारी यंत्रणेच्या नाकावर टिच्चून हा व्यवसाय सुरू ठेवला होता. उपजिल्हाधिकाऱ्यांनी अचानक धडक दिल्याचे पाहताच यंत्रे बंद ठेवून व्यवसायिकांनी पळ काढला.
सांगेचे उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांनी सांगेचा ताबा घेताच पुन्हा एकदा प्रशासन सक्रिय केले. मीराबाग सावर्डे येथे बेकायदेशीर चिरे उत्खनन, रेती उपसा संदर्भात कडक धोरण अवलंबून आज सकाळी अचानक मीराबाग येथे चिरे खाणीवर भेट दिली असता मोठ्या प्रमाणात यांत्रिक पद्धतीने चिरे उत्खनन सुरू असल्याचे आढळून आले. शिवाय जेसीपी यंत्राचा वापर करताना जेसीपीवर कोणत्याही प्रकारचा क्रमांक नसल्याचे दिसून आले.
या संदर्भात उपजिल्हाधिकाऱ्यांनी तातडीची सर्व तलाठी, मामलेदार यांची बैठक घेऊन प्रत्येक तलाठ्यांनी आपापल्या भागात त्वरित सर्वेक्षण करून बेकायदेशीर चिरे, रेती काढणाऱ्यांची माहिती देण्याचे फर्मान दिले. जर त्या त्या भागात चिरे व रेती काढत नसल्यास तलाठ्याने तशा प्रकारचे हमीपत्र देण्याचा आदेश दिला आहे.
उपजिल्हाधिकाऱ्यांच्या या कडक पवित्र्यामुळे बेकायदेशीर व्यवसायिकांचे धाबे दणाणले असून जर चुकीची माहिती दिली तर तलाठी अडचणीत येण्याची धास्ती वाढली आहे.प्रत्येक तलाठीने आपल्या भागातील अहवाल त्वरित देण्यात यावा व त्या अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांनी सांगितले.
सरकारी महसूल बुडवून व्यवसाय करणाऱ्यांवर खाण खात्याने कडक धोरण अवलंबून शिस्त आणण्याचा प्रयत्न करताना सरकारने सरकारी जमिनीवर चिरे काढण्यासाठी नवीन नियम करून महसूल गोळा करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे. राज्यात चिरे उत्खनन बंद झाल्यास दर भडकण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बांधकामावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
खाण खात्याने या व्यवसायात शिस्त आणण्याची गरज सुजाण नागरिक या पूर्वीपासून व्यक्त करत होते. खाण संचालक आशुतोष आपटे यांनी बदनाम खाण खात्याला शिस्तीत आणण्यासाठी सुरू केलेल्या प्रयत्न अभिनंदनीय असल्याचा सुर नागरिक बोलून दाखवीत आहेत.
अखेर राष्ट्रध्वजासाठी शंभरफूटी हायमास्ट खांब उभारलाच.

संबंधित बातम्या