रेल्‍वेने मातीचा भराव घातल्‍याने स्‍थानिकांना त्रास

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

दाबोळी : दक्षिण पश्‍चिम रेल्वेने चिरकूनउडी बेलाबाय येथील जमिनीवर मातीचा भराव घातल्याने पावसाळ्यात त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यास अडचण निर्माण होऊन पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

याप्रकरणी दखल घेताना वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी येथील माती हटविण्याचे आश्‍‍वासन दिले. सदर माती हटविण्यात न आल्यास कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.

रेल्वेने इतर ठिकाणची माती, लोखंडी पटऱ्या, सिमेंटच्या स्लिपर्स वगैरे साहित्य चिरकूनउडी बेलाबाय येथे ठेवले आहे. या ठिकाणी मातीचा भराव टाकताना तेथील नाला अर्धेअधिक बुजविण्यात आला आहे.

पावसाळ्यात सदर नाल्यातील पाणी मायमोळे तळ्यामध्ये वाहत जाते. नाल्याची रुंदी कमी झाल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण निर्माण होणार आहे. तसे झाल्यास तेथील रस्ता पाण्याखाली जाण्याचा तसेच आसपासच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरण्याची भीती स्थानिकांमध्ये पसरली आहे.

धनगर समाजाचे साधन सुविधा अभावी हाल

संबंधित बातम्या