लॉकडाऊन शिथिलतेनंतर लाखापेक्षा अधिक कर्मचारी कामावर

dainik gomantak
सोमवार, 27 एप्रिल 2020

लॉकडाऊन शिथिलतेनंतर  लाखापेक्षा अधिक कर्मचारी कामावर 

पणजी,

राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता करण्यात आल्यानंतर विविध क्षेत्रातील उद्योगामध्ये एक लाखापेक्षा अधिक कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत. त्यामध्ये अर्धेअधिक कर्मचारी (सुमारे ५० हजार) हे औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यामधील आहेत. १६ हजार २०० कर्मचारी हे औषधालय कंपन्यांमध्ये कामावर आले आहेत तर विविध सरकारी कार्यालयामध्ये सुमारे ८५०० कर्मचाऱ्यांनी उपस्थिती लावली आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम, गोवा साधनसुविधा विकास महामंडळ, पोलिस, वीज व इत्यादी खात्यांचा समावेश आहे. खासगी बांधकाम क्षेत्रातील ग्रामीण भागात ३०३८ कामगार, ई कॉमर्समधील ५३२, आयटी आयटीएस क्षेत्रात ४५६ लोक कामावर रूजू झाले आहेत.
गेल्या आठवड्यापासून सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता करून सर्व सरकारी कार्यालये ३० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थितीची अट घालून सुरू केली आहेत. बांधकाम क्षेत्रातील कामालाही परवानगी दिली आहेत. राज्यातील उद्योगांनाही मंजुरी दिल्याने राज्यातील स्थिती हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरू झाली आहे. मात्र परवानगी व मंजुरी देताना लॉकडाऊनमध्ये घातलेल्या अटींची सक्ती कामावर येणाऱ्या कामगारांना करण्यात आली आहे. या सर्व कामगारांची प्रवेश करण्यापूर्वी थर्मल गनने तपासणी करणे, तोंडाला मास्कची सक्ती तसेच कामावर काम करता सामाजिक अंतर ठेवण्याचे नियम कायम ठेवण्यात आले आहे. या सुरू असलेल्या उद्योगांवर नियमांचे पालन होते की नाही याची देखरेख ठेवण्यासाठी सरकारने सरकारी अधिकाऱ्यांची पथकेही नेमली आहे.

संबंधित बातम्या