पणजीत भरले अनोखे प्रदर्शन

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

पणजीत आफ्रिकन हस्तकला, विविधांगी वस्तूंचे दालन

दालनात विविध वस्तू दाखवताना अंचल पैयर.

आकर्षक वस्तूंचा खजिना.

पणजी : लोकोत्सवात अलिकडेच आफ्रिकन हस्तकलेचे सुबक सुंदर नमुने प्रथमच गोव्यात सादर करून लक्ष वेधल्यानंतर मूळ आफ्रिकन असलेल्या अंजल पैयर यांनी आता पणजीत आत्माराम बोरकर मार्गावर ईडीसी हाऊस जवळ पुरुषोत्तम स्मृती इमारतीत (अनिकेत सेल्सच्या पहिल्या मजल्यावर) या वस्तूंचे व त्याचबरोबर मुले, महिला व पुरुषांसाठी विविध देशातून थेट आयात केलेल्या वस्तूंचे दालन सुरू केले आहे.

केनिया, मोझांबिक, कोरिया, जपान, दक्षिण आफ्रिका येथून आयात केलेल्या वस्तू थेट कारखान्यातून आणल्या गेल्याने व त्यात मध्ये दलाल किंवा वितरक नसल्याने या वस्तू अत्यंत माफक दरात उपलब्ध आहेत. शॉपिंग बॅग, ज्यात सात-आठ किलो वजनाच्या वस्तू राहू शकतात, पर्स, पाऊच, कॉस्मेटिक्स, ग्लास बॉटल्स, थर्मास, ग्लास सेट, बाऊल्स, विविध रंगातील थ्रीडी पाऊचस, फुलदाण्या, विविध उपयोगी पेट्या, कलात्मक बॅगा, मुलांसाठी पेन्सिल बॉक्स, कीट्‌स, खेळ, ग्लीटर पेन, महिलांसाठी मेकअपच्या वस्तू अशा अनेक वस्तू या दालनात लक्ष वेधून घेत आहेत.

१५ रुपयांपासून ९९, १२९, २९९, १४९, १९९, ६९ अशा किंमतीत या वस्तू उपलब्ध आहेत. ॲबनी आफ्रिकन लाकडापासून बनविलेल्या शोभेच्या वस्तूंच्या किंमती थोड्या जास्त आहेत. परंतु त्या एकमेवाद्वितीय अशा आहेत. कारण ॲबनी प्रकारचे लाकूड खूप महाग असते व त्यापासून बनविलेल्या वस्तू टिकाऊ असतात. या दालनात ‘इल‌ईडी ट्री लाईट्‌स’ तर खूपच सुंदर आहेत व त्या लाईट्‌सच्या कोणीही सहज प्रेमात पडावे एवढ्या नजरेत भरतात.

क्रॅकर लाईट्‌स (फटाक्यांचा आवाज सुद्धा त्यात आहे) चिली लाईट्‌स (मिरचीच्या आकाराचे बल्ब असलेल्या) या वस्तू तर कोणत्याही घराच्या दिवाणखान्याची, कार्पोरेट ऑफिसची शोभा आणखीन वाढवतील अशा आकर्षक आहेत आणि त्या मुख्य म्हणजे ‘शॉक प्रूफ’ आहेत.

अंचर पैयर यांचे वडिल भारतीय ते पुण्यात शिक्षक होते व अंचल यांचा विवाह आफ्रिकेतील पोलो खेळाडूशी झाला. त्या स्वतः समाजाभिमुख महिला आहेत. आफ्रिकन आदिवासी महिलांना संघर्ष करावा लागतो, त्यांना सामाजिक, आर्थिक अडचणी आहेत अशावेळी त्यांच्यासाठी काहीतरी करावे म्हणून त्यांच्या हस्तकलांचा त्या प्रचार करतात. त्यांच्या वस्तूंना मार्केट मिळवून देतात. त्यांनी रत्नागिरीत मोकळ्या वातावरणात मुलांना शिकविण्याचा उपक्रम राबविला मग त्या आफ्रिकेत गेल्या तिथे महिलांना, मुलांना इंग्रजीचे धडे पण देतात.

हे पाहा  : मांडो महोत्सवात रसिकांनी लुटला ‘मेंडोलिन’ वादनाचा आनंद 

दर्जाबद्दल तडजोड नाही
मला गोवा आवडतो. त्यामुळे गोव्यात आम्ही हे दालन सुरू केले आहे. अजून कितीतरी प्रकारच्या वस्तू या दालनात येणार आहेत. या वस्तूंच्या दर्जाशी तडजोड नसेल. त्यामुळे गोमंतकीय बिनधास्तपणे त्या खरेदी करू शकतात. हे दालन सुरू करून दोन दिवस झाले नाहीत तर लोकांचा प्रतिसाद चांगला लाभत आहे आणि मुख्य म्हणजे किफायतशीर किंमतीबद्दल त्यांनीच आमच्याशी आश्‍चर्यचकीत होवून विचारणा केली. कारण आमच्या वस्तूंच्या तुलनेत खूपच कमी आहेत आणि जास्त खरेदीवर पुन्हा आम्ही दहा टक्के सूटही देतो, असे अंचल पैयर यांनी सांगितले

संबंधित बातम्या