प्रसिध्‍द अभिनेता इरफान खान यांचे निधन

dainik gomantak
बुधवार, 29 एप्रिल 2020

काही दिवसांपूर्वी इरफानच्या आई सईदा बेगम यांचं जयपूरमध्ये निधन झाल्‍याने आणि लॉकडाऊनमुळे असल्‍याने त्‍यांनी त्यावेळी व्हिडीओ कॉलवरंच त्याच्या आईचं अंत्यदर्शन घेतलं होतं.

पणजी, 
प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांच वयाच्या 54 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्‍यांना न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरचा आजार होता. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
लंडनमध्ये कॅन्सरवर यशस्वी उपचार घेतल्‍यानंतर ते भारतात परल्यावर मंगळवारी अचनक त्यांची प्रकृती खालावली होती. त्‍यांना त्‍वरित रूग्‍णालयातही दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी इरफानच्या आई सईदा बेगम यांचं जयपूरमध्ये निधन झाल्‍याने आणि लॉकडाऊनमुळे असल्‍याने त्‍यांनी त्यावेळी व्हिडीओ कॉलवरंच त्याच्या आईचं अंत्यदर्शन घेतलं होतं. करोडो रसिकांच्‍या मनावर त्‍यांनी राज्‍य केलं. अंग्रेजी मीडियम हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला आहे. 

संबंधित बातम्या